‎सुरमा मेरा निराला.....



"कभी अँधेरा कभी उजाला" या 1958 सालच्या सिनेमामधें किशोरकुमारची नायिका होती नूतन. मजरूह सुल्तानपुरी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले  संगीतकार ओ पी नय्यर यानी. गाण्याचे हे शब्द खरे तर ओ पी नय्यर आणि किशोरकुमार या दोघा आवलिया कलाकाराना चपखल लागू पडतात.

या गाण्यात किशोरकुमारने प्रत्येक कड़वे, "सुरमा मेरा निराला" हे शब्द इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने गायले आहेत, कमाल आहे. हे गाणें आहे ते वैविध्य तसेच राखून गाण्याचा प्रयत्न करून पहा.  हे सर्व सुरात किशोरच्या variation ने योडलिंगसह आणि अभिनयासह गाणें अशक्य आहे.

सुरमा मेरा निराला, आँखों में जिसने डाला
जीवन हुआ उजाला, है कोई नज़र वाला

ये वक़्त ये ज़माना, जब ना लगे सुहाना
फिर मेरे पास आना, खादिम हूँ मैं पुराना
रखता जो कुछ नज़र है, समझेगा क्या असर है
अंधे को क्या खबर है, है कोई नज़र वाला

दुश्मन जिसे सताये, इसको लगा के जाये
जा के नज़र मिलाये, धोखा कभी ना खाये
बूढ़ा हो या हो बच्चा, क्यों हो नज़र का कच्चा
रखता हूँ माल सच्चा, है कोई नज़र वाला

किस्सा अभी है कल का, रूठी थी घर की मलिका
सुरमा इधर से झलका, गुस्सा उधर का हलका
सुनते हो मेरे भाई, फेरो तो एक कलाई
क़ीमत है तीन पाई, है कोई नज़र वाला

किशोरकुमार-आशा भोसले यानी गायलेले "पिया पिया पिया" फार सुरेख आहे.  आशा भोसले यानी सांगितलेला किस्सा रेकोर्डवर उपलब्ध आहे.  शेवटच्या अंतऱ्याला आशा भोसले यानी पहिल्याच ओळीला चुकुन "हां sss" असे गायले, जे दुसऱ्या ओळीनंतर अपेक्षीत होते.  किशोरकुमारने त्याचवेळी खुण केली, रेकॉर्डिंग नंतर सांगितले, "ते गाणें तसेच राहुदे, सिनेमात नायक मीच आहे, मी नायिकेच्या तोंडावर हात ठेवतो".  एका मुलाखतीमधे ओ पी नय्यर म्हणतात, ते खोटे आहे, निर्मात्याने नंतर सावरुन घेतले !! आता खरे कोणाचे ? असो.  किशोरकुमार आणि ओ पी नय्यर यांची गाणी वेगळी आहेत.....सवेरे का सूरज तुम्हारे लिए है, तू औरों की क्यों हो गई.  परवाच प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यानी विचारले "किशोर कुमार आणि शमशाद बेगम यांची बरीच गाणी आहेत, तूम्हाला कोणते आवड़ते, मी लगेच सांगितले "मेरी नींदों में तुम".  यावर ते म्हणाले अजुन काही गाणी सांगा... मी निरुत्तर.  अशी अवस्था होण्याचे कारण ओ पी नय्यर यांच्या संगीताची जादू. किशोरकुमार यानी गायलेले यमन रागावर आधारीत "सवेरे का सूरज...." झपतालात (10 मात्रा) आहे.  प्रत्येक कडव्याला वेगळा अंदाज आहे, ही ओपी नय्यर यांची जादू.  किशोरकुमार, ओ पी नय्यर अशा अष्टपैलू कलाकाराना आपण लेबल लावली आणि आपलेच नुकसान झाले







मोहम्मद रफी यांची ओ पी नय्यर यांच्याकड़े गायलेली गाणी बरीच आहेत.  कश्मीर की कलीच्या लेखात त्याबद्दल सविस्तर लिहिलय.  बहारे फिर भी आएंगी या चित्रपटात "आपके हसीन रुख पे आज नया नूर है" या गाण्यात रफी यानी बासरी, पियानोच्या साथीने काय अप्रतीमरित्या गायले आहे, क्या बात है !!!

