औरों पे करम, बच्चों पे सितम
लहान मुलांची गाणी म्हणजे सिनेमात लहान
मुलांच्या तोंडी असणारी गाणी लिहिणे अवघड काम आहे, ऐकायला सोपे
वाटत असले तरीही. गुलजार यानी लिहिलेली
"लकड़ी की काठी (मासूम)" किंवा "अ आ इ ई, मास्टरजी की आ
गयी चिठ्ठी (किताब)" अशी गाणी उदाहरण म्हणुन सांगता येतील. अशा गाण्यात लहान मुलांचीच भाषा हवी, त्यासाठी
पुढच्या जनरेशन बरोबर कनेक्ट हवा.
हल्लीच्या जमान्याला नावे ठेवण्याची मानसिकता असणाऱ्याना अशी गाणी लिहिणे
जड़ जाईल. लहान मुले काय ऐकतात, काय
बोलतात, त्याना काय खायला आवडते हे सर्व माहित असेल तर मुलांच्या भाषेत
मुलांचे गाणें होते.
दंगल सिनेमामधें वडिलांच्या भूमिकेत आमिर खान
आहे, त्याचे कुस्तीचे स्वप्न त्याला दोन्ही मुलींच्या कडून पूर्ण करवून
घ्यायचे आहे, आधी त्याचे मुलगा व्हावा हे स्वप्न पूर्ण होत
नाही त्यामुळे एकदा मुलींचा गुण समजल्यावर तो मुलींना कुस्ती शिकवण्याचे ठरवतो.
कुस्ती करायची तर व्यायाम करायला हवा, खाण्यावर बंधन हवे, लवकर
उठणे वगैरे शिस्त हवी.....या सगळ्याला कंटाळून लहान मुलीनी आपली व्यथा आणि
शिस्तबद्ध वडिलांबद्दल तक्रार या गाण्यात सांगीतली आहे....
औरों पे करम, बच्चों पे सितम
रे बापू मेरे ये ज़ुल्म ना कर
ये ज़ुल्म ना कर..
13 वर्षाच्या
सरवार खान, सरताज खान या जेसलमेर जवळच्या छोट्या गावातल्या
गायकांनी सूरूवातीलाच असा काही आवाज लावलाय की बंडाची निशाणीच जणू, "अरे
आव्वाज कुणाचा" अशा घोषणा नेहमीच वरच्या स्वरात असतात, त्यांमुळे हाय
पिच.... पण हे बंड मनातल्या मनात.....वडिलांसमोर बोलणार कोण, काहीही
तक्रार केली तर त्या बापूचे उपाय म्हणजे नविंन शिक्षाच...
हार्मोनियमच्या साथीला आहे खरताल, हे
एक तालवाद्य आहे, जसे चिमटा, चिपळ्या वाजवतात
तसे हे वाद्य राजस्थानी लोकसंगीतामधे ऐकू येते. कर म्हणजे हाताने धरलेल्या तालाचे
वाद्य... खरताल.
बापू सेहत के लिए, तू तो हानिकारक
है
हम पे थोड़ी दया तो करो, हम नन्हे बालक
है
डिसिप्लीन इतना, ख़ुदकुशी के लायक
है
बापू सेहत के लिए, तू तो हानिकारक
है
अमिताभ भट्टाचार्य यानी मुलांच्या भाषेत गाणें
लिहून त्यांची व्यथा त्यांच्या शब्दात अशी काही चपखलपणे मांडली आहे की बाकीच्या
गीतकाराना हेवा वाटावा. प्रितम यांचे संगीत प्रसंगाप्रमाणे आणि आजुबाजुच्या
वातावरणाला अनुसरुन....
जहीरा वसीम, सुहानी भटनागर
यानी फार सुरेख काम केले आहे, आमिर खानने पूर्ण सिनेमात जे भूमिकेचे
बेअरिंग सांभाळले आहे त्याला तोड़ नाही. निलेश
तिवारी चे दिग्दर्शन फार सुरेख आणि हटके.या गाण्याचे हरियाणा मधें झालेले शूटिंग
बघण्यासारखे आहे, शब्दाला अनुरूप. हा सिनेमा प्रकाशयोजनेसाठी पुन्हा एकदा बघायचा
आहे.
(3 मुलांचा कोरस, राजस्थानी
लोकसंगीतातील हरियाणवी गाणा !! )
तन्ने बोला पिकनिक शिक्निक जाना है मना
यो तो टार्चर है घाना
रे बच्चो से ई बोले, के ना करना
बचपना
यो तो टार्चर है घाना
रे बापू
टॉफ़ी चूरन खेल खिलोने, कुलचे नान पराठा
केह गए हैं टाटा, जबसे बापू तूने
डाटा
जिस उम्र में शोभा देते, मस्ती सैर सपाटा
उस उम्र को नाप रहा है, क्यूँ घडी का
कांटा
अपनी किस्मत की गाडी की, खस्ता हालत है
ओ रे म्हारे
बापू, इस घडी के वाहन चालक हैं
बापू .......
दंगल हा आमिर खान चा अजून एक उत्कृष्ट
सिनेमा. Road less travelled, वेगळी
वाट धरणारा. कमर्शियल चौकटीमधे राहुनसुद्धा वेगवेगळे धाडस आमिर करत राहिला आहे,
तारे
जमीन पर त्यापैकीच एक.
(मुलांचा कोरस)
तन्ने बोला खट्टा तीखा खाना है मना
यो तो टार्चर है घाना
मिटटी की गुडिया से बोले, चल
बॉडी बना
यो तो टार्चर है घाना
तेल लेने गया रे बचपन, झड गयी रे
फुलवारी
कर रहे हैं जाने कैसी, जंग की तैयारी
सोते जागते छूट रही है, आंसू की पिचकारी
फिर भी खुश ना हुआ मोगाम्बो, हम
तेरे बलिहारी
मुलांचीच भाषा, मुलानी शाळेत
आपापल्या आई-वडिलांना काही नावे दिलेली असतात, हे ज्याना माहित
नसेल त्यानी मुलांशी कनेक्ट व्हावे हे उत्तम...वडिलांना मोगाम्बो, टायसन,
गब्बर,
अशी
बरीच नावे असतात, त्यात गैर काही नाही, आपणही हेच केले
आहे, केले नसेल तर ते पोक्त बालपण व्यर्थ आहे
तेरी नज़रों में क्या हम, इतने नालायक हैं
रे तुझसे बेहतर तो
(कोरस) मन्ने छोड़ दो रे बापू
रे तुझसे बेहतर अपनी, हिंदी फिल्मो के
खलनायक हैं
बापू सेहत के लिए
तू तो हानिकारक है
डिंग डांग डिंग डांग.....
पालक म्हणुन कायम पडलेला प्रश्न...तारे जमीन पर
मधला मनात येईल ते रंग भर असे म्हणणारा आमिर खान बरोबर की दंगल मधला, माझीच
पध्दत बरोबर आहे म्हणणारा? .....प्रत्येकाचे
उत्तर वेगळे, पध्दत वेगळी
मुले होणे हे सोपे पण वाढवणे फार अवघड. काहीच लक्ष न देणाऱ्यांची मुलेही वाढतात,
लाख्खो
रुपये भरून तथाकथित इंटरनॅशनल स्कूलमधें पाठवणाऱ्यांची पण वाढतात, आपली
अपूर्ण स्वप्ने मुलांकडुन पूर्ण करवून घेणाऱ्यांची पण वाढतात, ....मग
हानिकारक नसलेला बापू कोण ? खुप
लक्ष देणारा, काहीच लक्ष न देणारा, सगळीकडे लक्ष
ठेवणारा, बालक पालक - सैराट सहकुटुम्ब बघणारा की असा काही सिनेमा घरीच
टिव्हीवर लागला की पटकन चॅनेल बदलणारा, "ड्रिंक्स"
घेताना औषध पितोय असे बिनधास्त खोटे सांगणारा, सेक्स हा शब्द
मुलानी उच्चारला की अंगावर झुरळ पडल्यासारखा चेहरा करणारा, आदर असावा
यासाठी "अहो पप्पा" अशी हाक मारायला लावणारा की "ए आई" सारखेच
"ए बाबा" म्हणायला शिकवणारा,
प्रश्न विचारु न देणारा की खुली चर्चा करणारा, शाळेची सुट्टी
मुलानां उपभोगू देणारा की लगेच छंदाच्या क्लासेसला घालणारा....?
रे बाप्पू
बापू सेहत के लिए, तू तो हानिकारक
है
✍ सुहास किर्लोस्कर
Comments
Post a Comment