ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया
प्यासा हा वसंतकुमार शिवशंकर पदुकोण उर्फ गुरुदत्त यानी दिग्दर्शित केलेला 1957 चा सिनेमा केव्हाही पहावा असा क्लासिक सिनेमा आहे . जागतिक सिनेमामधें आवर्जून बघावे अशा 100 सिनेमांच्या यादीत आणि भारतामधील उत्कृष्ठ 25 सिनेमांच्या यादीत प्यासाचा समावेश होतो . खेदाची बाब आहे की या सिनेमाला एकही पुरस्कार मिळाला नाही !! विजय या एका प्रतिभावान परंतु अयशस्वी कवीची ही कथा आहे ज्यामधे कवीला समाजाची अवहेलना सहन करावी लागते आणि जीवंतपणी स्मृतिदिन साजरा केल्याचे बघावे लागते . साहीर यानी लिहिलेली एकाहुन एक सरस गीते आणि सचिन देव बर्मन यांचे दर्जेदार व कथेला - प्रसंगाला साजेसे संगीत ही प्यासाची आणखी काही ठळक / वैशिष्टये . या सिनेमातील क्लायमक्सचे हे अजरामर गीत मोहम्मद रफी यानी अप्रतीम गायले आहे . साहिरला जे म्हणायचे आहे , ती गीतकाराची वेदना रफी यानी स्वरातून आपल्यापर्यंत पोहोचवली आहे . थकलेला निराश कवी जीवावर आल्यासारखे शब्दोच्चार करेल , तसे...