क्लासिक किशोर
किशोरकुमार या अवलिया कलाकाराला चतुरस्र आणि अष्टपैलु शब्द कमी पडावेत. अभिनयाच्या बाबतीत "दूर गगन की छाव में"मधला अभिनेता किशोर आणि पडोसन मधला अफलातून गुरु अशी बरीच उदाहरणे देता येतील. शिवाय गायनात किशोरने जो अभिनय केला आहे त्याला तोड नाही. पडोसन हा चित्रपट किशोर-मेहमूद-राहुल देव बर्मन यानी सेटवर improvise केला आहे. खात्री पटण्यासाठी पडोसन या चित्रपट दिग्दर्शकाचा -ज्योती स्वरूप - कोणताही चित्रपट पहावा. ज्योती स्वरूप हा मेहमुदच्या बहिणीचा नवरा, पडोसन चा निर्माता मेहमूद !!
किशोर इंडस्ट्रीमधें आला, ते गायक होण्यासाठीच पण अशोककुमारच्या आग्रहासाठी मिळेल ते काम करत राहीला. अभिनय नाखुशीनेच केला. जे निर्माते पैसे द्यायचे नाहीत त्यांच्याकडून तो अतरंगी पद्धतीने वसूल करायचा किंवा सेटवर यायचा नाही. मग असे कलाकारांचे पैसे बुडवणारे लोक किशोर बद्दल काहीही अफवा पसरवू लागले. आपण रसिकानी सुद्धा विनोदी नट असा शिक्का मारून त्याच्यावर अन्याय केला. आपण "मुसाफिर-दूर गगन की छाव में" च्या किशोरला सोयीस्करपणे विसरलो.
संगीत दिग्दर्शक या नात्याने किशोरने बरीच सरस गाणी दिली. आ चल के तुझे, मैं हूं झूम झूम झुमरू, जीवन से ना हार जीनेवाले, बेकरार दिल तू गाए जा अशी अनेक गाणी सांगता येतील. अशोककुमारने एका मुलाखतीमधे सांगितल्याप्रमाणे चलती का नाम गाडी या चित्रपटाच्या संगीतामधे त्याचाही सहभाग आहे, तो उल्लेखनीय आहे. झुमरू सारख्या चित्रपटाचे गीतकार दस्तूरखुद्द किशोरकुमार !
गायक म्हणून तो महान कलाकार आहेच पण त्याने हिंदी चित्रपट संगीतात बरेच ट्रेंड आणले, यॉडलिंग त्यापैकीच एक. ट्रेंड आणताना त्यावर विलक्षण प्रभुत्व मिळवले, इतके की यॉडलिंग कोणी गायले तर भारतात आपल्याला किशोरकुमारची आठवण होते. शास्त्रीय संगीताचा विचार केला तर यॉडलिंग गाताना स्वरांवर विलक्षण प्रभुत्व लागते. बेसूर होण्याला म्हणजेच सुरांची गल्ली चुकण्याला तिथे पुरेपुर वाव असतो. प्रत्येक गायकाने किंवा श्रोत्याने एकदा योडलिंगचा प्रयत्न करून पहावा. खालचा स्वर आणि एकदम टिपेचा (falsetto) स्वर आलटून पालटून लावला आणि त्यामधे आकार-उकार-इकार अशी विविधता आणली की यॉडलिंग होते. स्वराला पक्के असण्याबद्दल "आंखों में तुम" हे एकच गाणे पुरेसे आहे. आता रेकॉर्डिंगच्या तंत्रज्ञानामुळे हे शक्य आहे. तेव्हा सलग रेकॉर्डिंग व्हायचे याचा विचार करून कोणीही हे गाणें गायचा प्रयत्न करावा. तर अशा या स्वराला पक्का असलेल्या परंतु शास्त्रीय रागदारीचे कोणतेही प्रशिक्षण न मिळालेल्या किशोरने शास्त्रीय रागावर आधारीत बरीच गाणी गायली आहेत.
