आये कुछ अब्र
फैज़ अहमद 'फैज़' यांनी "आये कुछ अब्र" या गझल मध्ये मैफिलीचा माहोल कसा असावा याचे वर्णन केले आहे. त्या गझलचा अर्थ आधी समजून घेऊ आणि नंतर ही गझल अनेक गायकांनी कशी पेश केली आहे याचा लुत्फ घेऊ. गझलच्या व्याकरणानुसार ही उत्तम गझल आहे. गझलची दुसरी ओळ ".......आब आये" याने संपते. मद्यसेवनाने सुरू झालेली गझल पुढे प्रेयसीची आस व्यक्त करत वेगळ्या वळणावर जाते आणि जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग दाखवते. प्रत्येक शेर मधली दुसरी ओळ पहिल्या ओळीच्या अर्थाशी विरोधाभास दर्शवणारी आहे. फैज अहमद फैज यांचे हेच तर कौशल्य. मदिरासेवन हे काही घटा घटा घाई गडबडीत उरकण्याचे कर्मकांड नव्हे. त्याला एक माहोल असावा, शौकियाना अंदाज असावा आणि गप्पांच्या मैफलीत काही शेर-शायरी-गाना-बजाना शब्दांकडे लक्ष देऊन ऐकण्या-ऐकवण्याचा मौका शोधणारे रसिक "बसलेले" असावेत.....घरी कोणीतरी वाट पहात आहे याची शुद्ध नसावी, वेळेचे बंधन नसावे. विमानाचे टेक ऑफ आणि हेलिकॉप्टरचे उडणे यातला फरक समजणारे यार असावे. आये कुछ अब्र कुछ शराब आये उसके बाद आये जो अज़ाब आये [अब्र = cloud , अज़ाब=...