Posts

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

Image
' गाता रहे....' या पुस्तकामधील लेखात उल्लेख केलेल्या गाण्यांची प्ले लिस्ट  संगीताची ओळख  मुखडा अंतरा संचारी  लय ताल तालाचे प्रयोग    वॉल्ट्झ बोसा नोवा        संगीत प्रकार     अभंग, भजन, भक्तिगीत, प्रार्थना   सुफी, कव्वाली गझल  ठुमरी, दादरा, चैती, होरी   लोकसंगीत  रविंद्र संगीताचे माधुर्य      जॅझ , पॉप , रॉक... गाणे तयार होताना... संगीत दिग्दर्शन   संगीत संयोजन   तालवाद्य संयोजन       स्केल चेंज आणि मूर्च्छना यॉडलींग गाण्यातला पॉझ   कमीत कमी वाद्यांचा वापर असलेली गाणी गाण्यातला भाव - अभिनय आवाज की दुनिया       पार्श्वसंगीत      वाद्य संगीत     अकॉर्डीयन       पियानो बासरी   क्लॅरीनेट सॅक्सोफोन        ब्रास सेक्शन – ट्रम्बोन - ट्रम्पेट      फ्लुगेलहॉर्न – ट्रम्पेट    ...

“राग सरिता” च्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये गुनिजान चर्चा

Image
“राग सरिता” च्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये गुनिजान चर्चा पंडित सी आर व्यास यांचे शास्त्रीय संगीतामधील योगदान मोठे आहे. गायनाव्यतिरिक्त त्यांनी अनेक बंदिशी गुनीजान नावाने लिहिल्या तसेच अनेक रागांची निर्मितीसुद्धा केली. धैवत नसलेला आणि कोमल निषाद असलेला कल्याण म्हणजे धनकोनी कल्याण राग पं सी आर व्यास यांना रियाज करताना सुचला. गुनीजान या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशीवर "राग सरिता" या संस्कार प्रकाशनद्वारे निर्मिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ त्यांचे सुपुत्र सुहास, सतीश आणि शशी व्यास यांनी आयोजीत केला. उस्ताद झाकिर हुसेन यांनी पं व्यास यांना पूर्वी तबलासाथ केली आहे आणि काही गुनीजान बंदिशीची त्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांच्या हस्ते प्रकाशन होणे समयोचित होते. झाकीर हुसेन यांनी सांगितले "भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये सांगितले आहे की "रंगती इति रागः" (that colours your mind). रागांचे सौंदर्य बंदीशींच्या रूपाने पं सी आर व्यास यांनी खुलवले, त्यामध्ये रंग भरले  आणि सुहास व्यास यांच्या प्रयत्नामुळे ते पुस्तकरूपाने आपल्यापर्यंत पोहोचत आहे. सी आर व्यास याना तब...

आये कुछ अब्र

Image
फैज़ अहमद 'फैज़'   यांनी "आये कुछ अब्र" या गझल मध्ये मैफिलीचा माहोल कसा असावा याचे वर्णन केले आहे. त्या गझलचा अर्थ आधी समजून घेऊ आणि नंतर ही गझल अनेक गायकांनी कशी पेश केली आहे याचा लुत्फ घेऊ.  गझलच्या व्याकरणानुसार ही उत्तम गझल आहे.  गझलची दुसरी ओळ ".......आब आये" याने संपते. मद्यसेवनाने सुरू झालेली गझल पुढे प्रेयसीची आस व्यक्त करत वेगळ्या वळणावर जाते आणि जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग दाखवते.   प्रत्येक शेर मधली दुसरी ओळ पहिल्या ओळीच्या अर्थाशी विरोधाभास दर्शवणारी आहे.   फैज अहमद फैज यांचे हेच तर कौशल्य. मदिरासेवन हे काही घटा घटा घाई गडबडीत उरकण्याचे कर्मकांड नव्हे.   त्याला एक माहोल असावा, शौकियाना अंदाज असावा आणि गप्पांच्या मैफलीत काही शेर-शायरी-गाना-बजाना शब्दांकडे लक्ष देऊन ऐकण्या-ऐकवण्याचा मौका शोधणारे रसिक "बसलेले" असावेत.....घरी कोणीतरी वाट पहात आहे याची शुद्ध नसावी, वेळेचे बंधन नसावे.  विमानाचे टेक ऑफ आणि हेलिकॉप्टरचे उडणे यातला फरक समजणारे यार असावे. आये कुछ अब्र कुछ शराब आये उसके बाद आये जो अज़ाब आये [अब्र = cloud , अज़ाब=...

खुली जो आंख तो …………

Image
सहसा संगीतातला नवीन प्रकार ऐकायला आपली सुरुवात होते ती लोकप्रिय काय असेल ते कानावर पडल्यावर.  गझलच्या बाबतीत माझेही असेच झाले...सिनेसंगीतामधील गझल ऐकल्या. अर्थमधील गाणी आवडली, उमराव जान सारख्या सिनेमातील काही शायरी समजायला लागली पण तो आपला प्रांत नव्हे असे वाटायचे.  त्यानंतर निकाह चित्रपटामुळे गुलाम अली यांची ओळख झाली.  चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद ही गझल पॉझेस, तबल्याची साथ आणि एकूणच त्यामुळे होणारा माहोल यामुळे आवडली.  नंतर माझा भाऊ सुधीर किर्लोस्कर याने गझल अभ्यासपूर्वक ऐकायला सुरुवात केली आणि नंतर त्याने “कहेना उसे” ही कॅसेट आणली, उर्दू-मराठी डिक्शनरी आणली आणि त्यातल्या गझलचा अर्थ सांगण्यास सुरुवात केली.  मेहदी हसन यांच्या एकसे एक गझल.  आधी त्यातले संगीत फार हळूवार असल्यामुळे आवडले म्हणजे धून आवडल्या.  अर्थ समजायला लागल्यावर डोळे उघडले आणि प्रचिती आली कि खरी गझल ती हीच......  खुली जो आंख तो........ तू आयुष्यात आलीस ते दिवस किती सुंदर होते.  ते प्रेम, त्या आणाभाका....आयुष्यभर साथ न सोडण्याच्या. ते दिवस स्वप्नातीत होते....

मैं बंगाली छोकरा........

Image
आभासकुमार गांगुली, ज्याला आपण किशोरकुमार म्हणून ओळखतो त्याचे गाण्यातले अनेक पैलू आपण ऐकले आहेत.  हा हरहुन्नरी कलाकार चित्रपटसृष्टीत आला गायक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पण मिळेल ते काम कर असा वडिलबंधू अशोककुमार याचा सल्ला मानून त्याने नाईलाज म्हणून अभिनय केला.  लेखक, दिग्दर्शक, निर्माता, स्टेज परफोर्मर, गीतकार, संगीतकार अशा विविधांगी भूमिका वठवल्या तरीही त्याला सगळ्यात जास्त प्रिय होते संगीत.  हिंदी चित्रपट संगीतातील या गांगुली कुलवंशीय महान कलाकाराने अनेक बंगाली गाणी गायली आहेत, हिंदी गाण्यात या बंगाली बाबूने जमेल तिथे आपले बंगाली रूप दाखवले आहे.  आज त्यांच्यातल्या बंगाली बाबूची ओळख करून घेऊ.... “कुवे मे कुद के मर जाना, यार तुम शादी मत करना” या परिवार चित्रपटातील (सलील चौधरी) गाण्याच्या सुरुवातीला विहिरीतून प्रकट होताना आवाज बसल्याचे सोंग काढत किशोर म्हणतो, “कुवे मे....(योडलींग करत...)....”थोंडा जोल मे नोहाने से गोला बैठ गोया....”   चलती का नाम गाडी या चित्रपटात पांच रुपैय्या बारा आणा या गाण्यात चक्क गुरु संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांचीच नक्क...

लक्ष्मीकांत प्यारेलाल – राजन साजन मिश्रा यांचा सूर संगम

Image
कॉलेजमध्ये असताना लक्ष्मीकांत प्यारेलाल हे माझे आवडते संगीतकार होते.  त्यांची गाणी तेवढ्या काळापुरती तरी लोकप्रिय असायची.  त्यांचे पॉझेस, ओर्केस्ट्रेशन, व्हायोलीनचा वापर असे बरेच काही.  राजेश खन्ना-जितेंद्रचे काही सिनेमे फक्त लक्ष्मी-प्यारे यांच्या गाण्यासाठी बघितले होते.  याच काळात सूरसंगम हा वेगळा सिनेमा आला आणि त्यातल्या गाण्यांचे वेगळेपण लक्षात आले.  तेव्हा ही गाणी वेगळी वाटली पण नेमकी का आवडतात हे सांगता येत नव्हते.  नंतर शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाल्यावर सूरसंगम या चित्रपटाची गाण्यातले सौंदर्य लक्षात आले.  चित्रपट पुन्हा पाहिला.  शंकरभरणम या तेलुगु चित्रपटाची रिमेक असलेल्या या चित्रपटाची गाणी एक से बढकर एक आहेत.  लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या दर्जेदार चित्रपटापैकी एक.  एक दुजे के लिये, चरस, दोस्ती, कर्मा वगैरे चित्रपटातले लोकप्रिय लक्ष्मी-प्यारे वेगळे आणि चित्रपटाच्या दर्जाप्रमाणे सांगीतिक दर्जा उंचावणारे उत्सव, सूरसंगम चित्रपटाचे लक्ष्मी-प्यारे वेगळे.  अशाच वेगळ्या गाण्यांचा हा मागोवा.... आयो प्रभात सब मिल...