राग, थाट गट आणि संगीत अभ्यास
राग , थाट गट आणि संगीत अभ्यास - राजीव साने शब्दांकन - सुहास किर्लोस्कर गाता रहे मेरा दिल हा उपक्रम सुरु करून 2 वर्षे झाली. Music appreciation, अर्थात संगीत समजून ऐकणे या उद्देशाने दरमहा एक कार्यक्रम सादर केला जातो. कार्यक्रम क्र 30 श्री राजीव साने यानी सादर केला. श्री राजीव साने वेगवेगळ्या विषयाचा खोलात जाऊन तपशिलासह अभ्यास करतात आणि त्यावर स्वतः विचार करून मांडतात. गल्लत गफलत गहजब ही लेखमाला आणि त्यावरचे पुस्तक हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यानीं गीतेचा अभ्यास करून त्यातील श्लोकातील विरोधाभास यावर सविस्तर विचार मांडलेले आहेत. भारतीय शास्त्रीय संगीताचे ते अभ्यासक आहेत. व्हायोलीन शिकल्यावर त्यानीं स्वर-राग-थाट याबाबत स्वतंत्रपणे विचार केला हे महत्वाचे. अन्यथा आपल्याकडे गुरुने दाखवलेल्या वाटेवरच चालण्यात धन्यता मानली जाते. वेगळा विचार करणे गुरूलाही पसंत पडते असे नाही त्यामुळे तसे शिष्य निर्माण होणे तेवढेच दुर्लभ. श्री राजीव साने यांच्याकडून एखादा विषय कसा शिकावा याचा धड़ा मिळाला हे महत्वाचे. 3 ...