Posts

Showing posts from February, 2019

“राग सरिता” च्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये गुनिजान चर्चा

Image
“राग सरिता” च्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये गुनिजान चर्चा पंडित सी आर व्यास यांचे शास्त्रीय संगीतामधील योगदान मोठे आहे. गायनाव्यतिरिक्त त्यांनी अनेक बंदिशी गुनीजान नावाने लिहिल्या तसेच अनेक रागांची निर्मितीसुद्धा केली. धैवत नसलेला आणि कोमल निषाद असलेला कल्याण म्हणजे धनकोनी कल्याण राग पं सी आर व्यास यांना रियाज करताना सुचला. गुनीजान या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशीवर "राग सरिता" या संस्कार प्रकाशनद्वारे निर्मिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ त्यांचे सुपुत्र सुहास, सतीश आणि शशी व्यास यांनी आयोजीत केला. उस्ताद झाकिर हुसेन यांनी पं व्यास यांना पूर्वी तबलासाथ केली आहे आणि काही गुनीजान बंदिशीची त्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांच्या हस्ते प्रकाशन होणे समयोचित होते. झाकीर हुसेन यांनी सांगितले "भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये सांगितले आहे की "रंगती इति रागः" (that colours your mind). रागांचे सौंदर्य बंदीशींच्या रूपाने पं सी आर व्यास यांनी खुलवले, त्यामध्ये रंग भरले  आणि सुहास व्यास यांच्या प्रयत्नामुळे ते पुस्तकरूपाने आपल्यापर्यंत पोहोचत आहे. सी आर व्यास याना तब...

आये कुछ अब्र

Image
फैज़ अहमद 'फैज़'   यांनी "आये कुछ अब्र" या गझल मध्ये मैफिलीचा माहोल कसा असावा याचे वर्णन केले आहे. त्या गझलचा अर्थ आधी समजून घेऊ आणि नंतर ही गझल अनेक गायकांनी कशी पेश केली आहे याचा लुत्फ घेऊ.  गझलच्या व्याकरणानुसार ही उत्तम गझल आहे.  गझलची दुसरी ओळ ".......आब आये" याने संपते. मद्यसेवनाने सुरू झालेली गझल पुढे प्रेयसीची आस व्यक्त करत वेगळ्या वळणावर जाते आणि जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग दाखवते.   प्रत्येक शेर मधली दुसरी ओळ पहिल्या ओळीच्या अर्थाशी विरोधाभास दर्शवणारी आहे.   फैज अहमद फैज यांचे हेच तर कौशल्य. मदिरासेवन हे काही घटा घटा घाई गडबडीत उरकण्याचे कर्मकांड नव्हे.   त्याला एक माहोल असावा, शौकियाना अंदाज असावा आणि गप्पांच्या मैफलीत काही शेर-शायरी-गाना-बजाना शब्दांकडे लक्ष देऊन ऐकण्या-ऐकवण्याचा मौका शोधणारे रसिक "बसलेले" असावेत.....घरी कोणीतरी वाट पहात आहे याची शुद्ध नसावी, वेळेचे बंधन नसावे.  विमानाचे टेक ऑफ आणि हेलिकॉप्टरचे उडणे यातला फरक समजणारे यार असावे. आये कुछ अब्र कुछ शराब आये उसके बाद आये जो अज़ाब आये [अब्र = cloud , अज़ाब=...