ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया




प्यासा हा वसंतकुमार शिवशंकर पदुकोण उर्फ गुरुदत्त यानी दिग्दर्शित केलेला 1957 चा सिनेमा  केव्हाही पहावा असा क्लासिक सिनेमा आहेजागतिक सिनेमामधें आवर्जून बघावे अशा 100 सिनेमांच्या यादीत आणि भारतामधील उत्कृष्ठ 25 सिनेमांच्या यादीत प्यासाचा समावेश होतोखेदाची बाब आहे की या सिनेमाला एकही पुरस्कार मिळाला नाही !! 

विजय या एका प्रतिभावान परंतु अयशस्वी कवीची ही कथा आहे ज्यामधे कवीला समाजाची अवहेलना सहन करावी लागते आणि जीवंतपणी स्मृतिदिन साजरा केल्याचे बघावे लागते.  साहीर यानी लिहिलेली एकाहुन एक सरस गीते आणि सचिन देव बर्मन यांचे दर्जेदार कथेला-प्रसंगाला साजेसे संगीत ही प्यासाची आणखी काही ठळक/वैशिष्टये.  या सिनेमातील क्लायमक्सचे हे अजरामर गीत मोहम्मद रफी यानी अप्रतीम गायले आहे.  साहिरला जे म्हणायचे आहे, ती गीतकाराची वेदना रफी यानी स्वरातून आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. थकलेला निराश कवी जीवावर आल्यासारखे शब्दोच्चार करेल, तसेच रफीने गायले आहे.  सचिन देव बर्मन यांचे संगीत गाण्याच्या आशयाला अनुसरून आहे. खुप वादये वाजवलेली नाहीत. गाण्याला लय आहे पण ठेका नाही.  साहीर कवीची व्यथा सांगतो आहे, अशावेळी तालवादये कशी वाजतील ? 

प्रकाशक (रहेमान) चे श्रद्धांजली आणि गरीबीवर भाषण ऐकून कवी (गुरुदत्त) आश्चर्यचकित होतो. लोक किती दुटप्पी वागतात, बोलतात.  करतात एक, स्टेजवरुन बोलतात दुसरेच..

आपलाच स्मृतिदिन बघून कवी म्हणतो.....

ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया
ये इन्सां के दुश्मन समाजों की दुनिया

हे जग बड्या बड्या राजवाड़े, इमारती, बंगले, राजे, राज्यकर्ते यांचे आहे. माणसा माणसा मधें शत्रुत्व असणारे आहे है जग.  हा समाज लोकामधे मैत्री करण्यासाठी कमी आणि माणुसक़ी घालवण्यासाठी जास्त प्रयत्न करताना दिसतो.

ये दौलत के भूखे रिवाजों की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है

(व्हायोलीन वर जरूरीपुरता इंटरल्यूड)

इथले सगळे रिती-रिवाज श्रीमंतीच्या मागे लागण्यासाठी केले आहेत. आपण देवळात जातो ते सुद्धा काही मागण्यासाठीच.  आपल्या श्रद्धा, पूजा, भक्ती काही ना काही मिळवण्यासाठी असते.  असले जग आपले नसले म्हणून मला नाही वाटत काही बिघड़ले.

हर इक जिस्म घायल, हर इक रूह प्यासी
निगाहों में उलझन, दिलों में उदासी
ये दुनिया है या आलम--बदहवासी
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है

(व्हायोलीन, जलतरंग चे काही स्वर)

येथील प्रत्येकजण जख्मी आहे (त्याच्या जख्मा दिसत नाहीत), प्रत्येकाजण अतृप्त आहे, असमाधानी आहे.  प्रत्येकाच्या नजरे मधें संशय आहे दुसऱ्याबद्दल.  प्रत्येक माणूस नाराज आहे, उदास आहे, नाखुश आहे. हे जग आहे की निर्दयी आणि बधीर लोकांचे साम्राज्य ?  या असल्या जगाने मला आपलेसे केले नाही म्हणून मी कशाला चिंता करू ?

आमच्या समाजामधे दुसरा समाज नको, आमच्या बिल्डिंग मधें बाहेरची मुले खेळायला यायला नकोत.   प्रत्येकाला वाटते आमचा समाज भारी, आमचाच धर्म, जात, पोटजात, गाव, गल्ली भारी, बाकी सगळे हलक्या दर्जाचे. 

आपण कोंडून घेतो स्वतःला आणि गर्दीत एकटेपणाने अस्वस्थ होतो.  लिफ्टमधे, बसमधे, राहत्या घरी, शेजारी कोणाशीही बोलणे टाळून मोबाइलमधल्या नकली दुनियेत हरवून जातो.


यहाँ इक खिलौना है इन्सां की हस्ती
ये बस्ती है मुर्दा-परस्तों की बस्ती
यहाँ पर तो जीवन से है मौत सस्ती
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है

इथे प्रत्येक माणसाची इज्जत, आब्रू म्हणजे एक खेळणे आहे. ही माणसांची वस्ती आहे की मुडद्याची?  इथे तर जगण्यापेक्षा मरण स्वस्त आहे.  असले लोक आणि असल्या माणसाचे (?) जग माझे नसले तर मी वाईट वाटून घेऊ?

जवानी भटकती हैं बदकार बन कर
जवाँ जिस्म सजते हैं बाज़ार बन कर
यहाँ प्यार होता है व्योपार बन कर
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है

इथल्या तरुणाकडून आशा ठेवण्यात काही अर्थ नाही, इथे नवयौवनाचा लिलाव चालला आहे, इथे तर प्रेमाचा बाजार मांडला आहे, असले जग माझे नसले म्हणून माझे काही बिघडले माही, ना खेद...ना खंत.

(वरच्या स्वरांत)

ये दुनिया जहाँ आदमी कुछ नहीं है
वफ़ा कुछ नहीं, दोस्ती कुछ नहीं है
जहाँ प्यार की कद्र ही कुछ नहीं है
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है

या जगात माणूस म्हणून काही किंमत राहिलेली नाही.  प्रमाणिकपणा गेला तेल लावत, इथे मैत्रीची काही किंमत नाही.  इथे प्रेमाची काही कदरच  नाही. असली दुनिया, असले जग मिळाले काय, नाही मिळाले काय, कशाला पर्वा करू मी?

(.....चढ्या स्वरांत...)

जला दो इसे फूंक डालो ये दुनिया
जला दो, जला दो, जला दो
जला दो इसे फूंक डालो ये दुनिया
मेरे सामने से हटा लो ये दुनिया
तुम्हारी है तुम ही संभालो ये दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है

असल्या जगाला काडी लावा, फुंकुन टाका, माझ्या नजरे समोरून दूर करा हे जग. तुमचे तुम्हाला लखलाभ. काय करू असल्या दुनियेच.  इथे माणुसकी राहिलेली नाही.


कुणीतरी प्रसिद्ध व्यक्ती केव्हा एकदा मरते आणि केव्हा एकदा मी श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या अंत्ययात्रेचे फोटो फॉरवर्ड करतो अशी वृत्ती आपली झाली आहे.  किती घाई.   हॉस्पिटल मधें दाखल झाल्यावर कोणत्या आजारी माणसाला फोटो काढलेले आवडेल?  पण असे फोटो काढणारे सहृद (?) असतात.  ते लगेच थकलेल्या पेशंटचे फोटो whatsup Facebook वर शेअर करतात.   किती बथ्थड झालो आहोत आपण, भावनाशून्य !! 

प्यासा सिनेमाच्या शेवटी गुरुदत्त नायिकेला म्हणतो -
मुझे उनसे कोई शिकायत नही मुझे किसी इंसान से शिकायत नही मुझे शिकायत है समाज के उस ढांचे से जो इंसान से उसकी इंसानियत छीन लेता है मुझे शिकायत है उस तहजीब से, उस संस्कृती से जहां मुर्दोंको पूजा जाता है और जिंदा इंसान को पैरोंतले रौंदा जाता है दुख दर्द में आंसू बहाना बुजदिली समझा जाता है झुककर मिलना एक कमजोरी समझा जाता है ऐसे माहौल से मुझे कभी शांती नही मिलेगी......


सुहास किर्लोस्कर


Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास