मैं बंगाली छोकरा........
आभासकुमार गांगुली, ज्याला आपण किशोरकुमार म्हणून ओळखतो त्याचे गाण्यातले अनेक पैलू आपण ऐकले आहेत. हा हरहुन्नरी कलाकार चित्रपटसृष्टीत आला गायक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पण मिळेल ते काम कर असा वडिलबंधू अशोककुमार याचा सल्ला मानून त्याने नाईलाज म्हणून अभिनय केला. लेखक, दिग्दर्शक, निर्माता, स्टेज परफोर्मर, गीतकार, संगीतकार अशा विविधांगी भूमिका वठवल्या तरीही त्याला सगळ्यात जास्त प्रिय होते संगीत. हिंदी चित्रपट संगीतातील या गांगुली कुलवंशीय महान कलाकाराने अनेक बंगाली गाणी गायली आहेत, हिंदी गाण्यात या बंगाली बाबूने जमेल तिथे आपले बंगाली रूप दाखवले आहे. आज त्यांच्यातल्या बंगाली बाबूची ओळख करून घेऊ....
“कुवे मे कुद के मर जाना, यार तुम शादी मत करना” या परिवार चित्रपटातील (सलील चौधरी) गाण्याच्या सुरुवातीला विहिरीतून प्रकट होताना आवाज बसल्याचे सोंग काढत किशोर म्हणतो, “कुवे मे....(योडलींग करत...)....”थोंडा जोल मे नोहाने से गोला बैठ गोया....” चलती का नाम गाडी या चित्रपटात पांच रुपैय्या बारा आणा या गाण्यात चक्क गुरु संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांचीच नक्कल त्यांच्याच दिग्दर्शनाखाली किशोरने अशी काही केली आहे कि कदाचित सचिन देव बर्मनसुद्धा त्याला थांबवू शकले नसावेत.
आपल्याला माहित असेल कि आराधना (१९६२) हा चित्रपटाची पार्श्वभूमी बंगालीच आहे. “कोदाचीत” त्यामुळे चित्रपट निर्मात्याने १९६९ साली हा चित्रपट बंगाली भाषेत डब केला. संगीतकार सचिन देव बर्मन यांनी गाणी बंगाली भाषेत ध्वनिमुद्रित केली. रफीच्या आवाजातले गाणे राहुल देव बर्मन यांनी गायले आणि किशोरची सर्व गाणी त्यानेच बंगाली भाषेत गायली.
मोर शोपनोरोई शाथी / मेरे सपनो कि रानी - आराधना
एतो काछे दुजोने / रूप तेरा मस्ताना आराधना - बंगाली - सचिन देव बर्मन
याच चित्रपटात रफीचे गाणे “गुनगुना रहे है भवर” बंगाली भाषेत आशा भोसले यांच्याबरोबर किशोरकुमारने गायले आहे – “गुंजोने डोले जे भ्रोमोर”. रसिकांनी आपापल्या परीने त्या दोन्ही गाण्यांची तुलना करावी अर्थात तुलना करताना वर्षानुवर्षे ऐकलेल्या गाण्याची इम्प्रेशन्स लक्षात न घेता.
“सिंग नै तोबु नाम तार सिंघो” हे अफलातून बंगाली गाणे जाहिरातीमुळे अलीकडे प्रसिद्ध झाले त्यामुळे आपण ऐकले असेल. लुकोचुरी चित्रपटातील या गाण्यात किशोरने केलेली धमाल बिनतोड आहे. हे गाणे एकदा गाण्याचा प्रयत्न केला की अवघड काय आहे ते समजते. या सिनेमाचा निर्माता किशोरकुमार होता तर संगीत दिग्दर्शक हेमंतकुमार !!.
याच लुकोचुरी या चित्रपटातील गाण्यात किशोरकुमारचे योडलींग ऐकता येते, बोंगाली भाषेत, एक पोलोके एकतु देखा. बंगाली भाषेचा लहेजा, हेमंतकुमार यांचे संगीत आणि किशोरकुमारचा आवाज असा त्रिवेणी संगम श्रवणीय.
कमल हसनचा सनम तेरी कसम चित्रपट आला होता तोपर्यंत त्याच्यासाठी पार्श्वगायन एस पी बालसुब्रमण्यम ऐकण्याची सवय झाली होती. राहुल देव बर्मन यांनी किशोरकुमारचा आवाज वापरला तेव्हा वाटले होते हे प्रथमच होत आहे. परंतु किशोरकुमार यांनी कमल हसन साठी पार्श्वगायन बंगाली चित्रपटात केले आहे.....१९७७ साली. कमल हसन यांनी बंगाली चित्रपटात अभिनय केला आहे, चित्रपटाचे नाव कबिता. कमल हसनची नायिका आहे माला सिन्हा आणि संगीतकार आहेत सलील चौधरी. या चित्रपटातील गाणे “शूनो शूनो गो साबे” बघण्यासारखे आहे.
रवींद्रनाथ टागोर यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट सत्यजित राय यांनी दिग्दर्शित केला शिवाय संगीत दिग्दर्शन सुद्धा सत्यजित राय यांचेच. वेगळा किशोरकुमार चारूलोता या चित्रपटात “आमी चिनी गो चिनी तोमारे” या गाण्यात ऐकायला मिळाला. हा चित्रपट १९६४ सालचा आहे.
राजकुमार या चित्रपटात उत्तमकुमार आणि तनुजा यांनी अभिनय केला होता. बंगालमध्ये उत्तमकुमारला हेमंतकुमारचा आवाज हे समीकरण ठरले होते पण त्याला छेद देत उत्तमकुमारला राहुल देव बर्मन यांनी किशोरकुमारचा आवाज वापरला. अर्थात बंगाली जनतेने त्याचा लगेच स्वीकार केला नाही. चित्रपटातील गाणी काही कालानंतर गाजली. त्यातलेच एक गाणे “तोबू बोले कॅनो”.
हीच स्वतःची धून वापरून राहुल देव बर्मन यांनी बंधे हाथ या चित्रपटासाठी टायटल सॉंग तयार केले. किशोरने ते इतके उत्कटतेने गायले आहे कि या गाण्यातून आपण लवकर बाहेर येत नाही. बंगाली गाण्यातले भाव आणि हिंदी गाण्यातले भाव वेगळे आहेत ते किशोरकुमारने समर्थपणे व्यक्त केले आहेत. हे गाणे ऐकल्यावर मला नेहमीच मजबूर सिनेमातील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले “आदमी जो कहेता है, आदमी जो सुनता है, जिंदगी भर वो सजाये पिछा करती है” या गाण्याची आठवण होते. अमिताभने दोन्ही गाण्यातील प्रसंग सारखाच आहे आणि हतबलता अमिताभच्या डोळ्न्यातून दिसते. या गाण्यात अकोर्डीयनमुळे वेगळा परिणाम साधला आहे.
राजकुमारी (१९७०) या बंगाली चित्रपटातील “ए कि होलो, क्या नो होलो, कोबी होलो, जानी ना....” हे गाणे आपल्या परिचयाचे आहे. तरीही आधी बंगाली गाणे पूर्ण ऐकावे असेच मला वाटते. कधी कधी गाणे ओळखले कि मुळ गाण्यातली गंमत काय आहे ती लक्षात घ्यायचे राहते.
१९७२ साली अमर प्रेम सिनेमामधील सर्व गाणी सुमधुर होती. राहुल देव बर्मन यांनी स्वतःची धून हिंदीमध्ये वापरून गाणे सर्व भारतात लोकप्रिय केले. “ये क्या हुवा, कैसे हुवा, कब हुवा”
“आज गुन गुन गुन, गुंजे आमा, एकी गुंजोरो” ही राहुल देव बर्मन यांची मुळ धून किशोर आणि आशा भोसले यांनी गायली आहे, त्यावरून घेतलेले गाणे “प्यार दिवाना होता है” आपल्या परिचयाचे आहे. तरीही मुळ गाणे ऐकण्याचा आनंद वेगळाच....पाटी कोरी करून ऐकणे सोपी गोष्ट नाही, प्रयत्न करून पहा, अशा भोसले यांच्या गायकीतला गोडवा लक्षात येतो.
बोन्धो तारेर ओंधो कारे ओखबो ना.....हे आशा-किशोर-आरडी यांचे गाणे वेगळ्या ओर्केस्ट्रेशन साठी ऐकावे. नायक नायिका कार मध्ये बसल्यामुळे त्याची वाद्ये वेगळी आहेत. हेच गाणे हिंदीमध्ये घेताना राहुल देव बर्मन यांनी क्लब सॉंग केले आणि त्याचे वेगळेच रूप आपल्या परिचयाचे झाले. “आप के कमरे के कोई रहेता है “ हे यादो कि बारात मधील गाणे त्याच्या वेगळ्या बाजासाठी गाजले.
अमानुष हा चित्रपट बंगाली आणि हिंदी दोन्ही भाषेत तयार केला होता. बंगाली चित्रपटातील गाणी त्या भाषेचा पोत ओळखला तर फार सुरेख वाटतात. आनंद आश्रम चित्रपटातील “आशा छिलो, भालो बाशा” या गाण्यात गंभीर प्रकृतीचा किशोर ऐकता येतो. उत्तमकुमारचा अभिनय उत्तम आहे हे काय वेगळे सांगायला हवे ?
सलील चौधरी यांचे एक गाणे “मोने पोरे सेई सब दिन” किशोरने फार अनोख्या आवाजात गायले आहे. किशोर गातो त्याच वेळेस साक्सोफोन वाजतो....खास सलील चौधरी यांची काँट्रा मेलडी या गाण्यात ऐकण्यासारखी आहे.
“अंधो आलो छायाते” हे बंगाली गाणे किशोरकुमार आणि आशा भोसले यांनी गायले आहे, मिथुन आणि शर्मिला टागोर यांच्यासाठी. संगीतकार राहुल देव बर्मन.
बप्पी लाहिरी हे खरे तर मुळचे बंगालचे. त्यांनीसुद्धा बंगाली भाषेत बरीच गाणी केली आहेत. “एक दिन आरो गेलो” या गाण्यात वेगळाच बप्पी लाहिरी समोर येतो. गाण्यात बंगाली लहेजा आहेच शिवाय बप्पी लाहिरी यांची धून वेगळीच आहे. बंगाली तालवाद्य खोल वाजते त्यामुळे टिपिकल बंगाली भावदर्शन होते.
रागिणी या सिनेमातील “मैं बंगाली छोकरा” हे ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेले गाणे किशोर आणि आशा यांनी त्या त्या भाषेच्या ढंगात गायले आहे. गाण्याची सुरवात सारंगी-तबलाने होते. नंतर क्लारोनेट आणि घुंगरू ही वाद्ये वाजतात. गाण्याचे शब्द क़मर जलालाबादी यांचे
मैं बांगाली छोकरा, कोरुं प्यार को नोमोश्कारम
मैं मद्रासी छोकरी, मुझे तुमसे प्यारम (शोत्ती रे)
हमरे बांगला देश में हर गोरी के लम्बे बाल
लुचिर उपोर पोर दाल, लोखी नाचे ताले-ताले
खाये शुधु मच्छी झाल खाये गो, शुधु खाये गो
हमरे बांगला देश में हर गोरी के लम्बे बाल
आज तो हर बाजार में सैय्याँ मिलता नकली माल
करुँगी तेरे वास्ते सोला सिंगारम
(मोरे जाई मोरे जाई)
मैं मद्रासी छोकरी...
तुम जो सुनो बांगाली गाना मोनवा जाये झूम
शोखी-गो तोमाय कैमोन कोरे पाबो
तुम जो सुनो बांगाली गाना मोनवा जाये झूम
देरेना देरेना धीमतानादेरेना
मेरे बांके नाच की सैय्याँ मची रूस में धूम
(ओरे बाबा)
मैं हूँ पायल साजना और तू झंकारम
मैं मद्रासी छोकरी...
सच पूछो तो मेरे दिल में प्यार इल्ले-इल्ले
ओ बांगाली मेरा हो जा कहती है मिस पिल्लै
सच पूछो तो मेरे दिल में प्यार इल्ले-इल्ले
ओ बांगाली मेरा हो जा कहती है मिस पिल्लै
पप्पी तुझे पुकारती गंगोली यारम
(की बौले रे)
मेरा हो जा साजना फिर बेड़ा पारम
मैं बांगाली छोकरा...
Donald Rumsfeld यांचे एक प्रसिद्ध वचन आहे....... There are known knowns. There are things we know that we know. There are known unknowns. That is to say, there are things that we now know we don't know. But there are also unknown unknowns. There are things we do not know we don't know. याचा अर्थ, आपल्याला काय माहित आहे आणि काय माहित नाही हे समजणे फार महत्वाचे आहे. असे काही विषय असतात किंवा विषयातील घटक असतात त्याबद्दल आपल्याला माहित नाही हे आपल्याला समजत असते. उदाहरणार्थ किशोरची बंगाली गाणी बंगाली लोकाना माहित आहेत पण महाराष्ट्रातील रसिक श्रोत्यांना माहित असतीलच असे नाही...पण आपल्याला हे माहित आहे कि किशोरने बंगाली भाषेत काही गाणे गायली आहेत. (Known unknown). याव्यतिरिक्त आपल्याला काय माहित नाही याची सुद्धा आपल्याला कल्पना नसते, उदाहरणार्थ आपल्याला आपलेच संगीत हे जगात भारी आणि शास्त्रीय वाटत असते (unknown unknown). आपण नेहमी आपल्याला काय माहित आहे याबद्दल वृथा अभिमान बाळगण्यापेक्षा माहित नसलेले काय आहे याचा शोध घेणे सयुक्तीक. किशोरची बंगाली गाणी अनेक आहेत त्यातल्याच काही गाण्याचा (known unknown) शोध घेण्याचा हा एक प्रयत्न. अर्थात किशोरची बंगाली गाणी - सोलो आणि युगुल गीते बरीच आहेत. आज आपण काही बंगाली गाणी ऐकली. किशोरने गायलेली कन्नड, भोजपुरी, मल्याळम, गुजराथी, मराठी गाणी सुद्धा आहेत.
या लेखाचा शेवट सलील चौधरी यांच्या किशोरने गायलेल्या हिंदी गाण्याने करू जे गाणे सहसा ऐकले जात नाही.....
मन करे याद वो दिन
तेरे संग बीते थे जो पल रंगीन
तेरे संग देखे थे जो सपने हसीन
कभी छांव मे हम चले, जले धूप मे भी हम तुम साथ मे
कभी साथ साथ भिगे बरसात मे
कभी तो पता
सुहास किर्लोस्कर
Good one . very informative.
ReplyDeleteWhat a studios compilation Suhasji ! A very soothing presentation of classic Kishorda.
ReplyDeleteSantosh Bora
ReplyDelete