मुझे प्यार तुमसे नही है
मला माहीत नाही तूम्हाला
हे गाणें आवडते
की नाही त्याबद्दल,
पण मला हे
गाणें अजिबात आवडत
नाही. गुलजार
यानी असे कसे
लिहिलय कुणास ठाऊक. असे
कोणी म्हणते का
आपल्या प्रियकर/प्रेयसी ला? मला
तू आवडत नाहीस,
कोणाची हिम्मत आहे? आणि
जरी म्हटले तरी
समोरच्याला समजायला नको का?
समजले नाही तर
काही खैर नाही. त्यामुळेच
मला हे गाणें
आवडत नाही. कितीतरी वेळा मी
है गाणें ऐकले
आहे, नेहेमी ऐकतो
तरी मला आवडत
नाही. गीतकार गुलजार
यांच्या गीतात असे विरोधाभास
बरेच वेळा दिसतात,
जसे वादी में
गूंजती हुई खामोशियाँ
सुने.
तुम्हे हो ना
हो, मुझको तो
इतना यकीन है
मुझे प्यार तुम से
नही है, नही
है
1977 साली आलेल्या घरौंदा सिनेमाचे
संगीतकार जयदेव यानी नेहेमीप्रमाणे
श्रवणीय पण हटके
संगीत दिले. मलाही हे माहित
नव्हते की हे
गाणे मला आवडत
नाही पण आता
मला समजले की
आपल्याला हा गुलजार
यांचा शब्दाचा खेळ
समजला तर जास्त
आवडायला लागतो. एका
गाण्याचा अर्थ समजला
की दूसरे आवडलेले
गाणें पुन्हा समजून,
अर्थ लावून ऐकायचे
हे व्यसनच लागते. म्हणूनच
मला गुलजार यांचे
हे गाणें आवडत
नाही.
मुझे प्यार तुम से
नही है, नही
है
मगर मैने यह
राज अब तक
ना जाना
के क्यों प्यारी लगती
है, बातें तुम्हारी
मैं क्यो तुमसे
मिलने का ढूँढू
बहाना
कभी मैने चाहा,
तुम्हे छू के
देखु
कभी मैने चाहा,
तुम्हे पास लाना
मगर फिर भी
इश्स बात का
तो यकीन है
मुझे प्यार तुम से
नही है, नही
है
घरौंदा चे निर्माता
दिग्दर्शक भीमसेन खुराना, पटकथाकार
गुलजार यानी सिनेमाचे
चित्रीकरण सामान्य माणसाच्या साध्या
साध्या गोष्टीतल्या आनंदाच्या क्षणानी
केले आहे, म्हणजे
समुद्रकिनाऱ्यावर पावले उमटवणे, त्याच
पावलांचा मागोवा घेणे, दोघात
एक शहाळे पिणे, हाताने
भेळ खाणे, त्यातल्या
एकमेकांच्या खोडया, असे बरेच
काही. पण हे
त्यानी भारतीय सागर किनाऱ्यावर
चित्रीत केले ही
अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. आम्हाला
मोठी स्वप्ने दिली
ती यश चोप्रा,
करण जौहर यानी. कोणतेही
गाणें क्षणात यूरोप-अमेरिकेत करून आम्हाला
त्यानी Think Big अशी शिकवण
दिली. असे काहीच
या गाण्यात नाही,
म्हणुन मला हे
गाणें बघायलासुद्धा आवडत
नाही, कितीतरी वेळा
बघितले असले तरीही...
फिर भी जो
तुम दूर रहते
हो मुझसे
तो रहते हैं
दिल पे, उदासी
के साए
कोई ख्वाब उँचे मकानो
से झांके
कोई ख्वाब बैठा रहे,
सर झुकाए
कभी दिल की
रहो में फैले
अंधेरा
कभी दूर तक
रोशनी मुस्कुराए
मगर फिर भी
इस बात का
तो यकीं है...
मुझे प्यार तुम से
नही है, नही
है
काही स्वप्ने साधी सोपी
असतात, कधी स्वप्नेच
आपल्याकडे असुयेने बघतात, आपला
हेवा करतात, काही
स्वप्नातीत क्षण आपल्या
आयुष्यात असतात पण आपल्यालाच
कळत नाही आणि
मग आपण भलत्याच्याच
मागे लागतो. पण हे
असे अर्थ लावून
गाणें ऐकायला मला
आवडत नाही. गाणी
कशी असावीत, "मेरे
पिया गए रंगून,
मेरी जान सन्डे
के सन्डे" सारखी
सोपी आणि सुलभ. अर्थ
लावून ऐकायचे म्हणजे त्रास
होणारच ना !!
पहिल्या कडव्यापूर्वी बासरी, दुसऱ्या कडव्यापूर्वी
सैक्सोफोन, "उदासी के साए"
ला बासरी चा
चपखल वापर, व्हिसल ची ती
सिग्नेचर ट्यून या सगळ्यांचा
एकत्रित परिणाम म्हणजे मी
गाणें ऐकतो आणि
परत ही चुक
करायची नाही असे
ठरवतो. पूर्वीचेच
दिवस बरे होते,
गाणें ऐकायचे असेल
तर "झुमरीतलैया"ला जाऊन
रेडियो सिलोनला पत्र पाठवायला
लागायचे मग संगीतकारानी "स्पॉन्सर"
केलेल्या गाण्यातून वेळ मिळाला
तर ते आपले
गाणें लावायचे. आता सगळे
इंटरनेट, यू ट्यूब
वगैरे म्हणतात पण
तिकडे मी फिरकत
नाही, चुकुन कलर
मधले, नवीन गाणें
ऐकावे लागले आणि
ते आवडले तर
माझ्या संगीताच्या छंदाचे काय
होणार?
संगीतकार जयदेव यानी हे
गाणें रुना लैला
ला का दिले
कोणास ठाऊक. असे कहिबाही
प्रयोग केलेले मला अजिबात
आवडत नाहीत. "मुझे प्यार"
मधले आर्जव रुना
लैला ने असे
अनोखे आणि साभिनय
सुरेल गायले आहे
की वाटते बास
आता, परत नाही
ऐकणार हे गाणें.
तुम्हे हो ना
हो, मुझको तो
इतना यकीन है
मुझे प्यार तुम से
नही है, नही
है
गाणे संपताना विचारांची अस्वस्थता,
प्रेम आहे की
नाही ही द्विधा
मनस्थिती व्यक्त करण्यासाठी गिटार
वाजत रहाते आणि
आपण विचार करत
रहातो, ते मला
आवडत नाही. मला माहीत
नाही तूम्हाला हे
गाणें आवडते की
नाही त्याबद्दल, पण
मला हे गाणें
अजिबात आवडत नाही.
✍ सुहास किर्लोस्कर
Comments
Post a Comment