जान-ए-जहाँ, याद करोगे, इक दिन मेरे प्यार को
एका गाण्यात तीन चाली लावणें किती कठीण काम असेल? शिवाय तिनही चाली एकसे बढ़कर एक... ओंकार प्रसाद नय्यर यानी ही किमया केली आहे, गाणें आपल्या ओळखीचे आहे तरीही सहजपणे आपल्या लक्षात येत नाही त्यात काय आणि कितीं विविधता आहे, वेगवेगळ्या चाली, गाण्यात त्याचे वेगवेगळे ठेके, वेगवेगळी वाद्ये, त्याचा चपखल वापर. सोने पे सुहागा म्हणजे मोहम्मद रफी-आशा भोसले यानी त्या सुंदर गाण्याचे खरोखर सोने केले आहे.
फिर वोही दिल लाया हूँ या सिनेमातील हे गाणें सुरु होते रफी यांच्या सुरेल स्वरानी...
दूर बहुत मत जाइये, लेके क़रार हमारा
ऐसा न हो, कोई लूट ले, राह में प्यार हमारा
नायक हेच म्हणतो की, दूर जाउ नकोस. (मधेच कोणी दूसरा चांगला भेटला तर...?) स्त्री जरी दूर गेली तिला म्हणायचे असते की मी मनाने तुझ्याबरोबर आहे.
याला तोडीस तोड़ जवाब मजरूह सुलतानपुरी यानी लिहिलाय...
पास रहो या दूर तुम, तुम हो साथ हमारे
देंगे गवाही पूछ लो, ये ख़ामोश नज़ारे
रफी आणि आशा यांच्या आवाजाचा इको इफेक्ट....कारण ते दोघेही पहाडी इलाक्यामधें आहेत. चारी बाजूला पर्वतरांगा
रफी "नाजनी....." असे गायला सुरुवात करतो, तेव्हा इको इफेक्ट नाही, गाण्याची चाल बदलते, ढोलक आणि त्याला ठेकयाची जोड़ दिली आहे पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतुर ने. या वाद्याच्या स्वरांवर आपण ठेका धरतो ही ओ पी नय्यर आणि शिवजी यांची कमाल.
नाज़नीं बड़ा रँगीं है वादा तेरा
ओ हसीं, है किधर का इरादा तेरा
आँख मुड़ती हुई, ज़ुल्फ़ उड़ती हुई
फ़ासला क्यूं है ज़्यादा तेरा
आशा भोसले "हमदम मेरे..." गातात ती चाल वेगळी, ढोलक थांबतो, ड्रमवर पाश्चिमात्य ठेका सुरु होतो, केस्टनेट वाजते, आपल्या नकळत भारतीय आणि पाश्चात्य वाद्यांचे फ्यूजन सुरु होते. व्हायोलीन, मेंडोलीन अशा वाद्यांचा मेळ जमतो...
हमदम मेरे, खेल न जानो चाहत के इक़रार को
जान-ए-जहाँ, याद करोगे, इक दिन मेरे प्यार को
पुन्हा ढोलक आणि संतुर...
छाये हो, मेरे दिल पे, नज़र पे तुम्हीं
आज तो, मेरी उल्फ़त का कर लो यकीं
ए जी हमसे तुम्हें एक लगावट तो है
तुम्हें हमसे मुहोब्बत नहीं
आशा भोसले यांच्या आवाजाबद्दल काय बोलणार? दुसऱ्या कोणत्याही गायिकेचा इथे विचार करू शकत नाही. काही अवघड जागा अशा काही लिलया गायल्या आहेत की ऐकताना सोपे वाटते, गायन सुरु केलेच तर लक्षात येते आपण काय घोड़चुक करत आहोत...
इथे मुखड्यानंतर तार शेहनाई वाजते (दक्षिणा मोहन टागोर) आणि टाळ्याचा ठेका.....इथे चाल बदलली आहे, ठेका सुद्धा आणि द्रुत लयीमधे टाळ्या वाजत असताना एकदम मुळ गाण्याची लय सुरु होते...
या सगळ्या सुरेल गाण्यात खटकतो तो सिनेमाचा नायक, जॉय मुखर्जी, त्याला शम्मीकपूरची नक्कल करता येत नाही, तालात नाचताना त्याला अनेक प्रयास करावे लागतात. अभिनयात तर हा नरपुंगव अगदी भारत भूषण-प्रदीपकुमार स्कुलचा आजीव सभासद. नासिर हुसैन यांचा हा टिपिकल मसाला सिनेमा. तेव्हाच्या काळात सिनेमाला "सिनेमा" या कलेचे मूल्य कमी, करमणुक मूल्य जास्त, त्यामुळे आता ते सिनेमे बघितले की प्रेक्षक डोके बाहेर ठेवून कसे बघत असतील याची कल्पना येते. कथेमधे आधी गाण्याच्या जागा तयार करायच्या, त्याभोवती कथा लिहायची, गैरसमज होतील असे प्रसंग लिहिले की शेवटच्या रिळात साखरपेरणी करायची. खलनायक प्राण असेल तर नायकाचा चेहरा हलला नाही तरी काही हरकत नाही.
ओ पी नय्यर याना जरा बरे सिनेमे अधिक मिळाले असते तर.....?
हमसफ़र, तू ही मेरा है लेकिन सनम
साथ में, हैं किसी अजनबी के कदम
मेरी उलझन यूँही बेसबब तो नहीं
दिल की बेताबियों की कसम
हमदम मेरे, खेल न जानो, चाहत के इक़रार को
जान-ए-जहाँ, याद करोगे, इक दिन मेरे प्यार को
गाणें संपते माउथऑर्गन ने..आणि आपण गुणगुणत रहातो
हमदम मेरे.....
Comments
Post a Comment