छायी बरखा बहार




जलधारांनी चिंब झाल्यावर प्रत्येकाला वेगवेगळी गाणी सुचतात, आठवतातत्यातलेच एक मदनमोहन यानी संगीतबद्ध केलेले वेगळे गाणें...

मल्हार रागातील गाणी पावसाळ्याशी संलग्न आहेत.  मल्हारचे बरेच प्रकार आहेत त्यातला एक राग सुर मल्हार. असे मानले जाते की संत सुरदासने या रागाची रचना केली, त्याला "सूरदासी मल्हार" असेही म्हणतात.  हा राग सारंग आणि मल्हार याचे मिश्रण आहे. 

छायी बरखा बहार

Prelude म्हणजे गाण्यापूर्वीचे संगीत - केहेरवा तालात बरीच तालवादये वाजतात, त्यात लोकसंगीतांमधें वाजवले जाणारे एक वाद्य, याला केरळमधें उडुकाईं म्हणतात.  डमरूसारखे वादय,  त्याच्या दोऱ्या दाबुन-ताणून आवाज काढला जातो.   या गाण्यात  उडुकाईं सारखी वाद्ये वाजतात शिवाय चिमटासुद्धा वाजला आहे.  केहेरवा तालात वाजणारा ढोलक, तबला आणि इतर तालवादये वाजल्यावर लोकसंगीताचा परिणाम साधतो.

चिराग सिनेमातील हे गाणें आशा पारेख आणि लोकसंगीत गाणाऱ्या स्त्रियांवर चित्रित झाले आहे.  शहरातल्या आशा पारेखला गावातला वेष परिधान करावा लागतो.  कोरस मधल्या सहेलियां टाळ्याचा ताल धरतात. 

कोरस - दुप्पट लयी मधें

छायी बरखा बहार
पड़े अंगना फुहार
सैयां आके गले लग जा

कोरसच्या निम्म्या लयीमधे लताच्या आवाजातले हे गाणें हळूहळू तुमचा ताबा घेते. 
हो s s s
छायी बरखा बहार
पड़े अंगना फुहार
सैयां आके गले लग जा

बरेच व्हायोलीन वेगात वाजतात आणि .... उस्ताद रईस खान यांची अप्रतीम सतार एकदम गाण्याचा मुड़ बदलते.   ढोलक, तबल्याची साथ ऐकू येते आणि बासरी वादनातून अंतरा सुरु होतो

एक तो बरखा आग लगाए
दूजे पुरवैया बान चलाए
फिर उसपे तू भी तरसाए
कोई चैना कैसे पाये
जिया लहराके रह जाए
छाई....

मदनमोहन यानी सुरमल्हार रागावर आधारित ही रचना केली.  आशा पारेख बरोबर असलेल्या "सहेल्या" टाळ्या वाजवत ठेका सांगतात आणि नकळत आपण ताल धरतो आणि सतार वाजली की एकदम म्हणतो, वा, क्या बात है !!

शहेनाई, ढोलक, तबला, बासरी, व्हायोलीन, कोरस, चिमटा यांचे स्नेहसम्मेलन आणि बासरी...

लगे जिया के कोई बुझे
दूरी सूझे, पास सूझे
तेरे बिन क्या देखूं सजना
तू ही डोले मन के अंगना
बजे चुपके चुपके कंगना

केहेरवा ताल, 8 मात्रांचा, लय लगेच पकड़तो आपण...मदनमोहन यानी प्रसंगाचा नूर ओळखून संगीत दिले, संगीत नियोजन वेगळे आहे, कोणी केले त्याची माहिती मिळाली नाही, पण नेहेमीच्या मदनमोहन यांच्या गाण्यापेक्षा वेगळे आहे हे नक्की.  गाण्याचे चित्रीकरण मदनमोहन यांच्या संगीताची उंची गाठू शकले नाही. 

तोहे तके सब फिर मोहे देखे
कांकरिया मोहे नजरो की फेके
हुई मैं क्यों पानी पानी
बनी काहे को दीवानी
ये बतियाँ तुझको समझानी


छायी बरखा बहार
पड़े अंगना फुहार
सैयां आके गले लग जा लग जा


1969 सालचा चिराग सिनेमा गाण्यामुळेच लक्षात आहे. मजरूह सुल्तानपुरी यांचे शब्द बरखा आणि फुहार आणतात.  त्या शब्दाला लोकसंगीताचा सुगंध आहे, गाणें संपले तरी दरवळतो.



पंडित भीमसेन जोशी यानी सुरमल्हार मधें गायलेली बंदिश "गरजत ", द्रुत तीनतालात "बदरवा बरसन लागी" यादगार आहे. हा सुरमल्हार ऐकला की पावसाची गूंज वाजत रहाते. मल्हारचे आणखी प्रकार - मेघ मल्हार, मियां मल्हार, रामदासी मल्हार

मल्हार रागावर आधारित गाणी सलग ऐकली आणि गायचा-गुणगुणायचा प्रयत्न केला की मल्हारचे तुषार कानावर पडतात.


माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा - मनोहर कवीश्वर, सुधीर फड़के
तन रंग लो जी आज मन रंग लो - नौशाद - कोहिनूर जन पळभर म्हणतील हाय हाय - भा रा तांबे, वसंत प्रभु, लता
बोले रे पपीहरा - वसंत देसाई - गुड्डी
संथ वाहते कृष्णामाई - सुधीर फड़के
गरजत बरसत सावन आयो रे - बरसात की रात, रोशन, कमल बारोट, लता
घनघन माला तभी दाटल्या, कोसळती धारा - दि माड़गुळकर, वसंत पवार, मन्ना डे
भय भंजना सुन हमारी - बसंत बहार, मन्ना डे, शंकर जयकिशन, शैलेन्द्र
आज कुणीतरी यावे - दि माड़गुळकर-सुधीर फड़के-आशा भोसले
दुख भरे दिन बीते रे भैया - नौशाद - मदर इंडिया
एक बस तू ही नही, मुझसे खफा हो बैठा - मेहदी हसन यांची यादगार गजल

मल्हार ऐकतो तेव्हा आपले मागणे एकच असते...

लपक झपक तू रे बदरवा
(शैलेन्द्र, मन्ना डे, शंकर जयकिशन, बुत पॉलिश)


सुहास किर्लोस्कर


Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास