लक्ष्मीकांत प्यारेलाल – राजन साजन मिश्रा यांचा सूर संगम

कॉलेजमध्ये असताना लक्ष्मीकांत प्यारेलाल हे माझे आवडते संगीतकार होते. त्यांची गाणी तेवढ्या काळापुरती तरी लोकप्रिय असायची. त्यांचे पॉझेस, ओर्केस्ट्रेशन, व्हायोलीनचा वापर असे बरेच काही. राजेश खन्ना-जितेंद्रचे काही सिनेमे फक्त लक्ष्मी-प्यारे यांच्या गाण्यासाठी बघितले होते. याच काळात सूरसंगम हा वेगळा सिनेमा आला आणि त्यातल्या गाण्यांचे वेगळेपण लक्षात आले. तेव्हा ही गाणी वेगळी वाटली पण नेमकी का आवडतात हे सांगता येत नव्हते. नंतर शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाल्यावर सूरसंगम या चित्रपटाची गाण्यातले सौंदर्य लक्षात आले. चित्रपट पुन्हा पाहिला. शंकरभरणम या तेलुगु चित्रपटाची रिमेक असलेल्या या चित्रपटाची गाणी एक से बढकर एक आहेत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या दर्जेदार चित्रपटापैकी एक. एक दुजे के लिये, चरस, दोस्ती, कर्मा वगैरे चित्रपटातले लोकप्रिय लक्ष्मी-प्यारे वेगळे आणि चित्रपटाच्या दर्जाप्रमाणे सांगीतिक दर्जा उंचावणारे उत्सव, सूरसंगम चित्रपटाचे लक्ष्मी-प्यारे वेगळे. अशाच वेगळ्या गाण्यांचा हा मागोवा.... आयो प्रभात सब मिल...