तनहाई
"दिल चाहता है"
हां सिनेमा 2001 साली नविंन ट्रेंड घेऊन आला. दिग्दर्शन, अभिनय, सिनेमाचे टेकिंग, संगीत,
गाण्याचे शूटिंग. हां सिनेमा आजही बऱ्याच वेळा बघितला जातो, परत बघतानाही तितकाच ताजा
आणि सुसंगत वाटतो. तीन वेगवेगळ्या स्वभावाच्या मित्रांची कथा आहे.
आकाशचे जीच्यावर प्रेम
असते ती शालिनी दुसऱ्याशी लग्न करायचे ठरवते. ते दोघेही एकमेकावर प्रेम करत असतात पण
शालिनीने हां निर्णय का घेतला हे आकाशला समजत नाही.
आकाश उदास आहे, एवढ्या
गर्दी मधें एकटा आहे. परदेशात त्याला जास्तच एकटे वाटते. या एकटेपणाचे हे गाणे....तनहाई.
या प्रसंगाला साजेसे
गाणे स्वरबद्ध केले आहे संगीतकार शंकर एहसान लॉय यानी. या गाण्याच्या निर्मिती बद्दल
असे ऐकले की धुन तयार झाली आणि शंकर महादेवन यानी तौफ़ीक़ कुरैशी यांना ऐकायला दिली.
दुसऱ्या दिवशीं तौफ़ीक़ कुरैशी यानी तालवाद्यावर हे गाणे बसवुन आणले. तेच या गाण्याचे
संगीत संयोजन....आवश्यक तेवढ्याच वाद्यात....कारण एकटेपणा जीवघेणा असतो.
आमिर खान चा अप्रतीम
अभिनय.... कारण या प्रसंगा पासून त्याचा आविर्भाव, बॉडी लैंग्वेज बदलते. जावेद अख्तर यांचे समयोचित गीत-शब्द आणि सोनू निगम
यांचे भावपूर्ण गायन.
कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन
- फरहान अख्तर
सिनेमाटोग्राफी - रवी
चंद्रन
गाणें तालवादयाने सुरु
होते....
धिन ताक धिन
धिन धिन धिनताक
आकाश ऑफिस मधें काम
करत आहे पण त्याचे मन दुसरीकडे आहे, सर्वजण
त्यांच्या व्यापात मग्न आहेत, आकाश ला भर गर्दी मधें एकटे वाटते, हे दृश्य बघण्या सारखे
आहे. गीत, त्याप्रमाणे भाव आणि त्याला अनुरूप
दृश्ये असा सुरेख संगम...Great Team Work.
तन्हाई, तन्हाई
दिल के रास्ते में
कैसी ठोकर मैंने खायी
टूटे ख्वाब सारे, एक
मायूसी है छायी
हर ख़ुशी सो गयी, ज़िन्दगी
खो गयी
तुमको जो प्यार किया
मैंने तो सज़ा में पायी
तन्हाई, तन्हाई, मीलों
है फैली हुई तन्हाई
Interlude ला बासरी
ऐकण्यासारखी आहे.
ख्वाब में देखा था
एक आँचल मैंने अपने हाथों में
अब टूटे सपनों के शीशे
चुभते हैं इन आँखों में
कल कोई था यहीं, अब
कोई भी नहीं
बनके नागिन जैसे है
साँसों में लहराई
तन्हाई, तन्हाई, पलकों
पे कितने आंसू है लायी.
कल कोई था यहीं.....इथे
सिनेमातल्या त्या जागा आहेत जिथे पूर्वी शालिनी होती, आता नाही, त्यामुळे .....तनहाई
शालिनी ची सुद्धा तीच
अवस्था...शालिनी दिसते तेव्हा बासरी वाजते.
क्यों ऐसी उम्मीद की
मैंने जो ऐसे नाकाम हुई
दूर बनायी थी मंजिल
तो रस्ते में ही शाम हुई
अब कहाँ जाऊं मैं,
किसको समझाऊँ मैं
क्या मैंने चाहा था
और क्या किस्मत में आई
अब कहाँ जाउ मैं, यावेळी
कॅमेरा समुद्रावर, आणि आकाश ची नजर, समुद्रापार...परत आपल्या देशात जावें काय ?
तन्हाई, तन्हाई, जैसे
अंधेरों की हो गहराई
सगळीकडे थडगी....आकाशची
अवस्था अशीच निस्तेज झाली आहे.
धिन ताक धिन
धिन धिन धिनताक
तनहाई
तनहाई
तनहाई
हे गाणें ऐकले, बघितले
की त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो.
सुहास किर्लोस्कर
Comments
Post a Comment