उमराव जान




हिंदी सिनेमातील क्लासिक - अभिजात सिनेमामधे उमराव जान चे नाव प्रामुख्याने येते. मुजफ्फर अली निर्मित आणि दिग्दर्शित या सिनेमाचे संगीत दिग्दर्शन खय्याम यांच्याकडे सोपवण्यात आले

खय्याम यानी या सिनेमातील गाण्यासाठी आशा भोसले यांची निवड केली.   खय्याम यानी आशा भोसले यांना खालच्या स्केलमधे (आवाजाच्या पट्टीमधे) गायला सांगितले.  नेहमीपेक्षा हे वेगळे असल्यामुळे त्यानी रियाजासाठी एक आठवडा वेळ मागितला.  आठवड्यानंतर, गाण्याच्या रेकोर्डिंगच्या वेळी आशा भोसले म्हणाल्या नेहेमीच्या स्केलमधे गाते, खालच्या स्केलमधे नको.  खय्याम यानी वेगळ्या पद्धतीने आग्रह केला.  ते म्हणाले "आपण खालच्या पट्टीमधे एक टेक करू आणि नंतर सर्व वादये तुमच्या स्केलमधे लावू आणि दूसरा टेक तुमच्या स्केलमधें करू".  आशा भोसले हसुन म्हणाल्या "खाओ प्रदीप की कसम, की एक और टेक करेंगे" (प्रदीप हे खय्याम यांच्या मुलाचे नाव).  खय्याम म्हणाले "तुम भी माँ सरस्वती की कसम खाओ, एकदम ईमानदारी से जैसे बताया वैसे गाऊँगी". पहिल्या टेकचे खालच्या स्केलमधले रेकॉर्डिंग ऐकल्यावर आशा भोसले म्हणाल्या, "मला वाटले नव्हते, माझे गाणें या स्केलमधे इतके चांगले होईल". अर्थातच सर्व गाणी खालच्या स्केलमधे रेकोर्ड झाली.

1840 सालची ही कथा आहे एका असहाय मुलीची...

चित्रपटाची सुरुवात अमीर खुसरो यानी लिहिलेल्या  मुलींच्या कैफियत ने होते..(गायिका - जगजीत कौर).

मुलगी वडिलांना म्हणते मला तुमच्यापासुन वेगळे का केलेत ? आम्ही तर तुमच्या बागेतली फुले आहोत, घरा घरात मागितली जाणारी....आम्ही तुमच्याच घरट्यामधली पिल्ले आहोत.  आमच्या भावाना दोन दोन मजली घरे दिलीत आणि आम्हाला मात्र फार लांब पाठवून दिलेत.

काहे को ब्याहे बिदेस, अरे लखियन बाबुल मोहे
काहे को ब्याहे बिदेस ...
हम तो बाबुल तोरे बेले की कलियां
अरे घर घर माँगे हैं जाए अरे लखियन बाबुल मोहे
काहे को ब्याहे बिदेस ... महलन तले से डोला जो निकला          

अरे बीरन में छाए पछाड़  अरे लखियन बाबुल मोहे काहे को ब्याहे बिदेस ...
भैया को दियो बाबुल महलन दो महलन        
अरे हम को दियो पर्देश अरे लखियन बाबुल मोहे
काहे को ब्याहे बिदेस अरे लखियन बाबुल मोहे




अमीरन ला पळवून नेले जाते आणि लखनऊ मधें खानुम जान ला विकले जाते.  खानुम जान तिचे नामकरण करतात "उमराव जान" आणि तीला श्रीमंत राजे-नवाब यांना "जाळयात" ओढण्याचे प्रशिक्षण दिले जाते. 

रेखा आणि प्रेमा नारायण शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेत मोठ्या होतात, ती रागमाला  गायली आहे ग़ुलाम मुस्तफा खान आणि शाहिदा खान यानी.  त्याबद्दल सविस्तर, नंतर कधीतरी.

उमराव जान (रेखा) उर्दू-शेर-शायरी शिकते, मोठी होते.

शायर शहरयार यानी लिहिलेली अप्रतीम शायराना गीते आणि खय्याम यांचे प्रसंगानुरूप सुरेल आणि सुमधुर संगीत.  आशा भोसले यानी प्रत्येक गाण्याचा भाव ऐसा काही पकडला आहे की क्या कहेने.  अष्टपैलूत्व आशा भोसले यानी बऱ्याच गाण्यामधे सिद्ध केले आहे.  स्वर, त्याचा लगाव आणि भावोत्कटता याचा सुरेख संगम.


दिल चीज क्या है, आप मेरी जान लीजिए
बस एक बार मेरा कहा मान लीजिये

इस अंजुमन में आप को आना है बार बार
दीवार--दर को गौर से पहचान लीजिये

माना के दोस्तों को नहीं दोस्ती का फांस
लेकिन ये क्या के गैर का एहसान लीजिए

कहिये तो आसमां को जमीन पर उतार लाये
मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए
बस एक बार मेरा कहा मान लीजिए





खय्याम यांच्या लाजवाब संगीताला चार चांद लावले आहेत उस्ताद सुलतान खान यांच्या सारंगीने.

तर हे गीत एक नवाब कोठयाच्या खाली बग्गीमधे बसवुन ऐकतो फ़ारूक़ शेख आणि त्या आवाजावर फिदा होतो.   उमराव जान च्या शायरी चा दिवानां नवाब हवेलीवर येतो त्यावेळी एक अनोखा नगमा पेश केला जातो....

इन आँखों की मस्ती के मस्ताने हज़ारों हैं
इन आँखों से वाबस्ता अफ़साने हज़ारों हैं
(वाबस्ता - बंदिस्त)

इक तुम ही नहीं तन्हाँ उल्फ़त में मेरी रुसवा
इस शहर में तुम जैसे दीवाने हज़ारों हैं
(माझ्यावर प्रेम करणारा तू एकटाच नाहीस...)

इक सिर्फ़ हमी मय को आँखों से पिलाते हैं
कहने को तो दुनिया में मयख़ाने हज़ारों हैं
(मयखाना - मधुशाला)
  
इस शम्म--फ़रोज़ाँ को आँधी से डराते हो
इस शम्म--फ़रोज़ाँ के परवाने हज़ारों हैं




नवाब आणि उमराव जान एकमेकावर प्रेम करतात.  एका विनंतीवर उमराव लिहिलेल्या सर्व गझल नवाबना देते..
रेखाने असा काही खर्जातला आवाज लावलाय, लाजवाब. भेटी वाढत जातात.
पण उमराव नवाब यांच्या घरी गेल्यावर तीचा अपमान होतो त्यांमुळे उमराव पुन्हा त्या घरी जाण्याचा निर्णय घेते.  दोघे बाहेर खुल्या हवेत भेटतात.  नवाब त्यांच्या मनातल्या भावना ऐकवतात..तलत अजीज यानी फार सुरेख गायले आहे...

ज़िन्दगी जब भी तेरी बज़्म में लाती है हमें
ये ज़मीं चाँद से बेहतर नज़र आती है हमें
(तू अशी जवळी रहा...)

सुर्ख फूलों से महक उठती हैं दिल की राहें
दिन ढले यूँ तेरी आवाज़ बुलाती है हमें

याद तेरी कभी दस्तक, कभी सरगोशी से
रात के पिछले पहर रोज़ जगाती है हमें
(तुझ्या आठवणी कधी दारावर टकटक करतात, कधी हळूच कानात सांगतात, रात्रभर छळतात)

हर मुलाक़ात का अंजाम जुदाई क्यूँ है
अब तो हर वक़्त यही बात सताती है हमें
(अभी ना जाओ छोड़कर, के दिल अभी भरा नही)




अशा भेटीमधे नवाब सांगतात की त्यांचे लग्न ठरत आहे...अशाच एका एकांताने ग्रासलेल्या प्रसंगात एक लुटेरा येतो, त्याची प्रेम व्यक्त करण्याची पध्दत वेगळीच आहे. (राज बब्बर).  उमराव स्वतः च्या दुःखात बुडालेली असताना तीला हा लुटेरा आवडायला लागतो. पण उमरावला प्रश्न पडतो..... किसको अपना कहे या किसीके हो जाए ?  काहीच दिवसात तो मारला जातो.  अचानक तिची गाठ पड़ते तिची बालमैत्रीण.  लखनौ मधें उमराव चे नाव होते पण एका वळणावर तिला समजते की तिच्या नव्याने मिळालेल्या मैत्रिणीचा नवरा म्हणजे नवाब...तिथेच तीला गावे लागते...

जुस्तजू जिसकी थी उसको तो पाया हमने
इस बहाने से मगर देख ली दुनिया हमने

तुझको रुसवा किया, खुद भी पशेमाँ हुये
इश्क़ की रस्म को इस तरह निभाया हमने

कब मिली थी कहाँ बिछड़ी थी, हमें याद नहीं
ज़िंदगी तुझको तो, बस ख़्वाब में देखा हमने

अदा और सुनाये भी तो क्या हाल अपना
उम्र का लम्बा सफ़र तय किया तन्हा हमने

आपल्याला हवे ते मिळतेच असे नाही.  उमराव जानला आयुष्याकडून काय मिळाले हा प्रश्नच आहे.....पण ती म्हणते या निमित्ताने जग तर बघितले कसे वागते ते, या निमित्ताने आयुष्याचा हा लांब पल्ला पार केला.




उमरावला फ़सवून परत कोठीवर आणले जाते पण लवकरच सगळ्यांना ती कोठी सोडावी लागते.  फैजाबादला रात्री गाड्या थांबतात तिथे तीला एका जागी मुजरा करण्याचे निमंत्रण मिळते.  ती जागा म्हणजे तिच्या आई-वडिलांचे घर.  त्यांमुळे उमराव गाते....

ये क्या जगह है दोस्तों, ये कौन सा दयार है
हद निगाह तक जहां गुबार ही गुबार है

ये किस मुकाम पर हयात,  मुझको लेके गई
बस खुशी पे कहां,  ग़म पे इख्तियार है ये...

तमाम उम्र का हिसाब मांगती है ज़िन्दगी 
ये मेरा दिल कहे तो क्या,  ये खुद से शर्मसार है

बुला रहा क्या कोई चिलमनों के उस तरफ़ चिलमनों के उस तरफ़
मेरे लिये भी क्या कोई उदास बेक़रार है




या जागीच अमीरनला म्हणजे उमरावला तिची अम्मी भेटते, ...पण तीचा भाऊ तवायफला घरी राहु देत नाही.

तीचा कोणताही दोष नसताना तिला कोणाचेच प्रेम मिळाले नाही, अशी उमराव जान.  तिच्या आयुष्यात बरेच आले, पण तिचे कोणीच नव्हते.........

मेरे लिये भी क्या कोई उदास बेक़रार है


सुहास किर्लोस्कर


Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास