तो मुसाफिर क्या करे.....



सदाबहार गाणी म्हणजे काय ? जी गाणी आपल्याला काही काळानंतर सुद्धा परत ऐकावी अशी वाटतात किंवा आपल्याला त्या माहोलमधें घेऊन जातात, मग भलेही ती गाणी कोणत्याही काळातली असोत, कोणत्याही संगीतकाराची असोत किंवा कोणीही गायलेली असोत.


मंजिले अपनी जगह है...हे सदाबहार गाणे किशोरकुमारने अशा काही दर्दभऱ्या आवाजात गायले आहे की त्याला तोड नाही.  अंजान यांची सुंदर शब्दरचना शब्द साधारणपणे "चिंगारी कोई भड़के" या गाण्यासारखे.  तरीही मला वाटते हे गाणे आधी तयार झाले असावे आणि नंतर दिग्दर्शक प्रकाश मेहरा यानी तसा प्रसंग तयार केला.


गाणे एका विरोधाभासी शेर ने सुरु होते,


मंज़िलों पे आ के लुटते, हैं दिलों के कारवाँ
कश्तियाँ साहिल पे अक्सर, डूबती है प्यार की


इच्छित स्थळी पोहोचल्यावर प्रेम मिळाले नाही, प्रेमाची नौका (प्रवास)  किनाऱ्याला आल्यावर डुबते, लक्ष्य गाठल्यावर काफिल्याचा सर्वनाश होत आहे

हा किशोरकुमारचा आवाज आहे की अमिताभचा अशी शंका यावी इतका अप्रतीम अभिनय किशोरकुमारने गाताना केला आहे.


मंज़िलें अपनी जगह हैं, रास्ते अपनी जगह
जब कदम ही साथ ना दे, तो मुसाफिर क्या करे
यूं तो है हमदर्द भी और हमसफ़र भी है मेरा
बढ़ के कोई हाथ ना दे, दिल भला फिर क्या करे



"बढ़ के कोई हाथ ना दे" इथे हाथ या शब्दाला जो आवाज बदलला आहे त्याला पत्ती लावणें म्हणतात (आठवा...सचिन देव बर्मन...सफल होगी तेरी आराधना). याची पुनरावृत्ती केली की योडलिंग होते. किशोरचा आवाज असा काही खर्जातला आहे की आपण लगेच त्याच्या दुःखाशी जोडले जातो. किशोरकुमारची हिच खासियत आहे, त्याची गाणी आपली वाटतात, आपण गायला सुरुवात करतो. डूबने वाले को तिनके का सहारा ही बहुत दिल बहल जाए फ़क़त इतना इशारा ही बहुत इतने पर भी आसमां वाला गिरा दे बिजलियाँ कोई बतला दे ज़रा ये डूबता फिर क्या करे मंजिलें अपनी जगह... बुडत्याला काडीचा आधार, तोही आधार काढून घेतला तर या प्रेमात बुडालेल्याने कोणाकडे आधारासाठी पहायचे? सेक्सोफोनचा चपखल वापर. प्यार करना जुर्म है तो, जुर्म हमसे हो गया काबिल-ए-माफी हुआ करते नहीं ऐसे गुनाह तंगदिल है ये जहां और संगदिल मेरा सनम क्या करे जोश-ए-जुनूं और हौसला फिर क्या करे मंज़िलें अपनी जगह... प्रेम करण्याचा गुन्हा झाला आहे आणि या अपराधा क्षमा नसतो. हे जग कोत्या मनाचे आहे आणि माझी प्रेयसी पाषाणहृदयी. अशा परिस्थितीमधे माझ्या आशा-आकांक्षा-इच्छा-धीर न सोडण्याच्या माझ्या वृत्तीचा (हौसला) काय उपयोग ? शराबी सिनेमा अमिताभ-प्राणच्या अभिनयासाठी बघण्यासारखा आहे. अमिताभचे डोळे बोलतात, दिपक पराशरचे बोलत नाहीत त्यामुळे अभिनय कसा असावा आणि नसावा हे एकाच शॉटमधें दिसते. अमिताभच्या या सिनेमात मारधाड नाही. कभी कभी, जुर्माना, बेमिसाल, शराबी अशा सिनेमातला अमिताभ वेगळा, नमक हलाल - चुपके चुपके - हेराफेरी मधला अमिताभ वेगळाच्. एक काळ असा होता कि प्राणने फक्त अमिताभच्याच सिनेमात काम करणार असे ठरवले होते. कालिया-मजबूर-दोस्ताना-शराबी मधले दोघांचे प्रसंग बघण्यासारखे. शराबी सिनेमा ओमप्रकाशच्या "मुन्शीजी" च्या अभिनयासाठी सुद्धा लक्षात राहिला. प्रकाश मेहरा यानी ओमप्रकाश यानाही वेगवेगळे रोल दिले, त्याचे ओम्प्रकाशने सोने केले.....जंजीर मधला दारुडा ते नमक हलाल मधला दद्दू. शराबी सिनेमातील सर्वच गाणी अनोखी आहेत. शराबी सिनेमाचे अविस्मरणीय संगीत दिले आहे बप्पी लाहिरी यानी. आता बप्पी कशासाठी लक्षात ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. बप्पी लाहिरी यानी ताकी-ताकी-ताथैया-ताथैया सारखी गाणी दिली तेवढीच गाणी शराबी-नमक हलाल-ऐतबार वगैरे चित्रपटासाठी सुद्धा दिली. बप्पी लाहिरी हे नाव उच्चारले की जर विदेशी धुन वर आधारीत गाणी आठवत असतील तर तेवढीच गाणी भारतीय शास्त्रीय संगीतावरही आधारीत आहेत. आपणही दुटप्पी असतो, रागावर आधारीत गाणें असेल तर अभिमानाने सांगतो, विदेशी धुनवर असेल तर आपला स्वर हेटाळणीचा असतो. एका संगीतप्रेमी ग्रुपवर असा निर्णय घेतला की फक्त शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणीच शेयर करू. त्याना विचारले, "शराबी सिनेमातले - लोग कहेते है मैं शराबी हूं" शास्त्रीय रागावर आधारीत आहे, ते शेयर करू?" यावर उत्तर मिळाले, नको, ते बप्पी लाहिरी यांचे गाणें आहे !! आपल्याला रस नक्की कशात आहे? बहुश्रुत होण्यात की आपापली आवड सांभाळण्यात ? के एल सैगल पासून बप्पी लाहिरीपर्यंत, पंकज मलिक पासून अमित त्रिवेदी पर्यंत विविध संगीतकारांची गाणी आपण लक्ष देऊन ऐकत असु आणि "मंजिले...." सारखी गाणी आवडत असतील तर ते उघडपणे सांगताना अभिनिवेश कशाला? मंज़िलें अपनी जगह हैं, रास्ते अपनी जगह जब कदम ही साथ ना दे, तो मुसाफिर क्या करे यूं तो है हमदर्द भी और हमसफ़र भी है मेरा बढ़ के कोई हाथ ना दे, दिल भला फिर क्या करे याच ओळी किशोर ने गाण्याच्या सूरूवातीला कशा गायल्या ते ऐकावे, शेवटी कशा गायल्या ते पुन्हा ऐकावे. दुःख गहिरे झाले म्हणजे काय याचे प्रत्यंतर येईल. हेच गाणें किशोरकुमार चे लाइव्ह ऐकण्यात वेगळाच आनंद घेता येईल. या गाण्या आधी बहुदा कोणतेतरी धमाल गाणें झाले असावे. त्यानंतर किशोर मुड़ कसा बदलतो ते बघण्यासारखे..... या आवलिया कलाकाराला सलाम




सुहास किर्लोस्कर








Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास