सपनों से भरे नैना
सुखाच्या शोधात जितके
धावाल तितके ते हातातून निसटुन जाईल. आशा निराशेचा
हा खेळ आहे. आपण हताश झालो तर काहीच हाती लागणार नाही. या शर्यतीमधे जितके अडथळे येतील तितकी यशाची मजा
वाढत जाईल.
लक बाय चान्स हा अतिशय
सुंदर सिनेमा. ज्याना सिमेमाचे जग बघायचे आहे
त्यानी आवर्जून बघावा असा. पण हा संघर्ष फक्त सिनेमा क्षेत्रामधला नाही, आयुष्यात कशी माणसे भेटतात, वागतात, बदलतात,
त्यावरही आहे.
सिनेमाचा नायक (फरहान)
सिनेमा मधें काम मिळवण्यासाठी झगड़तो आहे. जीवघेणी स्पर्धा आहे. स्वतःच्या यशापेक्षा
दुसऱ्याच्या अपयशावर लोकांचा डोळा आहे. हा संघर्ष सुरू असताना पार्श्वसंगीताला हे गाणें
सुरू होते. जावेद अख्तर यांचे सकारात्मक शब्द
आणि शंकर एहसान लॉय यांची फार सुंदर समयोचित चाल. अप्रतीम आणि भावपूर्ण गायले आहे शंकर
महादेवन यानी.
बगिया बगिया बालक भागे
तितली फिर भी हाथ न
लागे
इस पगले को कौन बताये
ढूँढ रहा है जो तू
जग में
कोई जो पाए तो मन में
पाए
सपनों से भरे नैना
तो नींद है न चैना
मूल फुलपाखराच्या मागे
धावते, या बागेतून त्या बागेत. पण फुलपाखरु
(सुख) काही हाती लागत नाही. अरे मुला तू जे
शोधतो आहेस ते तुझ्या जवळच तर आहे. स्वप्ने
डोळ्यामधें असल्यामुळे झोप नाही, जीवाला स्थैर्य नाही.
ऐसी डगर कोई अगर जो
अपनाए
हर राह के वो अंत पे
रास्ता ही पाए
धूप का रास्ता जो पैर
जलाये
मोड़ तो आये छाँव न
आये
राही जो चलता है चलता
ही जाए
कोई नहीं है जो कहीं
उसे समझाए
सपनों से भरे...
एक रस्ता संपला की
दुसरा सुरु होतो. प्रत्येक रस्त्याच्या शेवटी
त्यालां नवा रस्ता मिळतो. हां प्रवास संपत नाही.
उन्हाने तापलेल्या रस्त्यावर पाय भाजतात. रस्ता मधेच वेडी वाकड़ी वळणे घेतो पण
सावली काही दिसत नाही. तो रस्ता तुडवत चालला
आहे, त्याला समजून सांगणारे कोणीच भेटत नाही.
स्वप्ने बघत राहिले की असेच होते, सुखाची झोप काही लागत नाही.
दूर ही से सागर जिसे
हर कोई माने
पानी है वो या रेत
है यह कौन जाने
जैसे के दिन से रैन
अलग है
सुख है अलग और चैन
अलग है
पर जो यह देखे वो नैना
अलग है
चैन है तो अपना सुख
है पराये
सपनों से भरे...
लांब उभे राहून समुद्र
दिसतो आहे असे प्रत्येकालां वाटते. ते पाणी
आहे की मृगजळ, कोणालाच माहीत नाही. दिवस आणि
रात्र जसे वेगळे असतात, तसेच सुख आणि समाधान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण हे बघण्याची
नजर असणारे डोळे सगळ्यांना नाहीत. समाधान हे
आपले असते, सुख परक्याचे...
जिथे पोहोचायचे आहे
ते सुंदर असेलही, त्यापेक्षा हा प्रवास जास्त आनंददायी आहे. जंगल बघताना आपण वाघ दिसतो
की नाही याचा शोध घेत बसतो आणि जंगल प्रवासाचा आनंद विसरून जातो. आजुबाजुला दिसणारे
पक्षी, प्राणी, झाड़े, शांतता सर्वकाही सुंदर आहे. आपण काय बघतो? वाघ की जंगल ?
शंकर एहसान लॉय यानी
भैरवी रागामधे हे गाणें अतिशय सुंदररित्या
संगीतबद्ध केले आहे. शेवटी नैना रे....या शंकर
महादेवन यानी गायलेल्या आलापा मधून गीताचा अर्थ भिडतो.
भैरवी रागावर आधारित
काही गाणी....
बाबुल मोरा नैहरे छूट
री जाए - के एल सैगल, आर सी बोराल
कैवल्याच्या चांदण्याला
भुकेला चकोर - पं. जितेंद अभिषेकी
नाचे मन मोरा मगन तिकिता
धीगी धीगी - रफी, एस डी बर्मन
दो हंसो का जोड़ा बिछड़
गयो रे - लता, नौशाद
मोरी छम छम बाजे पायलिया
- लता, रवी
लागा चुनरी में दाग
- मन्ना डे, रोशन
जैसे राधा ने माला
जपी श्याम की - लता, एस डी बर्मन
किसी बात पर मैं किसी
से खफा हूँ - किशोर, आर डी बर्मन
मिले जो कड़ी कड़ी, इक
जंजीर बने - किशोर, आशा, आर डी बर्मन
हे गाणें ऐकल्यावर
बघण्या सारखे आहे....
गाणें गिटारने सुरू
होते, एक एक वाद्य वाढत जाते आणि आपण ऐकता ऐकता लय पकड़तो. सिनेमामधे ऑडिशन साठी निवड झाली आहे असा कॉल आल्यावर
नायक फरहान खुश होतो, एक स्वप्न पूर्ण झाले,
बघतो तर काय, ऑडिशन द्यायला बरेच लोक आलेले असतात. आपल्याला हवे ते मिळाले अशा आनंदात असतानाच तो जमिनीवर
येतो, आपल्यासारख्या लोकांची तर इथे लाइन लागली आहे, नविंन शर्यत सुरु झाली. एक रस्ता संपला तर दुसरा रस्ता सुरु झालां
! सगळ्या "पात्रां"ची ऑडिशन बघण्यासारखी
आहे. ही एक जीवघेणी स्पर्धा आहे, आणि आपण त्याचा
भाग आहोत याची कल्पना येऊन नायक आरशात बघतो.
सिनेमाची भाषा समजून
केलेले सुरेख दिग्दर्शन - झोया अख्तर
कोण म्हणते हल्ली चांगले
संगीत, चांगली गाणी नाहीत? कान आणि नजर चांगली हवी, चांगले होत आहे असा दृष्टिकोन ठेवला
तर चांगले दिसेल. पूर्वीचे दिवस राहिले नाहीत, असे म्हणत बसलो तर सगळीकडे अंधार दिसेल. पूर्वी भारत भूषण होता, मनोजकुमार होता, आज सुनील
शेट्टी आहे. त्या पलीकडे जग सुंदर होते आणि
आहे. आपण काय बघतो (आणि ऐकतो) त्यावर सगळे
अवलंबून आहे.
✍ सुहास किर्लोस्कर
Comments
Post a Comment