धर्मेंद्र पियानो खाजवतो आहे, तनुजा आणि माला सिन्हा या दोघी त्या एका "तिरा"ने घायाळ, तेवढ्यात रेहमान येतो, आता तो विचार करतोय हे गाण्याचे शब्द माझ्या पियानोवर कोणास म्हणतोय, आणि का?  मेरा क्या कुसूर है.....रफी यानी गाण्यात जो अभिनय ऐकवलाय तो धर्मेंद्रला दाखवता आला नाही...म्हणूनच तो म्हणतोय.... मेरा क्या कुसूर है

आप के हसीन रुख़ पे आज नया नूर है
मेरा दिल मचल गया तो मेरा क्या क़ुसूर है
आप की निगाह ने कहा तो कुछ ज़ुरूर है
मेरा दिल मचल गया तो मेरा क्या क़ुसूर है

खुली लटों की छाँव में खिला-खिला सा रूप है
घटा पे जैसे छा रही सुबह-सुबह की धूप है
जिधर नज़र मुड़ी उधर सुरूर ही सुरूर है
मेरा दिल ...

झुकी-झुकी निगाह में भी हैं बला की शोख़ियाँ
दबी-दबी हंसी में भी तड़प रही हैं बिजलियाँ
शबाब आप का नशे में ख़ुद ही चूर-चूर है
मेरा दिल ...

जहाँ-जहाँ पड़े कदम वहाँ फ़िज़ां बदल गई
के जैसे सर-बसर बहार आप ही में ढल गई
किसी में ये कशिश कहाँ जो आप में हुज़ूर है
मेरा दिल ...










ओ पी नय्यर यांची हळूवार गाणी बरीच आहेत.  तलत मेहमुद ने ओ पी नय्यरसाठी गायलेले "सोने की चिड़िया" सिनेमात आहे.   साहीर लुधियानवी यांचे शब्द समजून ऐकण्यात गाण्याची वेगळीच मजा आहे.  नुतनला आवाज आहे आशा भोसले यांचा, फक्त हमिंगसाठीच.

प्यार पर बस तो नहीं है मेरा, लेकिन फिर भी
तू बता दे के तुझे प्यार करूँ या ना करूँ

मेरे ख़्वाबों के झरोखों को सजानेवाली
तेरे ख़्वाबों में कहीं मेरा गुज़र है के नहीं
पूछ कर अपनी निगाहों से बता दे मुझको
मेरी रातों के मुक़द्दर में सहर है के नहीं
प्यार पर बस तो नहीं है ...

कहीं ऐसा न हो पाओं मेरे थर्रा जाएं
और तेरी मरमरी बाहों का सहारा न मिले
अश्क बहते रहे खमोश सियाह रातों में
और तेरे रेशमी आंचल का किनारा न मिले
प्यार पर बस तो नहीं है ...








हीरा मोती, प्राण जाए पर वचन न जाए, टॅक्सी ड्रायव्हर चे गीतकार अहमद वासी यांच्या शब्दात "जो शोखी, तेवर, बांकपन उनके मिजाज में था, वोही हमे उनके संगीत में मिलता है" 28 जानेवारी हा ओंकार प्रसाद नय्यर यांचा स्मृतीदिन.  त्या निमित्त त्यांच्या अष्टपैलूत्वाची साक्ष देणारी काही अनोखी गाणी पुन्हा ऐकण्याचा हा प्रयत्न.

मुकेश यांचे "चल अकेला" हे संस्मरणीय गीत गायल्यावर ओ पी नय्यर यानी पहिल्याच टेक मधें ओके केले. मुकेश यांचा विश्वास बसेना. ते म्हणाले परत गातो, त्यावर ओ पी यानी सांगितले पहिल्याच टेक मधें गाणें रेकोर्ड करण्याचा त्यांचा आग्रह असतो आणि गाणें सुंदर झाले आहे, परत रेकोर्ड करण्याची आवश्यकता नाही.  मुकेश यांची उत्कृष्ट 5 गाणी काढली तर यक गाण्याचा क्रमांक वरचा आहे, ओपी ची जादू.  संबंध चित्रपटातील या गाण्याचे शब्द प्रदीप यांचे.....कोणाच्या आयुष्याबद्दल आहेत?

चल अकेला चल अकेला चल अकेला
तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला

हजारों मील लम्बे रास्ते तुझको बुलाते
यहाँ दुखड़े सहने के वासते तुझको बुलाते
है कौन सा वो इंसान यहाँ पर जिसने दुःख ना झेला
चल अकेला...

तेरा कोई साथ ना दे तो खुद से प्रीत जोड़ ले
बिछौना धरती को करके अरे आकाश ओढ़ ले
यहाँ पूरा खेल अभी जीवन का तुने कहाँ है खेला







 चल अकेला चल अकेला चल अकेला
तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला


सुहास किर्लोस्कर









Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास