अर्थ




 मूळ अरबी शब्द "गजल" आहेहा शब्द जसाच्या तसा फारसीत आला आहे तोही स्त्रीलिंगी म्हणूनच. आणि मराठीत "गजल" ह्या शब्दाला "गझल" हे रूप मिळाले.

एकाच वृत्तातील, एकच यमक (काफिया) अन्त्ययमक (रदीफ) असलेल्या प्रत्येकी - ओळींच्या किमान पाच किंवा त्याहून अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल.

गझलेमधील ह्या प्रत्येक ओळींच्या कवितेला आपण "शेर" म्हणतो.  गझलेमधील प्रत्येक शेर हा आपल्या जागी एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली स्वतंत्र आणि सार्वभौम कविताच असते.

 एकाच गझलेत विविध विषय हाताळले जाऊ शकतात. प्रत्येक शेराचा आशय स्वतंत्र असू शकतो किंवा एकच संवेदना, एकच भाव किंवा एकच मूड असलेले सर्व शेर असू शकतात.

जर आपण गझलेमधून कोणताही शेर बाहेर वेगळा काढून त्याचे चिंतन केले, तर मागचा पुढचा कोणताही संदर्भ किंवा संबंध नसूनही तो शेर म्हणजे एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली एक वेगळी कविताच असल्याचे आढळून येते.

 गझलेचे खरे गमक हेच आहे की, प्रत्येक सुटा शेरसुद्धा स्वतंत्र कविताच असतो.

नज्म म्हणजे कवी स्वतःचे विचार सृजनशीलतेने लिहिलेले असतात.  नज्म लिहिताना काही विशेष नियम पाळले जात नाहीत.  नज्म किती ओळीची असेल असे काही ठरलेले नसते.  नज्मचे सर्व शेर एकमेकांशी जोडलेले असतात असे नाही.


अर्थपूर्ण सिनेमामधे महेश भट्ट दिग्दर्शित अर्थ सिनेमाचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.  सुजीत सेन आणि महेश भट्ट यानी लिहिलेल्या या  सिनेमाची कथा महेश भट्ट यांच्या आयुष्यात आलेल्या परवीन बॉबी या अभिनेत्री संदर्भात आहे असे त्यानी मुलाखतीमधे सांगितले आहे. स्वतःवर टिका करणारा सिनेमा एवढ्या प्रामाणिकपणे सिनेमा काढला आणि हे उघड़पणे सांगितले हे विशेष आहे.  महेश भट्ट यानी त्याकाळी दिग्दर्शित केलेले बरेच सिनेमे एकाहुन एक सरस् होते आणि वेगळे होते - सारांश, नाम, डैडी, काश..

अर्थचे यादगार संगीत दिग्दर्शन  जगजीत सिंह - चित्रा सिंह यानी केले.  शायराना गाणी आणि त्याला प्रसंगाप्रमाणे हळूवार संगीत, मोजकीच वादये यामुळे या गाण्यातील शब्द आणि भाव लक्षात रहातात. 

अर्थ (1982) हा फक्त प्रेमाचा त्रिकोण नाही.  इंदर (कुलभूषण खरबंदा) सिनेमा दिग्दर्शक असतो. एकदा तो पत्नी (शबाना आझमी) पूजाचे स्वप्न पूर्ण करतो तिच्या नावाने फ्लैट देतो. या आश्चर्याच्या धककयातून सावरताना तिला समजते की नवऱ्याचे कविता (स्मिता पाटील) या अभिनेत्रीवर प्रेम आहे.  इंदर कवितामुळे पत्नी पूजाला सोडून तिकडे राहु लागतो. एका पार्टीमधे एक गझल गायक (राजकिरण) तिचीच व्यथा गातो.

बरेच प्रश्न पडले आहेत. कोणी मला उत्तर सांगेल क़ाय ?  तो कालपर्यंत माझा होता, आज लगेच दुसऱ्याचा कसा क़ाय झाला ?  हे जग असे असेल तर अशा जगाला क़ाय अर्थ आहे ?  माझ्या बाबतीत का होतं असं ?   माझे हृदय त्याच्यासाठीच धड़धड़त असतं.  एवढे जर आम्ही जवळ आहोत तर आमच्यात एवढे अंतर का आहे?  का दूर गेला तो माझ्यापासुन ?  असं म्हणतात की प्रेमाचं नातं अतूट असतं.  तरीही हे जन्मोंजन्मीचं नातं का बदलतं?

कैफी आज़मी यानी लिहिलेले काव्य आणि ते पडद्यावर साकार करणारी त्यांची कन्या - शबाना - दोघेही लाजवाब.

बरेच प्रश्न आहेत त्यांमुळे गाण्याला मुखडा अंतरा असे काही नाही....प्रश्न, प्रश्न फक्त प्रश्न.  पूजाला पडलेले हे प्रश्न आहेत, त्याची उत्तरे तिला माहित नाहीत, कोणाकड़ून मिळतही नाहीत.  अशा प्रश्नाना रिदम-ठेका कसा असेल ?  एक गिटार वाजत रहाते फक्त.


कोई ये कैसे बताये के वो तन्हा क्यो है ?
वो जो अपना था, वही और किसी का क्यो है?

यही दुनिया है तो फिर, ऐसी ये दुनिया क्यो है?
यही होता है तो, आखिर यही होता क्यो है?

इक ज़रा हाथ बढ़ा दे तो, पकड़ ले दामन
उस के सीने मे समां जाए, हमारी धड़कन
इतनी कुर्बत है तो फिर फासला इतना क्यो है? (कुर्बत = नजदीकी)

दिला- बरबाद से निकला नही अबतक कोइ
इक लुटे घर पे दिया करता है दस्तक कोइ
आस जो टूट गयी है फिर से बंधता क्यो है ?

तुम मसर्रत का कहो या इसे गम का रिश्ता (मसर्रत = ख़ुशी)
कहते है प्यार का रिश्ता है जनम का रिश्ता
है जनम का जो ये रिश्ता तो बदलता क्यो है?




पूजा घर सोडून होस्टेल वर राहु लागते. 

इफ्तेखार इमाम सिद्दीकी
गायिका - चित्रा सिंह

तू नहीं तो ज़िन्दगी मैं और क्या रह जायेगा
दूर तक तन्हाइयों का सिलसिला रह जायेगा ...

दर्द की सरी तहें और सारे गुज़रे हादसे
सब धुआँ हो जायेंगे एक वाक़िया रह जायेगा ...
तू नहीं तो ज़िन्दगी मैं और क्या रह जायेगा ...

यूं भी होगा वो मुझे दिल से भुला देगा मगर
ये भी होगा खुद उसी मैं एक खला रह जायेगा ...
तू नहीं तो ज़िन्दगी मैं और क्या रह जायेगा ...

दायरे इन्कार के इकरार की सरहोशियां ...
ये अगर टूटे कभी तो फ़ासला रह जायेगा ...
तू नहीं तो ज़िन्दगी मैं और क्या रह जायेगा ...

https://youtu.be/FdrVTvkuJaU


इकडे कविताला विश्वास वाटत नाही की इंदर आपलाच आहे.  ती इंदरला लग्न करण्याचा आग्रह धरते.  इंदर घटस्फोटाचे कागदपत्र पूजाकडे घेऊन येतो, सही घेण्यासाठी.  केव्हा ? तर पूजाच्या वाढदिवसाला.  पूजा सही करते तेव्हा इंदरला म्हणते की कविताला अशा बन्धनामधे अड़कायचे आहे की जे एका सहीने मोडू शकते, किती विचित्र आहे ना ?

कविता राजकडे मित्रत्वाच्या नात्याने जाते.  तिथे त्यावे पूजाच्या वाढदिवसाची तयारी केलेली असते.  पूजाचा गोंधळ....हसावे की दुःख हलके करावे ?

गीतकार - कैफी आज़मी

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
क्या गम है जिसको छुपा रहे हो

आज तू नेहेमीपेक्षा जास्त हसते आहेस, क़ाय झालय तुला?  मला समजतय की तू कोणते तरी दुःख लपवते आहेस.  मन मोकळे कर आणि सांग क़ाय झालं ते.  तुझे डोळे पाण्यानी भरलेत तरीही तू हसते आहेस, काहीतरी झालय तर खर. अश्रू लपवण्याचा प्रयत्न करू नकोस.  काळामुळे भरलेल्या जखमाच्या खपल्या काढून दुःखी होते आहेस क़ाय ? 

आँखों में नमी, हँसी लबों पर
क्या हाल है क्या दिखा रहे हो

बन जायेंगे ज़हर पीते पीते
ये अश्क जो पिए जा रहे हो

जिन ज़ख्मों को वक़्त भर चला है
तुम क्यों उन्हें छेड़े जा रहे हो

शेवटच्या 2 ओळी अफलातून आहेत.  पूजाच्या हातात घटस्फोटाचे कागद आहेत.....इंदर ने सही केलेले. रेखा हा शब्द दोन अर्थाने वापरला आहे.   हातावरच्या रेषाचा खेळ आहे, जे घडते आहे ते त्याप्रमाणे, त्याची चिंता करू नकोस.  असे असले तरी हातावरच्या रेषा असो किंवा कोणत्या कागदपत्रावर केलेल्या सहीच्या रेषानी पराभूत होउ नकोस.  एका सहीच्या फटकाऱ्याने जी नाती संपवली जातात, ती खरी नाती नाहीतच. तर मग असली नाती तुटली तर दुःखी का व्हायचे ?

रेखाओं का खेल है मुक़द्दर
रेखाओं से मात खा रहे हो




पुरुष आणि स्त्री मधें निखळ मैत्रीचे नाते असते क़ाय ? राज मित्रत्वाच्या नात्याने पूजाला मदत करतो, तिला नोकरी मिळवून देतो, नवऱ्याकडून  भर्मनिरास झालेल्या काळात तो तीला मानसिक आधार आणि विश्वास देतो.  अचनकपणे राज पूजाला लग्नाबद्दल विचारतो.  त्याचे प्रेम खरे असेलही, पण पूजाला हा धक्का असतो.  तो विचारतो की उघड़ पणे तू मान्य करत नाहीस पण स्वतः ला विचारुन पहा...अव्यक्त का होईना, पण तुझे माझ्यावर प्रेम आहे ना ?

गीतकार - कैफी आज़मी, गायक - जगजीत सिंह
गिटार - व्हायोलीन ने गाणें सुरु होते..

झुकी झुकी सी नज़र बेक़रार है कि नहीं
दबा दबा सा सही दिल में प्यार है कि नहीं ...
तू अपने दिल की जवाँ धड़कनों को गिन के बता ...
मेरी तरह तेरा दिल बेक़रार है कि नहीं ...

वो पल के जिस में मोहब्बत जवान होती है
उस एक पल का तुझे इंतज़ार है कि नहीं ...

तेरी उम्मीद पे ठुकरा रहा हूँ दुनिया को ...
तुझे भी अपने पे ये ऐतबार है कि नहीं ...




पूजा एकटी आहे म्हणुन प्रेम करणाऱ्या राजचा हात धरत नाही.  खंबीरपणे एकटी राहण्याचा निर्णय घेते.  राज चे मनोगत गीतकार राजेंद्र नाथ 'रहबर' यानी अतिशय तरलपणे मांडले आहे.

तेरे खुशबू में बसे खत मैं जलाता कैसे
प्यार में डूबे हुए खत मैं जलाता कैसे
तेरे हाथों के लिखे खत मैं जलाता कैसे
जिनको दुनिया की निगाहों से छुपाए रखा
जिनको इक उम्र कलेजे से लगाए रखा
दीन जिनको, जिन्हे ईमान बनाए रखा
तेरे खुशबू में ..
जिनका हर लफ़्ज़ मुझे याद था पानी की तरह
याद थे जो मुझको जो पैगामे ज़बानी की तरह
मुझको प्यारे थे जो अनमोल निशानी की तरह
तेरे हाथों के लिखे खत मैं जलाता कैसे
तूने दुनिया की निगाहों से जो बचकर लिखे
सालहा साल मेरे नाम बराबर लिखे
कभी दिन में तो कभी रात को उठकर लिखे
तेरे खुशबू में बसे खत मैं जलाता कैसे
प्यार में डूबे हुए खत मैं जलाता कैसे
तेरे हाथों के लिखे खत मैं जलाता कैसे
तेरे खत मैं आज गंगा में बहा आया हूं
आग बहते हुए पानी में लगा आया हू

https://youtu.be/Utj7_nNfkfw

हा सर्व मनकल्लोळ आहे......इंदर, पूजा, कविताचा.  महेश भट्ट यानी नायकाची निवड करताना तथाकथित नायकाच्या प्रतिमेला छेद दिला. ही सर्वसामान्य वाटणाऱ्या पुरुषांची कथा आहे, त्यांमुळे कुलभूषण खरबंदा ची निवड सार्थ आहे.  तो कुणी जगावेगळे धाडस करणारा, दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा सुपरहीरो - नायक नाही, त्याच्या चुका होत आहेत, त्या चुकावर तो पांघरुण घालत आहे, त्याच्या मनात क़ाय चालले आहे ते ना पूजाला समजते, ना कविताला. ही तुमच्या आमच्यातल्या सर्वसामान्य माणसाची फरफट आहे. 

शबाना आझमी ने इंदरच्या पत्नीची भूमिका फार अप्रतीम केली आहे.  पार्टीमधील प्रसंग असो किंवा नवऱ्याच्या मैत्रिणीला केलेला फोन (तुम सुन रही हो ना), अभिनय लाजवाब.  इंदरच्या आयुष्यातील मैत्रिणीची भूमिका स्मिता पाटील ने समरसुन केली आहे. स्मिताला प्रसंग फार कमी आहेत, शिवाय तिला प्रेक्षकांची सहानुभूती मिळत नाही, त्यांमुळे नकळत शबाना-स्मिता तुलना झाली पण स्मितावर अन्याय झालां असे मला वाटते.  शिवाय मुख्य रोल पहिल्यांदा स्मिताला दिला होता नंतर तो शबानाकड़े गेला असे बोलले जाते, खरे खोटे महेश जाणे. 

सिनेमा बघताना आपण शबानाला दया, स्मिताचा राग आणि कुलभूषणला सहानुभूती या नजरेतुन बघत असु तर आपल्या भूमिकेबड्डल आपण पुन्हा विचार करायला नको क़ाय ?

रोहिणी हट्टगड़ी यानी कामवाल्या बाईची भूमिका सुरेख केली आहे.  कामवाली बाई हाच प्रश्न तिच्या पद्धतीने  सोडवत असते.  त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी. शेवटी नवऱ्याने घटस्फोट दिला म्हणुन प्रेम करणाऱ्या पुरुषाचा "आधार" शोधता ती कामवाल्या बाईच्या मुलीला वाढवण्यात आनंद शोधते हे विशेष.

कविताच्या मनात नेहमीच असुरक्षिततेची भावना असते, तिला नेहेमी वाटत रहाते की इंदर आपल्याजवळ नाही म्हणजे बायकोकड़े गेला असेल.  यानंतर एका क्षणी विचारांचा स्फोट होतो आणि ती निर्णय घेते की इंदर बरोबर लग्न करायचे नाही.  इंदरची अवस्था - घर का घाट का - ती त्यानेच ओढवून घेतली आहे.  इंदर पुन्हा निर्लज्जपणे पूजाकडे येतो, म्हणतो मला माफ कर.  हाच या सिनेमातला महत्वाचा प्रसंग आहे .  पूजा (शबाना) इंदरला (कुलभूषण खरबंदा) म्हणजे कविताकड़े काही दिवस आणि "रात्री" घालवून आलेल्या आपल्या पूर्वीच्या नवऱ्याला विचारते, तू जे काही केलेस तेच मी केले असते, तुला सोडून दुसऱ्याकड़े गेले असते आणि हाच प्रश्न तुला विचारला असता..... तर तू मला माफ केले असतेस ?

इथे महेश भट्ट यानी पुरुषांचा दुटप्पीपणा दाखवला आहे.  स्वतःला प्रगत विचारांचे समजायचे पण घरातल्या स्त्रीला एवढेच स्वातंत्र्य द्यायचे की ती पूर्ण विचार करून स्वतःचे निर्णय घेणार नाही.  घरातली स्त्री निर्णय घेण्यासाठी जितकी पुरुषावर अवलंबून असेल तितका पुरुष समाधानी.  सिनेमा सत्याच्या जवळ जाणारा आहे.  सिनेमाच्या शेवटी पूजा नवऱ्याला जो प्रश्न विचारते "हेच जर मी केले असते तर मला माफ केले असतेस क़ाय?"  असा प्रश्न साध्या साध्या रोजच्या जीवनातल्या छोट्या मोठ्या घटनामधें विचारण्याचा विचारही स्त्रिया करू शकत नाहीत, विचारणे फार लांबची गोष्ट आहे.

इतनी कुर्बत है तो फिर फासला इतना क्यो है ?
है जनम का जो ये रिश्ता तो बदलता क्यो है ?




सुहास किर्लोस्कर


Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास