आप यूँही अगर हमसे मिलते रहे
राजा मेहदी अली खाँ
यानी लिहिलेले शब्द अगदी साधे सोपे पण सिनेमामधील प्रसंगाचा भाव प्रेक्षकापर्यंत पोहोचवणारे. प्रेमात पडल्यावर फार दुर्बोध शायरी केली तर प्रेमिका
पसंत करेल का हा प्रश्न आहेच शिवाय सिने गीताची भाषा सिनेमामधील कथा आणि प्रसंगावर अवलंबून असते.
आप यूँ ही अगर हमसे
मिलते रहे
देखिए एक दिन प्यार
हो जाएगा
एक मुसाफिर एक हसीना
या सिनेमा मधील हे सदाबहार गीत ओ पी नय्यर यानी केदार रागामधे संगीतबद्ध केले आहे. मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी स-अभिनय गायले
आहे त्यामुळे गाणें पुनःपुन्हा ऐकले जाते.
मुखड्यानंतर सतारीवर हीच धुन वाजते, पंजाबी ढोलक केरवा तालात वाजतो आणि आशा
भोसले गातात...
ऐसी बातें न कर ऐ हसीं
जादूगर
मेरा दिल तेरी नज़रों
में खो जाएगा
सरोदनंतर रफी आशाचा
लाडीक आलाप आणि पुन्हा सतार वाजते.
पीछे पीछे मेरे आप
आतीं हैं क्यों
मेरी राहों में आँखें
बिछाती हैं क्यों
आप आती हैं क्यों
...
क्लोरोनेट हे वाद्य
सनई सारखे ऐकू येते आणि आशा उत्तर देतात...
क्या कहूँ आपसे ये
भी एक राज़ है
एक दिन इसका इज़हार
हो जाएगा
सरोद, सारंगी वर आर्जव
अप्रतीम. सरोदला साथीला तबला वाजवला आहे, इतर
वेळेस ढोलक वाजवला आहे.
आप यूँही ....पुनश्च
गाताना रफी यानी अशा काही हरकती घेतल्या आहेत, क्या कहेने.
कैसी जादूगरी की अरे
जादूगर
तेरे चहरे से हटती
नहीं ये नज़र
है मेरी ये नज़र
...
ऐसी नज़रों से देखा
अगर आपने
शर्म से रँग गुलनार
हो ज्जाएगा
आशा भोसले यानी हो
जाएगा असे न म्हणता होज्जाएगा असे गायल्यामुळे तो भाव बरोबर पोहोचतो. आशा भोसले यांच्या versatility बद्दल नविंन काय
लिहायचे ? सिने संगीताची शाळा काढली तर भावपूर्ण गायन, लय, ताल, अभिनय, शब्दोच्चार,
गाण्यातील सुरेल संभाषण असे बरेच विषय त्यांच्याकडून शिकावे.
मैं मोहब्बत की राहों
से अंजान हूँ
क्या करूँ क्या क्या
करूँ परेशान हूँ
मैं परेशान हूँ
...
आपकी ये परेशानियाँ
देखकर
मेरा दिल भी परेशान
हो जाएगा
तबला आणि ढोलक (पंजाबी)
या दोन तालवादयामधला फरक सहज लक्षात येतो.
केदार रागावर आधारीत
गाणी म्हणजे सर्वसाधारणपणे प्रार्थना असतात
हमको मन की शक्ती देना
(वसंत देसाई, वाणी जयराम, गुड्डी)
दर्शन दो घनश्याम नाथ
मोरी अखियां प्यासी रे (रवी, हेमंतकुमार-मन्ना डे-सुधा मल्होत्रा, )
बेकस पे करम कीजिये,
सरकार ए मदीना (नौशाद, लता, मुघल ए आझम)
पण प्रार्थने व्यतिरिक्त
वेगळीच गाणी संगीतबद्ध केली आहेत, हा त्या संगीतकारांच्या प्रतिभेचा आविष्कार
पल दो पल का साथ हमारा
(आर डी बर्मन, रफी-आशा, द बर्निंग ट्रेन मधील कव्वाली)
उठाए जा उनके सितम
(नौशाद, लता, अंदाज़)
आप की आँखों में कुछ
महके हुए से राज है (आर डी बर्मन, किशोर-लता, घर)
आप यूँही अगर हमसे
मिलते रहे.......
साधना शिवदासानीचा
अभिनय आशा भोसले यांच्या आवाजाला न्याय देणारा आहे. सशधर मुखर्जी यानी निर्मिलेला 1962 सालचा हा सिनेमा
राज खोसला यानी दिग्दर्शित केला. वडिलांच्या
सिनेमामधे काम करायला मिळाले पण जॉय मुखर्जी यानी चेहरा हलणार नाही याची पुरेपुर खबरदारी
घेतली. सिनेमामधे जॉयची याददाश्त खो बैठती
है !! ती याददाश्त आली काय, गेली काय, जॉयला काहीही फरक पडत नाही. पण आपण जॉय मुखर्जीकडे दुर्लक्ष करून मोहम्मद रफी
यांचा आवाज ऐकावा. आपला जॉय कशात आहे हे समजून
चांगले तेच बघायची आणि ऐकायची साधना प्राप्त करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी
लागते.
✍ सुहास किर्लोस्कर
Comments
Post a Comment