फार्सीकल पण क्लासिकल



मेहमुद, शुभा खोटे आणि धुमाळ यानी एक काळचा सिनेमा गाजवला, इतका की त्यांच्यासाठी प्रसंग तयार केले जायचे, गाण्याच्या जागा तयार केल्या जायच्या.  एक प्रसंग संगीतकाराना कसा संगितला असेल, की गाणें मेहमुद साठी तयार करायचे आहे, मेहमुद आणि शुभा खोटे यांचे प्रेम आहे आणि धुमाळ सारखे लोक त्यात बिब्बा घालत आहेत, टिपिकल प्यार के दुश्मन.  अशा प्रसंगावर दोन संगीतकारानी गाणी तयार केली, वेगवेगळ्या रागावर आधारीत. 

शंकर जयकिशन यांच्या संगीतामधे भैरवी रागाच्या बऱ्याच छटा दिसतात.  हे गाणें सिंधु भैरवी रागावर आधारोत तयार केले.   अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर भैरवी मधें शुद्ध स्वर वापरला तर त्याला सिंधु भैरवी म्हणतात, त्याला मिश्र भैरवी असेसुद्धा म्हणतात.  म्हणजे रव्याचे लाडू करताना त्यात बेसन घातले तर त्याला राघवदास म्हणतात तसेच.  एकदा मिश्र असे नाव आले की जवळपासच्या स्वरांचा वापर केला जातो. त्याच लाडवामधें नाचणी, गहु, मुग डाळीचे पीठ घातले तर पंचखाद्य लाडू म्हणतात.   अशा सिंधु भैरवी रागावर आधारीत गाणी आठवली तर रागाचे स्वरूप लक्षात येईल. 

अगर मुझसे मुहब्बत है
हम तुझसे मुहब्बत करके सनम
रहा गर्दिशों में हरदम
मुहब्बत की झूठी कहानी पे रोये
दुनिया के रखवाले
देखा है पहेली बार साजन की आंखों में प्यार
झनक झनक तोरी बाजे पायलिया
कोई मतवाला आया मेरे द्वारे
पग घुंगरू बांध
तू प्यार का सागर है
तोरा मन दर्पन कहलाए
हंगामा है क्यों बरपा

या रागाचा भाव सर्वसाधारणपणे विरह, शोक, भक्ती असा असतो.  शंकर जयकिशन यानी संगीतबद्ध केलेले हे गाणें मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपुर यानी गायले आहे.  सांज और सवेरा या सिनेमातील प्रसंग विरहाचा आहे, शुभा खोटेला मेहमुदला भेटायचे आहे पण दाढ़ीवाला आणि काळा गॉगल घातलेला संगीत शिक्षक घरी आला आहे, शिक्षण व्यवस्थित सुरु आहे ना, यावर अधुन मधून लक्ष आहे.  पंडित रामनारायण यांच्या सारंगीने,  रफी आणि सुमन यांच्या सुरेल आलापाने गाणें सुरु होते. दिवाळीचा फराळ आहे, शिवाय साजुक तुपातली बर्फी आणि आपल्याला विचारत आहेत की डेज़र्ट म्हणुन क़ाय खाणार, श्रीखंड की कुरुंदवाडची बासुंदी.... 

गीतकार हसरत जयपुरी लिहितात...


अजहुँ ना आए बालमा
सावन बीता जाए
हाय रे, सावन बीता जाए
(सारंगी)

याच वेळेस गायन मास्तर नृत्य करतो, शुभा खोटेच्या कानात गातो, गॉगल काढतो आणि तिला समजते हा तर आपलाच "बालम".  कडव्याला पुन्हा पहारा सुरु होतो आणि तंबोरा हातात धरून मेहमुद म्हणतो...

नींद भी अंखियन द्वार आए
तोसे मिलन की आस भी जाए
आई बहार खिले फुलवा
मोरे सपने कौन सजाए ...
अजहुं ...

इथे द्रुत तीनताल सुरु होतो तो मेहमुदने मस्त पकडला आहे. मेहमूदने जे काही उस्फूर्ततेने केले आहे ते बघणेच इष्ट.  क्षणाक्षणाला मेहमुद बेअरिंग बदलून दोन वेगवेगळ्या भूमिका करतो...बालम आणि संगीत शिक्षक

चांद को बदरा गरवा लगाए
और भी मोरे मन ललचाए
यार हसीन गले लग जा
मोरी उम्र गुज़रती जाए ...
अजहुं ..




मोरा मन ललचाए हे रफी यानी असे काही गायले आहे  आणि त्याला जवाब सुमन कल्याणपुर यानी असा दिलाय की वा, क्या बात है !!  भैरवीचे हे असे अनोखे रूप देखणे आहे.  भैरवी शेवटी गाण्याची प्रथा फक्त महाराष्ट्रात आहे.  पण त्यामुळे भैरवीला एका धुनचे/भजनाचे स्वरूप आले आणि एका सुंदर रागाचे आयुष्य मर्यादीत राहिले.   एखादी भैरवी रागाची पूर्ण तास-दोन तासाची मैफल ऐकायला आवडेल. 



साधारण अशाच प्रसंगासाठी सचिन देव बर्मन यानी एक गाणें करताना दरबारी कानडा रागाची निवड केली.  कर्नाटक संगीतामधला राग यक्षगान मियाँ तानसेन यानी भारतीय शास्त्रीय संगीतामधे आणला, अकबराच्या दरबारात गायला, त्याला दरबारी कानडा नाव पडले. बिरबल, तानसेन अशी एकाहुन एक नवरत्ने बाळगणारा अकबर सुद्धा ग्रेट पण  बिरबल हुशार आणि अकबर सुमार बुद्धीचा अशा कथा  लहानपणापासून ऐकवल्या/वाचायला दिल्या त्यामुळे आपले मत तसे बनले.    तर अशा या अकबर दरबारी गायल्या गेलेल्या दरबारी कानडा रागावर आधारीत काही गाणी ऐकली तर दरबारी कानडाचे चलन लक्षात राहील. 


के आजा तेरी याद गई (चरस, रफी-लता)
निम्बूडा निम्बूडा (हम दिल दे चुके सनम - काचा काचा छोटा छोटा निम्बूडा लाये हो....हे कमी लयीत म्हणुन बघा)
मेरी बात रही मेरे मन मे (साहिब, बिवी और गुलाम, आशा भोसले)

या गंभीर स्वरूपाच्या रागावर सचिन देव बर्मन यानी जिद्दी सिनेमासाठी विनोदी ढंगाचे गाणें संगीतबद्ध केले.  वेगळा विचार, out of the box thinking, प्रयोगशीलता याचे एक उदाहरण.  विशेष म्हणजे हे गाणें सुद्धा हसरत जयपुरी यानीच लिहिलय.


दुनिया बनाने वाले सुन ले मेरी कहानी
रोये मेरी मोहब्बत तड़पे तड़पे मेरी जवानी

मन्ना डे यांच्या आवाजात मेहमूद रडतो...

प्यार की आग में तन बदन जल गया
जाने फिर क्यूँ जलती है दुनिया मुझे
प्यार की आग में तन बदन जल गया

मधले पॉझेस, मेहमुदचा अभिनय, त्याला शुभा खोटे आणि धुमाळची साथ, भट्टी जमलीय...

मैं तो रोता फिरू बदलो की तरह
ठंडी आहें भरु पागलो की तरह
मैं तो रोता फिरू बदलो की तरह
अरे मैं तो रोता फिरू
जाने फिर क्यूँ जलाती है दुनिया मुझे
प्यार की आग में तन बदन जल गया



बात जब मैं करून मुंह से निकले धुंआ
जल गया जल गया मेरे दिल का जहाँ
बात जब मैं करून मुंह से निकले धुंआ
जल गया जल गया मेरे दिल का जहाँ
जाने फिर क्यूँ फिर क्यूँ सताती है दुनिया मुझे
प्यार की आग में तन बदन जल गया

इश्क़ मुझ को नाचता रहा है सदा
क्या क्या सपने दिखता रहा है सदा
इश्क़ मुझ को नाचता रहा है सदा

(इथे कम सप्टेम्बर ची धुन वाजते आणि पुन्हा दरबारी कानडा सुरु होतो...)

क्या क्या सपने दिखता रहा है सदा
जाने फिर क्यूँ फिर क्यूँ नचाती है दुनिया मुझे
प्यार की आग में तन बदन जल गया
तन बदन जल गया





गाताना मन्ना डे यानी क्लासिकल आणि फार्सीकलची कसरत फार सुरेख सांभाळली आहे.  आलापी करताना मधेच रडण्याचा अभिनय सुरेख गायला आहे.  मन्ना डे याना फ़िल्म इंडस्ट्रीने शास्त्रीय रागावर आधारीत गाणीच देऊन टाइपकास्ट केले असे हे गाणें ऐकल्यावर पुन्हा वाटत रहाते.   मेहमुदला सुद्धा वेगवेगळे रोल मिळायला हवे होते, त्याच्या करियरची सुरूवात खलनायकाच्या रोलने झाली आहे. कुंवारा बाप मधें त्याने versatility सिद्ध केली आहे.

शास्त्रीय राग असे म्हटले की आपल्याला  काहीतरी धीरगंभीर गायले जाणार असे वाटते, तसे ते आहेच पण विनोदाचा ढंगही  आहे.  संगीतकार चाल लावताना दरबारी/भैरवी रागावर विनोदी गाणें तयार करू असा थोडेच विचार करत असतील, काही धुन संगीतकारांना सूचत असतील, शब्दाला तशी चाल लावत असतील किंवा त्या चालीवर शब्द लिहिले जात असतील.  पूर्वीच्या काळी सुद्धा कधी चाल आधी तयार व्हायची, कधी शब्द आधी लिहिले जायचे.  एका संगीतकाराने दरबारी रागावर आणि एका संगीतकाराने सिंधू भैरवी रागावर आधारित गाणें तयार केले.  ऐकल्यावर "क्लासिकल" रागाशी साधर्म्य लक्षात येते, बघितल्यावर "फार्सीकल" आहे हे समजते.  एकाच प्रसंगासाठी दोन संगीतकारानी दोन वेगवेगळे रंग निवडले, दोन्ही पोर्ट्रेट सुंदर आहेत.  मेहमूद-शुभा खोटे यांच्यामुळे हास्याची आतषबाजी होते. 

ही दिवाळी आपणा सर्वाना अशीच हास्यमय जावो.


दिवाळीच्या संगीतमय शुभेच्छा


सुहास किर्लोस्कर


Comments

  1. सुहास ,अतिशय उत्तम उपक्रम.आणि या सर्व गोष्टींचे documentation खूपच छान केले आहे . 👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास