तू खुद की खोज में निकल




पिंक सिनेमामधील हे गीत सिनेमामध्ये समयोचीत आहे आणि नेहमीच ऐकण्यासारखे आहे,  फक्त 8 मार्च ला नव्हे !

मुली/महिलांवर बंधने घालण्यात आपण पटाईत असतो.  आपल्याकडे परंपराच आहे तशी.  असेच करू नको, असे वाग, सातच्या आत घरात वगैरे.  कसे वागावे हे शिक्षण कुणाला देणे गरजेचे आहे ? मुलींना की मुलाना ?  पिंक चित्रपटात बरेच प्रसंग बोलके आहेत.  संवाद नसताना खुप काही सांगून जाणारे.  उदा. लोक काहीतरी बोलतात म्हणून नायिका चेहरा झाकण्याचा प्रयत्न करते. नायक अमताभ तो प्रयत्न हाणुन पाडतो. ती एक कृती बरेच काही भाष्य करते.

तन्वीर गाझी यानी लिहिलेले हे गीत आहे मुलींना, महिंलाना उद्देशुन....

तू खुद की खोज में निकल

हताश होण्याचे काहीच कारण नाही. बेड्याना वस्त्र समजू नकोस.  तोडून टाक त्या बेड्या, ती समाजाने घातलेली बंधने.  हे पापी लोक कोण आहेत तुझी परीक्षा घेणारे, त्याना काहीही हक्क नाही तुझ्या पवित्र चारित्र्यावर शिंतोड़े उडवण्याचा. तू हताश होउ नकोस. स्वतः च्या शोधात बाहेर पड़, बिनधास्त !!

शब्दात आणखी काही लिहिण्यापेक्षा अमिताभ बच्चनच्या आवेशपूर्ण आवाजात हे ऐकले की पूर्ण अर्थ समजतो, उमगतो.    (वजूद म्हणजे अस्तित्व)
संगीत दिग्दर्शक - शंतनु मोइत्रा

तू खुद की खोज में निकल
तू किस लिए हताश हैतू चल, तेरे वजूद की
समय को भी तलाश है
समय को भी तलाश है

जो तुझ से लिपटी बेड़ियाँ
समझ ना इन को वस्त्र तू
ये बेड़ियाँ पिघाल के
बना ले इनको शस्त्र तू

तू खुद की खोज में निकल

चरित्र जब पवित्र है
तो क्यूँ है ये दशा तेरी
ये पापियों को हक़ नही
की लें परीक्षा तेरी

तू खुद की खोज में निकल

जला के भस्म कर उसे
जो क्रूरता का जाल है
तू आरती की लाउ नही
तू क्रोध की मशाल है

तू खुद की खोज में निकल

चुनर उड़ा के ध्वज बना
गगन भी कपकाएगा
अगर तेरी चुनर गिरी
तो एक भूकंप आएगा
तो एक भूकंप आएगा

तू खुद की खोज में निकल
तू किस लिए हताश हैतू चल, तेरे वजूद की
समय को भी तलाश है



सुहास किर्लोस्कर

Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास