अब्बाजी
3 फेब्रुवारी - अब्बाजी - उस्ताद अल्लारखां याना आदरांजली 3 फेब्रुवारी हा प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखा यांचा स्मृतीदिन. त्याना अभिवादन करण्यासाठी त्यांचे सुपुत्र उस्ताद झाकिर हुसेन एक संगीत समारोह दरवर्षी षण्मुखानंद हॉल, मुंबई येथे आयोजित करतात. या समारंभाची "वारी" करणे ही तबलावादकांसाठी पर्वणी असते. पहाटे 6.30 वाजता पहिले सत्र सुरु होते. यावर्षीच्या पहिल्या सत्रात उस्ताद अल्लारखा, गानसरस्वती किशोरी अमोणकर, सारंगीवादक ध्रुव घोष, सतारवादक उस्ताद रईस खाँ, विदुषी गिरिजा देवी याना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे गांभीर्य लक्षात घेऊन एकामागोमाग एक कलाकार स्वरमंचावर कलाकृती सादर करत होते, कोणत्याही निवेदनाशिवाय. त्यामुळे कार्यक्रमाचे वेगळेपण जाणवले. अनोख्या प्रार्थनेने सुरुवात झाल्यावर घोष या युवा कलाकाराने अहीर भैरव राग सादर केला. आलाप-जोड असे वादन करून सकाळचा माहोल निर्माण केला. तबल्यासाथ न घेता केलेले सादरीकरण आश्वासक होते. किशोरी अमोणकर यांची नात तेजश्री अमोणकर, शिष्या नंदिनी बेडेकर यानी किशोरीताईना वाहण्यासाठी राग अल...