Posts

Showing posts from 2018

खुली जो आंख तो …………

Image
सहसा संगीतातला नवीन प्रकार ऐकायला आपली सुरुवात होते ती लोकप्रिय काय असेल ते कानावर पडल्यावर.  गझलच्या बाबतीत माझेही असेच झाले...सिनेसंगीतामधील गझल ऐकल्या. अर्थमधील गाणी आवडली, उमराव जान सारख्या सिनेमातील काही शायरी समजायला लागली पण तो आपला प्रांत नव्हे असे वाटायचे.  त्यानंतर निकाह चित्रपटामुळे गुलाम अली यांची ओळख झाली.  चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद ही गझल पॉझेस, तबल्याची साथ आणि एकूणच त्यामुळे होणारा माहोल यामुळे आवडली.  नंतर माझा भाऊ सुधीर किर्लोस्कर याने गझल अभ्यासपूर्वक ऐकायला सुरुवात केली आणि नंतर त्याने “कहेना उसे” ही कॅसेट आणली, उर्दू-मराठी डिक्शनरी आणली आणि त्यातल्या गझलचा अर्थ सांगण्यास सुरुवात केली.  मेहदी हसन यांच्या एकसे एक गझल.  आधी त्यातले संगीत फार हळूवार असल्यामुळे आवडले म्हणजे धून आवडल्या.  अर्थ समजायला लागल्यावर डोळे उघडले आणि प्रचिती आली कि खरी गझल ती हीच......  खुली जो आंख तो........ तू आयुष्यात आलीस ते दिवस किती सुंदर होते.  ते प्रेम, त्या आणाभाका....आयुष्यभर साथ न सोडण्याच्या. ते दिवस स्वप्नातीत होते....

मैं बंगाली छोकरा........

Image
आभासकुमार गांगुली, ज्याला आपण किशोरकुमार म्हणून ओळखतो त्याचे गाण्यातले अनेक पैलू आपण ऐकले आहेत.  हा हरहुन्नरी कलाकार चित्रपटसृष्टीत आला गायक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पण मिळेल ते काम कर असा वडिलबंधू अशोककुमार याचा सल्ला मानून त्याने नाईलाज म्हणून अभिनय केला.  लेखक, दिग्दर्शक, निर्माता, स्टेज परफोर्मर, गीतकार, संगीतकार अशा विविधांगी भूमिका वठवल्या तरीही त्याला सगळ्यात जास्त प्रिय होते संगीत.  हिंदी चित्रपट संगीतातील या गांगुली कुलवंशीय महान कलाकाराने अनेक बंगाली गाणी गायली आहेत, हिंदी गाण्यात या बंगाली बाबूने जमेल तिथे आपले बंगाली रूप दाखवले आहे.  आज त्यांच्यातल्या बंगाली बाबूची ओळख करून घेऊ.... “कुवे मे कुद के मर जाना, यार तुम शादी मत करना” या परिवार चित्रपटातील (सलील चौधरी) गाण्याच्या सुरुवातीला विहिरीतून प्रकट होताना आवाज बसल्याचे सोंग काढत किशोर म्हणतो, “कुवे मे....(योडलींग करत...)....”थोंडा जोल मे नोहाने से गोला बैठ गोया....”   चलती का नाम गाडी या चित्रपटात पांच रुपैय्या बारा आणा या गाण्यात चक्क गुरु संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांचीच नक्क...

लक्ष्मीकांत प्यारेलाल – राजन साजन मिश्रा यांचा सूर संगम

Image
कॉलेजमध्ये असताना लक्ष्मीकांत प्यारेलाल हे माझे आवडते संगीतकार होते.  त्यांची गाणी तेवढ्या काळापुरती तरी लोकप्रिय असायची.  त्यांचे पॉझेस, ओर्केस्ट्रेशन, व्हायोलीनचा वापर असे बरेच काही.  राजेश खन्ना-जितेंद्रचे काही सिनेमे फक्त लक्ष्मी-प्यारे यांच्या गाण्यासाठी बघितले होते.  याच काळात सूरसंगम हा वेगळा सिनेमा आला आणि त्यातल्या गाण्यांचे वेगळेपण लक्षात आले.  तेव्हा ही गाणी वेगळी वाटली पण नेमकी का आवडतात हे सांगता येत नव्हते.  नंतर शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाल्यावर सूरसंगम या चित्रपटाची गाण्यातले सौंदर्य लक्षात आले.  चित्रपट पुन्हा पाहिला.  शंकरभरणम या तेलुगु चित्रपटाची रिमेक असलेल्या या चित्रपटाची गाणी एक से बढकर एक आहेत.  लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या दर्जेदार चित्रपटापैकी एक.  एक दुजे के लिये, चरस, दोस्ती, कर्मा वगैरे चित्रपटातले लोकप्रिय लक्ष्मी-प्यारे वेगळे आणि चित्रपटाच्या दर्जाप्रमाणे सांगीतिक दर्जा उंचावणारे उत्सव, सूरसंगम चित्रपटाचे लक्ष्मी-प्यारे वेगळे.  अशाच वेगळ्या गाण्यांचा हा मागोवा.... आयो प्रभात सब मिल...

अशोक पत्की यांचा संगीत “सरदारी बेगम”

Image
सरदारी बेगम हा चित्रपट एका ठुमरी गायिकेची व्यथा “ऐकवणारा” आहे. सत्यकथेवर आधारीत हा सिनेमा श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केला आहे.  या सिनेमाचे संगीत श्रवणीय आहे, ती गाणी पुनःपुन्हा ऐकली तर त्यातली खुमारी समजते.  याचे खरे श्रेय जाते संगीतकार अशोक पत्की याना.  खरे तर चित्रपटाच्या श्रेयनामावलीमध्ये वनराज भाटीया यांचे नाव आहे परंतु त्यांचे या चित्रपटाच्या गाण्यात किती योगदान आहे हे गाणी रेकॉर्ड करताना असणारे कलाकार जाणतात.  जावेद अख्तर यांनी वनराज भाटीया यांनी दिलेल्या चाली ऐकल्या आणि ते म्हणाले कि चित्रपटातल्या ठुमरी गायिकेचा विचार करता या चाली योग्य नाहीत.  यानंतर चित्रपटाचे सहाय्यक संगीतकार अशोक पत्की यांनी चाली दिल्या, रेकोर्डिंग केले आणि .....वरच्या मजल्यावर बसलेल्या वनराज भाटीया यांनी त्या चालीना दुजोरा दिला.  चित्रपटातील सर्व म्हणजे १३ गाणी एकापेक्षा एक आहेत, त्यात डावे-उजवे करणे कठीण आहे.  अशोक पत्की याना या श्रेयाबद्दल विचारले असता “त्याबद्दल मला खंत नाही” हे सांगितले.  त्यांचा संगीतकार म्हणून प्रवास शब्दबद्ध झालेले सप्तसूर माझे हे पुस...

क्लासिक किशोर

Image
किशोरकुमार या अवलिया कलाकाराला चतुरस्र आणि अष्टपैलु शब्द कमी पडावेत.   अभिनयाच्या बाबतीत "दूर गगन की छाव में"मधला अभिनेता किशोर आणि पडोसन मधला अफलातून गुरु अशी बरीच उदाहरणे देता येतील.  शिवाय गायनात किशोरने जो अभिनय केला आहे त्याला तोड नाही.  पडोसन हा चित्रपट  किशोर-मेहमूद-राहुल देव बर्मन यानी सेटवर improvise केला आहे.   खात्री पटण्यासाठी पडोसन या चित्रपट दिग्दर्शकाचा -ज्योती स्वरूप -  कोणताही चित्रपट पहावा.  ज्योती स्वरूप हा मेहमुदच्या बहिणीचा नवरा, पडोसन चा निर्माता मेहमूद !! किशोर  इंडस्ट्रीमधें आला, ते गायक होण्यासाठीच पण अशोककुमारच्या आग्रहासाठी मिळेल ते काम करत राहीला.  अभिनय नाखुशीनेच केला.  जे निर्माते पैसे द्यायचे नाहीत त्यांच्याकडून तो अतरंगी पद्धतीने वसूल करायचा किंवा सेटवर यायचा नाही.  मग असे कलाकारांचे पैसे बुडवणारे लोक किशोर बद्दल काहीही अफवा पसरवू लागले.  आपण रसिकानी सुद्धा विनोदी नट असा शिक्का मारून त्याच्यावर अन्याय केला.  आपण "मुसाफिर-दूर गगन की छाव में" च्या किशोरला सोयीस्करपणे विसरलो...

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास

Image
राग , थाट गट आणि संगीत अभ्यास - राजीव साने शब्दांकन   -   सुहास किर्लोस्कर गाता रहे मेरा दिल हा उपक्रम सुरु करून 2 वर्षे झाली. Music appreciation, अर्थात संगीत समजून ऐकणे या उद्देशाने दरमहा एक कार्यक्रम सादर केला जातो.     कार्यक्रम क्र 30 श्री राजीव साने यानी सादर केला. श्री राजीव साने वेगवेगळ्या विषयाचा खोलात जाऊन तपशिलासह अभ्यास करतात आणि त्यावर स्वतः विचार करून मांडतात.   गल्लत गफलत गहजब ही लेखमाला आणि त्यावरचे पुस्तक हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.   त्यानीं गीतेचा अभ्यास करून त्यातील श्लोकातील विरोधाभास यावर सविस्तर विचार मांडलेले आहेत.   भारतीय शास्त्रीय संगीताचे ते अभ्यासक आहेत.   व्हायोलीन शिकल्यावर त्यानीं स्वर-राग-थाट याबाबत स्वतंत्रपणे विचार केला हे महत्वाचे.   अन्यथा आपल्याकडे गुरुने दाखवलेल्या वाटेवरच चालण्यात धन्यता मानली जाते. वेगळा विचार करणे गुरूलाही पसंत पडते असे नाही त्यामुळे तसे शिष्य निर्माण होणे तेवढेच दुर्लभ. श्री राजीव साने यांच्याकडून एखादा विषय कसा शिकावा याचा धड़ा मिळाला हे महत्वाचे.   3 ...