अशोक पत्की यांचा संगीत “सरदारी बेगम”

सरदारी बेगम हा चित्रपट एका ठुमरी गायिकेची व्यथा “ऐकवणारा” आहे. सत्यकथेवर आधारीत हा सिनेमा श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाचे संगीत श्रवणीय आहे, ती गाणी पुनःपुन्हा ऐकली तर त्यातली खुमारी समजते. याचे खरे श्रेय जाते संगीतकार अशोक पत्की याना. खरे तर चित्रपटाच्या श्रेयनामावलीमध्ये वनराज भाटीया यांचे नाव आहे परंतु त्यांचे या चित्रपटाच्या गाण्यात किती योगदान आहे हे गाणी रेकॉर्ड करताना असणारे कलाकार जाणतात. जावेद अख्तर यांनी वनराज भाटीया यांनी दिलेल्या चाली ऐकल्या आणि ते म्हणाले कि चित्रपटातल्या ठुमरी गायिकेचा विचार करता या चाली योग्य नाहीत. यानंतर चित्रपटाचे सहाय्यक संगीतकार अशोक पत्की यांनी चाली दिल्या, रेकोर्डिंग केले आणि .....वरच्या मजल्यावर बसलेल्या वनराज भाटीया यांनी त्या चालीना दुजोरा दिला. चित्रपटातील सर्व म्हणजे १३ गाणी एकापेक्षा एक आहेत, त्यात डावे-उजवे करणे कठीण आहे. अशोक पत्की याना या श्रेयाबद्दल विचारले असता “त्याबद्दल मला खंत नाही” हे सांगितले. त्यांचा संगीतकार म्हणून प्रवास शब्दबद्ध झालेले सप्तसूर माझे हे पुस...