अशोक पत्की यांचा संगीत “सरदारी बेगम”



सरदारी बेगम हा चित्रपट एका ठुमरी गायिकेची व्यथा “ऐकवणारा” आहे. सत्यकथेवर आधारीत हा सिनेमा श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केला आहे.  या सिनेमाचे संगीत श्रवणीय आहे, ती गाणी पुनःपुन्हा ऐकली तर त्यातली खुमारी समजते.  याचे खरे श्रेय जाते संगीतकार अशोक पत्की याना.  खरे तर चित्रपटाच्या श्रेयनामावलीमध्ये वनराज भाटीया यांचे नाव आहे परंतु त्यांचे या चित्रपटाच्या गाण्यात किती योगदान आहे हे गाणी रेकॉर्ड करताना असणारे कलाकार जाणतात.  जावेद अख्तर यांनी वनराज भाटीया यांनी दिलेल्या चाली ऐकल्या आणि ते म्हणाले कि चित्रपटातल्या ठुमरी गायिकेचा विचार करता या चाली योग्य नाहीत.  यानंतर चित्रपटाचे सहाय्यक संगीतकार अशोक पत्की यांनी चाली दिल्या, रेकोर्डिंग केले आणि .....वरच्या मजल्यावर बसलेल्या वनराज भाटीया यांनी त्या चालीना दुजोरा दिला.  चित्रपटातील सर्व म्हणजे १३ गाणी एकापेक्षा एक आहेत, त्यात डावे-उजवे करणे कठीण आहे.  अशोक पत्की याना या श्रेयाबद्दल विचारले असता “त्याबद्दल मला खंत नाही” हे सांगितले.  त्यांचा संगीतकार म्हणून प्रवास शब्दबद्ध झालेले सप्तसूर माझे हे पुस्तक वाचनीय आहे.



सरदारी बेगम ही भूमिका किरण खेर यांनी फार सुरेख केली आहे.  स्मृती मिश्रा यांनी काहीशी भांबावलेली तरुण सरदारी बेगम चांगली निभावली आहे पण गाणी बघताना नायिका गात नाही हे समजते.  किरण खेर यांच्याबाबतीत त्या गातात असेच वाटते हे त्यांचे अभिनयाचे कौशल्य.  रजत कपूर, अमरीश पुरी, सुरेखा सिक्री यांचा अभिनय उल्लेखनीय.  श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातला अमरीश पुरी वेगळाच आहे.  या गुणी अभिनेत्याला हिंदी चित्रपटसृष्टीने खलनायकाचे तेच तेच रोल देऊन वाया घालवले.  श्याम बेनेगल यांच्या आणि “गर्दिश” सारख्या चित्रपटांचा अपवाद.     

सिने पत्रकार-समीक्षक, फिल्मफेअर मासिकाचे संपादक खलिद मोहम्मद यांची कथा-पटकथा एका ठुमरी गायिकेची व्यथा व्यक्त करते.   विक्रम गायकवाड यांच्या  मेकअपमध्ये त्या काळाचा विचार केलेला दिसतो, कुठेही फिल्मी भपका आणलेला नाही.  श्याम बेनेगल यांचे दिग्दर्शन चांगले आहे पण हा त्यांचा उत्कृष्ट चित्रपट नव्हे.  अंकुर, भूमिका, मंथन, मंडी, कलयुग (शशी कपूर), मम्मो असे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या श्याम बेनेगल यांच्याकडून अपेक्षा वाढल्या त्या सरदारी बेगम मध्ये पूर्ण होत नाहीत.  अर्थात चित्रपट बघावा असाच आहे पण हुशार विद्यार्थ्याला सत्तर टक्के मार्क पडले तरी आपण नाराज असतो तसे काहीसे होते.  शिवाय सुरेल गाणी चित्रपटात पूर्ण ऐकायला मिळत नाहीत ही तक्रार आहेच.  सरदारी बेगम चित्रपट बघणे आणि गाणी ऐकणे याची सरमिसळ केली तर भ्रमनिरास होतो.  त्यामुळे गाणी ऐकावीत, ऐकत रहावी.

