कहेना होगा.............कहेना है
पड़ोसन हा चित्रपट किती
वेळा बघितलाय याची
मोजदाद करायचे सोडून दिले. त्यातही
एका मुलाखतीमधें उस्ताद
झाकिर हुसेन यानी
सांगितले की त्यानी,
पंडित हरिप्रसाद चौरसिया,
शिवकुमार शर्मा अशा सर्वानी
मिळून पड़ोसन बऱ्याच
वेळा बघितला आहे. नंतर
वाटले की अरे,
हे कलाकार सुद्धा
सिनेमे बघतात, आपल्यासारखे. आपण उगाच
असे समजतो की
शास्त्रीय संगीत कलाकार "असे"
चित्रपट बघत नसतील. सिनेमाच्या
गाण्यातील वादये आणि ते
वाजवणारे कलाकार यांच्याबद्दल माहिती
घेऊ लागल्यावर समजले
की चित्रपट संगीतामधे
शास्त्रीय संगीतामधील उस्ताद-पंडितांचे
बरेच योगदान आहे.
पड़ोसन मधील प्रत्येक
गाणें हा अभ्यासाचा
विषय आहे, एक
चतुर नार, सावरिया,
मेरी प्यारी बिंदु,
सगळीच एकसे बढ़कर
एक. आज
जी गाणी निवडली
आहेत त्याचा मतितार्थ
एकच. त्या
दोन शब्दाबद्दल ...कसे
सांगू.. नायिका
म्हणते, "शर्म आती
है मगर आज
ये कहेना होगा".
नायकाने ठरवले आहे की
"कहेना है, आज
तुमसे ये पहेली
बार, तुम ही
तो लायी हो
जीवन मे मेरे,
प्यार प्यार प्यार". तर
असे बरेच काही
सांगायचे आहे दोघाना,
सिनेमात वेगवेगळ्या वेळेला. गीतकार
राजेंद्र कृष्ण यानी नायक
आणि नायिकेला जे
"सांगायचे" आहे ते
त्यांच्या शब्दात, त्यांच्या सिनेमातील
पात्राच्या स्वभावानुसार लिहिले आहे.
संगीतकार राहुल देव बर्मन
यानी या चित्रपटातले
प्रत्येक गाणें वेगळ्या प्रसंगानुसार
वेगळ्या बाजाचे संगीतबद्ध केले
आहे. पण
आपण प्रत्येकाला एक
लेबल चिकटवतो आणि
त्यामुळे नुकसान आपलेच होते. या
दोन्ही गाण्याचे संगीत दिग्दर्शन,
संगीत संयोजन, वेगवेगळ्या
वाद्यांचा वापर सुरेख.
गाणें सुरु होते
पंडित शिवकुमार शर्मा
यांच्या संतूर ने. गिटारने
आपण ताल धरणार
तेव्हाच दादरा तालात तबला
सुरु होतो, सहा
मात्रा पैकी दोन
मात्रा गिटारवर वाजतात, याला
मिक्स रिदम म्हणतात. असा
हा वेगवेगळ्या वाद्यावर
वाजणारा मिक्स रिदम राहुल
देव बर्मन यांच्यामुळे
आपल्या ओळखीचा झाला.
शर्म आती है
मगर आज ये
कहना होगा
अब हमें आपके
कदमों ही रहना
होगा
लता मंगेशकर यानी जेव्हा खालच्या
पट्टीत गाणी गायली
आहेत त्या त्या
वेळेस त्या गाण्यांचे
सौंदर्य अधिक खुलून
आले आहे. इल्जाम दीये नंतर
बदलणारा स्वर अफलातून
परिणाम साधतो.
संतुर, व्हायोलीन, व्हायोला....
आप से रूठ
के हम जितना
जिये खांक जिये
कई इल्ज़ाम लिये और
कई इल्ज़ाम दिये
आज के बाद
मगर कुछ भी
ना कहना होगा
(हे कड़वे सिनेमात
नाही, ऑडियो मधें
आहे)
अंतऱ्यामधें
पुन्हा संतुर -गिटार वाजते
आणि त्यानंतर जी
सतार वाजते ती
ऐकण्यासारखी आहे. सतारीचे
बोल पुन्हा संतुरवर
वाजतात. यानंतर वाजणारी सारंगी
ऐकली की लक्षात
येते हे वेगवेगळ्या
वाद्यांचे सहवादन किती समर्पकरित्या
जुळवून आणले आहे.
देर के बाद
ये समझे है
मोहब्बत क्या है
अब हमें चाँद
के झूमर की
ज़रूरत क्या है
प्यार से बढ़के
भला कौनसा गहना
होगा
"होगा"
ला जोडून लता
मंगेशकर यानी "अब हमें
आपके..." जसे गायले
ते लाजवाब आहे. एकदा
गाण्याचा प्रयत्न केला की
लक्षात येते यात
विशेष काय आहे. अर्थात
कोणी असताना गाण्याचा
प्रयत्न करायचा की कुणीच
नसताना, हा ज्याचा
त्याचा प्रश्न !
सनई, व्हायोलीन, सतार, "तिश्र"मधें म्हणजे
गाण्याच्या दीडपट लयीमधे संतुर
वाजते. पूर्ण गाण्यात सहा
मात्रांचा ताल वेगवेगळ्या
पद्धतीने वाजवला आहे. सहाय्यक संगीतकार मारुती
कीर (तबलां-रिदम)
आणि मनोहारी सिंग
(सैक्सोफोन - संगीत संयोजन) यांचेही
योगदान आहे.
आप के प्यार
का बीमार हमारा
दिल है
आप के ग़म
का खरीदार हमारा
दिल है
आप को अपना
कोई दर्द ना
सहना होगा
गाण्यात कुठे पॉज़
घेतला आहे, कुठे
सलग गायले आहे
यावर संगीतकार पंचम
यानी विचार केला
आहे हे महत्वाचे. गाणे
व्हायोलिनवर संपते. गाणें
संपल्यावर पुन्हा हितगुज केल्याच्या
आवाजात लता मंगेशकर
म्हणतात "शर्म आती
है" आणि हमिंग
वर गाणें संपते. गाणें
संपल्यावर नायक सुनील
दत्तची तब्येत बरी होते
आणि आपण ताजेतवाने.
किशोरकुमारने
सर्व प्रकारची गाणी
गायली, त्यातही त्याने गंभीर
बाजाची गाणी, दुःखी प्रसंगाची
गाणी विशेष त्या
प्रसंगाप्रमाणे गायली पण आपण
अशा सर्वाना एक
लेबल लावण्यात धन्यता
मानली. त्यामुळेअष्टपैलू
कलाकारावर अन्याय होतो, त्यापेक्षा
आपण सर्वश्रुत होण्यात
अडथळे येतात.
या गाण्याचा प्रसंग अफलातून
आहे, त्यापूर्वी नायक
सुनील दत्तचा क्लास
किशोरकुमार घेण्याचा प्रयत्न करतो,
स्वर कसा लावायचा
हे सांगतो पण
नायक भोला याला
गाणें सुरात जमत
नाही.
हा प्रश्न कसा सोड़वायचा
यावर विचार करताना
दुर कुठेतरी गाणें
लागलेले असते, त्या गाण्यावरुन
किशोरकुमारला पार्श्वगायनाची कल्पना सूचते. भोला खिडकीमधें
उभा राहून गाण्याचा
अभिनय करतो, आणि
पार्श्वगायन करतो किशोर.
कहेना है, कहेना
है, आज तुमसे
ये पहली बार
हो तुम ही,
तो लाई हो,
जीवन में मेरे,
प्यार प्यार प्यार
व्हायोलीन,
बासरी यानी सजलेले
इंटरल्यूड
तुमसे, कहने वाली,
और भी हैं,
प्यारी बातें
सामने सबके बोलो
कैसे, कह दूं
मैं सारी बातें
आज मुझे बस
इतना ही अब
करना है इक़रार
तुम ही तो
लाई हो ...
गिटार, बासरी, व्हायोलीन, पुन्हा
गिटार...अशा परिणामासाठी
सर्वसाधारणपणे 30 व्हायोलीन वादकांचा ताफा
असायचा. आता
10 ते 15 व्हायोलिनवर वाजवून डबल
साउंडचा इफेक्ट देतात असे
समजले.
हे गाणें बघण्यासारखे आहे
कारण ते गाणें
गंभीर प्रकृतीचे असले
तरी प्रसंग विनोदी
आहे. हा
तोल किशोररकुमारने गाण्यात
चांगला सांभाळला आहे. गुरुच्या या भूमिकेसाठी
दुसऱ्या कोणाचा आपण विचार
करू शकत नाही.
कब से, दिल
ने मेरे, मान
लिया है तुझको
अपना
आँखें मेरी देख
राही हैं सोते
उठते ये सपना
मेरे गले में
डाल राही हो
तुम बाहों का
हार
नक्की कोण गाते
यासाठी नायिका मैत्रिणी बरोबर
खालच्या मजल्यावर येते, शेजारच्या
घरात जाते तेव्हा
गाण्याचा आवाज इकोइफेक्ट
ने ऐकू येतो,
दूर कुठेतरी रेडियो
लागतो तसा आवाज. पंचमला
या इफेक्ट साठी
सलाम.
शेवटच्या कडव्याला बिंग फूटते
तरी किशोरचे गाणें
सुरूच....
तुम ही तो
लाई हो ...
शूटिंगच्या
वेळेस या लोकांनी
काय दंगा केला
असेल याचा विचार
केला तर लक्षात
येते की हे
सर्व प्रसंग तिथेच
खुलवले आहेत. त्यामुळे ज्योती
स्वरूप या दिग्दर्शकापेक्षा
निर्माता मेहमूद घोस्ट डायरेक्टर
असावा असे प्रत्येक
शॉट बघताना वाटते, शिवाय
राजेन्द्र कृष्ण यानी लिहिलेल्या
स्क्रिप्ट-डायलॉगमधें सेटवर
पंचम-किशोर-मेहमूद
या अवलिया मंडळीनी
असे काही improvisation केले
आणि एक मास्टरपीस
तयार झाला.... पड़ोसन.
✍ सुहास किर्लोस्कर
Comments
Post a Comment