"यू नींद से वो जान ए चमन" हे राहुल देव बर्मन यानी संगीतबद्ध केलेले गाणें शाम कल्याण रागावर आधारीत आहे, इतके की शाम कल्याण रागाचे चलन हे गाणे लागले की ओळखता येते आणि शाम कल्याण रागाचे शास्त्रीय गायन सुरु असेल तर हेच गाणें ओठावर येते. सुनील दत्त यांच्या दर्द का रिश्ता सिनेमातले हे गाणें काही परदेशवासीयांच्या मनातली खंत व्यक्त करते.
यू नींद से वो जान ए चमन जाग उठी है
परदेस में फिर याद ए वतन फिर जाग उठी है
फिर याद हमे आये है सावन के वो झूले
वो भूल गए हमको, उन्हें हम नही भूले
इस दर्द के कांटों की चुभन जाग उठी है
किशोरने या गाण्याला लावलेला आवाज अनोखा आहे. गाण्यात सतार, व्हायोलीन, फ्लूट, तार शहनाई, तबला (ताल - दादरा) एवढी मोजकीच वाद्ये ऐकू येतात आणि आपण गाणें गुणगुणत राहतो. सतार फार सुरेख वाजते, बहुदा अशोक शर्मा यानी वाजवली आहे.
"पायलवाली देखना" हे असेच फार ऐकले न जाणारे गाणें मारूबिहाग रागावर आधारीत आहे. मारू बिहाग राग कसा ओळखायचा हा प्रश्न असेल तर अजून काही गाणी सांगता येतील - तुम तो प्यार हो, तेरे सुर और मेरे गीत, ये क्या जगह है दोस्तो, दिल जो ना कहे सका.....पण चित्रगुप्त यानी मारूबिहागच्या नोट्स अशा काही वापरल्या आहेत की मारूबिहाग ओळखण्यासाठी पायलवाली बरोबर मैत्री करावी, स्वर ओळखीचे होतील. एक राज सिनेमातील मजरूह यानी लिहिलेले शब्द चपखल आणि सुरेख.
लचकत चमकत चलत कामिनी
दधिगुन दमकत चपल दामिनी
ओ बाँवरी ओ साँवरी अरी ओ
चंचल पल-छिन रुक जा रुक जा रुक जा
पायल वाली देखना
यहीं पे कहीं दिल है
पग तले आये ना
जैसे दामनिया बदरा में उड़े
कुछ दूर चले फिर जा के मुडे
उठा रे नयन कजरारे पर इतना समझ ले
किसी की लगे हाये ना
पायल वाली देखना ...
किशोरने ज्या ज्या वेळेस स्वतःला आवाज दिला आहे त्या त्या वेळेस तो आवाज वेगळाच वाटतो. केहेरवा तालतल्या या गाण्यात सतार, व्हायब्रोफोन, व्हायोलीन, तार शहनाई, तबला आणि ढोलक वाजतात.
राहुल देव बर्मन यानी शिवरंजनी रागावर आधारीत गाणें केले ते लता आणि किशोर या दोघानी वेगवेगळे गायले आहे. प्रत्येकाला वेगळे गाणें आवडेल कारण राहुल देव बर्मन यानी दोन्ही गाण्यात प्रसंगाप्रमाणे वेगवेगळी वादये वापरली आहेत. तरीही गाण्यातले भाव किशोरने फार सुरेखरित्या व्यक्त केले आहेत, नेहेमीप्रमाणे. "आपकी आंखों में कुछ महके हुए से राग है" या गाण्यात राहुल देव बर्मन यानी केदार रागाचा अनोखा ढंग सादर केला आहे.
बप्पी लाहिरी यानी संगीतबद्ध केलेल्या "मुझे नौलक्खा मंगा दे" या गाण्यात शेवटी किशोरने आलापीसह यमन कल्याण रागावर आधारीत "लोग कहेते है, मैं शराबी हूं" इतक्या आर्ततेने गायले आहे की प्रश्न पडतो, या गाण्यात अमिताभसारखा आवाज ऐकू, आलापी ऐकू की गाण्यातला अभिनय ! हे गाणें म्हणजे खरे तर आशा-किशोर यांची अभिनयाची सुरेल जुगलबंदी आहे. ज्या पद्धतीने किशोर गाण्यात अमिताभच्या आवाजात एंट्री घेतो ते श्रवणीय.
अंजान-प्रकाश मेहरा यानी सुंदर गीत लिहिलय. वादविवाद स्पर्धेत आपली बाजू कशी मांडावी याचा धडाच, अर्थात शराब या विषयावर अनेक शायरानी केलेल्या शायरीचा हा तर्जुमा.
(आलापी नंतर...)
लोग कहते हैं मैं शराबी हूँ
तुमने भी शायद यही सोच लिया हां .....
लोग कहते हैं मैं शराबी हूँ
किसीपे हुस्न का गुरूर जवानी का नशा
किसीके दिल पे मोहब्बत की रवानी का नशा
किसीको देख के साँसों से उभरता है नशा
बिना पिये भी कहीं हद से गुज़रता है नशा
नशे मैं कौन नहीं हैं मुझे बताओ ज़रा
किसे है होश मेरे सामने तो लाओ ज़रा
नशा है सब पे मगर रंग नशे का है जुदा
खिली खिली हुई सुबह पे है शबनम का नशा
हवा पे खुशबू का बादल पे है रिमझिम का नशा
कहीं सुरूर है खुशियों का कहीं ग़म का नशा
नशा शराब मैं होता तो नाचती बोतल
मैकदे झूमते पैमानों मैं होती हलचल
नशा शराब मैं होता तो नाचती बोतल
नशे मैं कौन नहीं हैं मुझे बताओ ज़रा
लोग कहते हैं मैं शराबी हूँ
तुमने भी शायद यही सोच लिया लोग कहते हैं मैं शराबी हूँ
थोड़ी आँखों से पिला दे रे सजनी दीवानी
तुझे मैं तुझे मैं सांसों में बसा लूंगा सजनी दीवानी
तुझे नौलक्खा मंगा दूंगा सजनी
शेवटी किशोरने गायलेला आलाप श्रवणीय...यमन कल्याण !!!
नमक हलाल चित्रपटातील "पग घुंगरू बांध" या गाण्यातल्या दरबारी कानडा बद्दल यापूर्वी सविस्तर लिहिलय. बप्पी लाहिरीला अशा गाण्यांसाठी दाद देताना आपण कंजुषी का करतो ?
झिंझोटी राग ओळखायचा असेल तर "कोई हमदम न रहा" ऐकावे. हे मुळ गाणें 1936 साली अशोककुमारने गायले होते (संगीत - सरस्वतीदेवी) त्याच गाण्यात किशोरचे व्हर्जन अर्थात झिंझोटीच्या स्वभावाला जुळणारे वाटते. संगीतकार - किशोरकुमार. तो गातो तेव्हा "शाम तनहाई की है, आएगी मंझिल कैसे" हे खरेच वाटते. शब्दाप्रमाणे एको इफेक्ट, पॉझचा परिणाम ऐकावा.
जीवन से भरी तेरी आंखे" (मालगुंजी), "कुछ तो लोग कहेंगे" (खमाज), " खिलते है गुल यहां" (भीमपलास) ही एकसे एक गाणी किशोरने गायल्यामुळे आपल्याला सोपी वाटतात. किशोरकुमार नेहमीच आपलासा वाटला, त्याची गाणी म्हणुनच तर आजही आपण गुणगुणतो. किशोरने आपल्याला गायला शिकवले. त्याचे गाणें आपण ऐकतो आणि त्याच्याबरोबर गातोही. कुदरत सिनेमातील "हमे तुमसे प्यार कितना" हे गाणें परवीन सुलताना यानीही गायले आहे. भैरवी रागावर आधारीत गाणें परवीन सुलताना यांचे व्हर्जन क्लासिकली करेक्ट आहे पण आपण म्हणतो ते गाणें किशोरचे असते कारण त्यात दर्द आहे, भाव आहे. "तुम्हे कोई और देखे, तो जलता है दिल, बड़ी मुश्किलों से फिर संभलता हैं दिल" हे शब्द आपल्या मनावर किशोरने कोरले आहेत.
हेमंतकुमार यानी संगीतबद्ध केलेले "वो शाम कुछ अजीब थी" यमन रागावर आधारीत आहे. खामोशी चित्रपटातील हे गाणें किशोरकुमारच्या सर्वोत्तम दर्दभऱ्या गाण्यापैकी एक म्हणता येईल. या गाण्यातला कोरस वेगळा परिणाम साधतो. किशोरने स्वतःच्या आवाजात गायलेल्या या गाण्यात व्हायोलीनचे वरचे आणि खर्जातले स्वर, कोरस यामुळे मनातील द्वंद्व समोर येते.
तिलंग राग हा सहसा शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत न ऐकला जाणारा राग आहे. या रागावर आधारीत गाणी बरीच आहेत, किशोरकुमारने गायलेले भावस्पर्शी गीत "कैसे कहे हम, प्यार ने हमको" हे तिलंग चे वेगळे रूप आहे. नीरज यानी लिहिलेल्या आणि सचिन देव बर्मन यानी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यातून किशोर उध्वस्त प्रियकराची व्यथा उत्कटतेने मांडतो. शर्मीली सिनेमातील गाण्यात अकोर्डियन, तबला (दादरा ताल), बासरी, काँगो-बोंगो (अंतऱ्याला) अशी वादये वाजतात. गाणे बघण्यापेक्षा ऐकावे. किशोरने कोणता आवाज केव्हा लावलाय आणि कसा लावलाय, शेवट कसा केलाय...speechless
कैसे कहें हम, प्यार ने हमको,
क्या क्या खेल दिखाये
यूं शरमाई, किस्मत हमसे,
खुद से हम शरमाए
बागों को तो पतझड़ लूटे, लूटा हमें बहार ने
दुनिया मरती मौत से लेकिन, मारा हमको प्यार ने
अपना वो हाल हैं बीच सफ़र में जैसे कोई लुट जाये
कैसे कहें हम...
तुम क्या जानो, (इथे किशोर जसा हसतो त्यामुळे दुःख अधोरेखित होते)
तुम क्या जानो, क्या चाहा था, क्या लेकर आये हम
टूटे सपने घायल नगमे, कुछ शोले कुछ शबनम
इतना सब है पाया हमने, कहो तो कहाँआ जाये
कैसे कहें हम प्यार ने हमको क्या क्या खेल दिखाये
ऐसे बाजी शहनाई घर में, अब तक सो ना सके हम
अपनों ने हमको इतना सताया, रोये तो रो ना सके हम
अब तो करो कुछ ऐसा यारों, होश ना हमको आये
कैसे कहें हम प्यार ने हमको क्या क्या खेल दिखाये
यूं शरमाई
किस्मत हमसे
खुद से हम ...
वा. खूप छान लिहिलंय.
ReplyDeleteखूप छान लिहिलंय सुहास
ReplyDeleteखूपच सुंदर आणि माहिती पूर्ण लेख.
ReplyDeleteएक प्रश्न...
"सुकतातची जगी या" हे नाट्यपद आणि त्यावरुन ओ पी नय्यर यानी संगीतबद्ध केलेले "छोटासा बालमा".
"सुकतातची जगी या" ही भैरवी आहे ना?
धन्यवाद..
संतोष लेले.
सुकतातची जगी या ही भैरवी नाही, ते नाट्यपद भैरवी रागावर आधारीत आहे, त्यावर आधारीत छोटासा बालमा
Deleteखुलाश्याबद्दल आभार...
Deleteसुंदर लेख ! किशोर कुमार व त्यांनी गायलेल्या शास्त्रीय संगीतावर आधारित गीतांची अतिशय सोप्या शब्दांत ओळख करुन देणे, उल्लेखनीय व प्रशंसनीय!धन्यवाद !
ReplyDeleteखूप मस्त
ReplyDeleteखूपच सूरेख लेख. छान माहिती मिळाली. खूप धन्यवाद.
ReplyDelete