सरदारी बेगम या चित्रपटातील १३ गाणी खरे तर हेडफोनवर ऐकावी.  गाण्यातली वेगवेगळी वाद्ये, त्यांचा स्तिरीओ इफेक्ट, एका बाजूने सारंगी तर दुसऱ्या बाजूने हार्मोनियम, तबला असे ऐकत गेले कि वाटते आपण ठुमरीच्या मैफिलीला आलो आहोत.

सारंगी ने ठुमरी सुरु होते, नृत्यांगना आणि गायिका दिलदारी करायचे आव्हान देते, आशा भोसले यांच्या नखरेल आवाजात....केहेरवा तालात.  गीतकार जावेद अख्तर यांनी या चित्रपटातील सर्व गाणी लिहीताना ठुमरी गायिकेचा लहेजा सांभाळला आहे, भावना त्या शब्दात व्यक्त केल्या आहेत.  आलेल्या पाहुण्याने गाण्याचा आनंद घ्यावा आणि तुमरी ऐकण्यासाठी पुन्हा यावे ही इच्छा शब्दात सुरेख व्यक्त केली आहे.

चाहे मार डालो राजा, चाहे काट डालो राजा
हम तो यारी करेंगे दिलदारी करेंगे

बालों में गजरा बाँधेंगे और पैरों में पायल
होंठों पर लाली दमकेगी और आँखों में काजल
चमकेंगे कानों में झुमके और माथे पर झूमर
सारे जलवे सारे नखरे सारी अदाएँ लेकर
तुम्हें रिझाने की पूरी तैयारी करेंगे

तुम आये कभी हमारे गली, तो हम छत पर आ जायेंगे
इशारे करेंगे हम तुमको, तुम्हें हम घर में बुलायेंगे
पान कभी हम पेश करेंगे तुमको राजा जानी
और कभी माँगेंगे तुमसे हम रुमाल निशानी
प्यार में जो होती हैं बातें सारी करेंगे

चाहे मार डालो राजा, चाहे काट डालो राजा
हम तो यारी करेंगे दिलदारी करेंगे


या चित्रपटाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांची पार्श्वगायिका म्हणून वेगळी ओळख झाली.  चित्रपट संगीत गाताना जो भाव व्यक्त करावा लागतो तो अतिशय सुरेलरित्या व्यक्त झाला आहे.  “शास्त्रीय गायिका” इथे न दिसता “ठुमरी गायिका” दिसते हे त्यांच्या गायनाचे कौशल्य आहे.
तानपुरा, सारंगी आणि तबल्याच्या साथीने “मोरे कान्हा” बरोबर केलेली लाडीक तक्रार ऐकावीच....
मेरे कान्हा जो आये पलट के, अब के होली मैं खेलूंगी डट के,

उनके पीछे मै चुपके से जाके, ये गुलाल अपने तन पे लगाके
रंग दूंगी उन्हें मैं लिपट के, मोरे कान्हा.....
की जो उन्होंने अगर जोरा-जोरी, छिनी पिचकारी बैय्या मरोडी,
गरियाँ मैंने रखी है रट के, मोरे कान्हा......



हे गाणे खरे तर एक गीत दो आवाज मालिकेमधले उत्कृष्ट गाणे म्हणता येईल कारण आरती अंकलीकर-टिकेकर आणि आशा भोसले यांची दोन्ही व्हर्जन तितकीच श्रवणीय आहेत.  आशा भोसले यांचा स्वर लडिवाळ आहे तर आरती अंकलीकर यांच्या स्वरात शास्त्रीय ठुमरी आहे.  आशा भोसले यांच्या गाण्यात घुंगरू आणि सतार वेगळी ऐकता येते. हे गाणे सिनेमाच्या गाण्याचे रेकोर्डिंग आहे त्यामुळे वाद्ये वेगळी वाजली आहेत.  सरदारी बेगम मधील एकूणच गाण्यांच्या रेकोर्डिंगचा दर्जा फार उत्तम आहे.  सर्वच गाण्यातला तबला, डग्ग्याच्या स्पष्टतेसह ऐकता येतो त्यामुळे या सर्व गाण्यांची खुमारी न्यारी आहे.



सावरिया हे गाणे शुभा जोशी यांनी गायले आहे.  त्यांच्या आवाजातला बेस वेगळा “एहसास” देतो.  (केहेरवा ताल).
साँवरिया देख ज़रा इस ओर
यूँ ना आँख चुरा चितचोर

मैँ हूँ सजना पिंजरे में गाती मैना
तू बन का है मोर
साँवरिया देख ज़रा इस ओर

तूने बाँधा कैसे धागे से मुझको
टूटे ना ये डोर
साँवरिया देख ज़रा इस ओर


“घर नाही हमरे श्याम” या गाण्यात आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनात नायिकेची व्यथा समजते.
घर नाही हमरे श्याम
वो जा के परदेस विराजे
सुना हमरा धाम
ठंडी ठंडी पुरवाई है, बगीयn मे मस्ती छायी है
पापी पपीहा हमरा बैरी, लेत पिया का नाम
घर नाही....
सावन आये जियरा तरसे
तन सुलगे जो मेहा बरसे
श्याम जो आके अंग लगा ले
मन पाए आराम
घर नाही....
या गाण्यातील प्रत्येक ओळीला आरती अंकलीकर यांचे गायनातील वैविध्य लाजवाब.


राह मे बिछी है पलके आओ  हे आरती अंकलीकर-टिकेकर  आणि शोभा जोशी यांचे युगुल गीत आहे.  दोघींनी गाण्याला वेगळी उंची दिली आहे. एक रेकोर्डिंग घुंगरूशिवाय आहे आणि एक घुंगरूसह.....दोन्ही वेगवेगळी ऐकावी.

राह में बिछी हैं पलकें आओ
फूल महके रंग झलके आओ
आए चमन मेँ फिरसे निखार
आओ जो तुम तो आए बहार
ऋतु लहके ऋतु बहके कली खिले चमन झूमे
राह में बिछी हैं पलकें आओ

रात किये है सोला सिंगार
मदिरा की हलकी है फुहार
मान भी जाओ एक बात
अब आके थाम लो ये हाथ
तन झूमे मन झूमे धरा गगन पवन झूमे
साँझ जागे जाम छलके आओ

रंग रूप और सुगंध
तोड़ते हैं सारे बँध
दिल है कि बेक़रार है
आओ के इन्तज़ार है
हर घुँघरू मेँ जादू छनन छनन छनन झूमे
पायलों से मोती ढलके आओ



घुंगरू शिवाय...



“हुजूर इतना अगर...” या गाण्याचा अर्थ काय वर्णावा.....साहेब (प्रियकर, लग्नाचे वचन दिले आहे तो) जरा मेहेरबानी केली असती तर बरे झाले असते, माझ्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा माझा कत्ल केला असता तर बरे वाटले असते.  इतके कष्ट होत असतील तर सोडून द्या... ईश्वराने उपकार केले आहेत त्यामुळे मी बरी आहे, पण वाईट एकाच गोष्टीचे वाटते कि हीच मेहेरबानी तुम्ही केली असती तर या आयुष्याचे सार्थक झाले असते.

हुज़ूर इतना अगर हम पर करम करते तो अच्छा था
तग़ाफ़ुल आप करते हैं सितम करते तो अच्छा था

कहा किसने के ये जोर-ओ-जफ़ा मत कीजियेए हम पर
बस इतनी-सी गुज़ारिश है के कम करते तो अच्छा था

ख़ुदा की महरबानी है के अच्छे हैं मगर ग़म है
ख़ुदा ने महरबानी की, सनम करते तो अच्छा था

ग़ज़ल में दर्द-ओ-ग़्हम अपने बयाँ करने से क्या होगा
ये बातें हम उन्हें ख़त में रक़म करते तो अच्छा था

हुजूर इतना अगर हम कर करम करते तो अच्छा था


हे जीवन अधिक खडतर झाले, काळे ढग जमा झाले जणू....आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या आवाजात..मल्हार रागावर आधारित गाण्यात आलाप आणि ताना फार उत्तम आणि भावपूर्ण.  (एकताल)

घीर घीर आयी बदरिया कारी
घिर घिर आई बदरिया कारी
घर घर लाई लाई महर मतवारी


काली काली कोयल कुहुके
डाली डाली भँवरा गूँजे
सन सन आएँ भीगी हवाएँ
घन घन काले बदरा बोले

छम छम बाजे बरखा पायल
छम छम बरसे बदरी पागल
गिन गिन तिन राह निहारूँ
किन किन नाम तोहे पुकारूँ

घिर घिर आई बदरिया कारी
घर घर लाई लाई महर मतवारी
घिर घिर आई बदरिया कारी


चली पी के नगर ही आरती अंकलीकर-टिकेकर यांची आवाजतली भैरवी अस्वस्थ करते... चित्रपटातल्या ठुमरी गायिकेची व्यथा जावेद अख्तर यांच्या शब्दात, अशोक पत्की आणि आरती अंकलीकर यांच्याकडून ऐकताना आपण त्या विश्वात जातो.

चली पी के नगर सजके दुल्हन
मैके में जी घबरावत है
अब साँचे नगर को जाना है
ये झूठा नगर कहलावत है

झूले पीपल अमुवा छाँव
पनघट मेले गलियाँ गाँव
बाबुल मैया सखियाँ अंगना
सब छोड के गोरी जावत है

दिल थम थम ऐसे धड़कत है
रह-रह के दिया ज्यों धड़कत है
मन तड़पत भी है मिलने को
और लाज भी मन को आवत है


सर्व गाणी हेडफोन वर या लिंकवर ऐकावी....आणि साउंड रेकोर्डिंग दर्जेदार म्हणजे काय याचा अनुभव घ्यावा.

https://gaana.com/album/sardari-begum

असे दर्जेदार संगीत ऐकवून आपले आयुष्य समृद्ध केल्याबद्दल अशोक पत्की, जावेद अख्तर, शुभा जोशी आणि आरती अंकलीकर यांचे ऋण शब्दात व्यक्त करणे अवघड आहे.


सुहास किर्लोस्कर



Comments

  1. सुहास जी लेख आवडला... गाणी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ऐकली, मग जास्त आवडली... धन्यवाद

    ReplyDelete
  2. गाणी ऐकण आणी गाणी समजून घेण व नंतर ती पुन्हा ती ऐकण हा बदल केवळ तूमच्या लेख वाचल्या नंतर झाला. गाण्या कडे बघण्याचा एक छान नजरिया दिल्या बद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  3. सुहास...लेख.वाचला..तुझे सर्वच लेख.मनापासुन वाचतो.
    एका वेगळ्या.नजरेतून.गाणी.ऐकत़ आहे.. गाणी.. अप्रतिम.आहेत..धन्यवाद...
    राजेंद्र पंडित....

    ReplyDelete
  4. सगळी गाणी एकत्रितपणे आजच प्रथम ऐकली.गीतकार,संगीतकार,वैशिष्टय़पूर्ण संगीत,वाद्यवृंदाचा वापर व गायिकांची वैशिष्ट्ये आपल्या लेखणी बरहुकूम ऐकले वर मिळालेला आनंद वेगळाच होता. आता कुठे कानसेन पणा म्हणजे काय हे कळायला लागले आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास