घन गरजत बरसत बूंद बूंद
मल्हार रागावर आधारित एक
अप्रतीम गाणें शंकर जयकिशन
यानी स्वरबद्ध केले
आहे बूट पॉलिश
(1954) या सिनेमासाठी. एक
सिनेमा निर्माता-दिग्दर्शक एक
विनोदी गाणें पावसावर लिहायला
सांगतो. शैलेन्द्र
यानी प्रसंगाचा विचार
करून कसे लिहिले
असेल? संगीत
दिग्दर्शन मल्हार रागावर करणार
है ओघाने आलेच,
पण विनोदी ढंग
कसा आणायचा? मल्हार रागातील बंदिश
म्हणजे "घन गरजत
गरजत बूंद बूंद",
या चालीवर एक
मराठी गाणें आहे
"जन पळभर म्हणतील
हाय हाय". तर
या रागावर आधारित
विनोदी गाणें कसे केले
असेल ?
सिनेमाचे दिग्दर्शक यानी डेव्हिड
इतकेच इरसाल "तरुण" जमवून
असे काही चित्रीत
केले आहे की
है गाणें ऐकायचे
कि बघायचे हा
नेहमीच प्रश्न पडतो.
गाणें सुरु होते
तबला तरंगने. तबला तरंग
म्हणजे तबले वेगवेगळ्या
स्वरात लावले जातात आणि
गाण्याच्या स्वराप्रमाणे ते वाजवले
जातात. त्याचे
प्रात्यक्षिक डेव्हीड कसे देतो
हे बघण्या सारखे
आहे. डेव्हीडचा गाण्यातला
अभिनय बघण्यासारखा आहे.
वरचा स्वर लावला
की त्या स्वरातील
सहजता त्याच्या अभिनयात
दिसते. असा
अभिनय करायला स्वरांचे
जुजबी का होईना
ज्ञान असावे लागते,
ते फार कमी
अभिनेत्याकड़े आहे.
मन्ना डे यांची
गायकी स्वरांचा वर्षाव
करते. स्वर
आणि भाव यांचा
सुरेल संगम.
लपक जपक तू
आ रे बदरवा
सर की खेती
सूख रही है
बरस बरस तू
आ रे बदरवा
समोर बसलेल्या कैदयापैकी एक
म्हातारा इरसाल आहे. तो
"धा धिन धिन
धा" म्हणुन तिहाया घेतो
त्या बघाव्यात.
झगड़-झगड़ कर
पानी ला तू
अकड़-अकड़ बिजली
चमका तू
तेरे घड़े में
पानी नहीं तो
पनघट से भर
ला डे बदरवा
लपक झपक तू...
सारंगीवर तिहाई वाजवली आहे
तिथे कैद्यांचा प्रासांगिक
अभिनय फार समयोचित
आणि तालात आहे.
"पनघट से भर
ला" इथे तीनताला
तून केहेरवा सुरु
होतो आणि पुन्हा
तीनतालावर येतो. डेव्हिडला गाता
येत असावे शिवाय
त्याचे तालाचे ज्ञानही उत्तम
असल्याचे जाणवते.
बन में कोयल
कूक उठी है
सब के मन
में हूक उठी
है
भूदल से तू
बाल उगा दे
झटपट तू बरसा
दे बदरवा
लपक झपक तू...
तिहाया आणि तिश्र
मधली तालाची गम्मत
गाण्यात जाणवते. या
गाण्यामुळे सिनेमात शेवटी पर्जन्यवृष्टी
होते, तसे पूर्वीच्या
कथामधे आपण ऐकतो
पण आपण त्यातला
भाव आणि मतितार्थ
घ्यावा. अशा रागामुळे
वातावरण निर्मिती होते, पण
पाऊस पडत नाही. अन्यथा पूर्वीच्या
राजा-महाराजांनी विदर्भ
किंवा राजस्थानात मल्हार
महोत्सवाचे आयोजन केले असते.
वातावरण निर्मिती म्हणजे मारव्याने
संध्याकाळची अस्वस्थता जाणवते, पुरिया
धनश्रीची संध्याकाळ वेगळीच भासते. रोज
अर्धा तास गायन
आणि वादनातून वेगवेगळे
राग रोज ऐकले
तर कान चांगला
तयार होतो. त्यालाच
ऐकण्याचे संस्कार म्हणतात. पूर्वी शास्त्रीय गायन
शिकण्यासाठी शिष्याना गुरुच्या घरी
पाणी भरायला लागायचे
असे म्हणतात. त्याचा
उद्देश आधी ऐकायला
शिकावे, चांगले कानावर पडावे
हाच होता. आत्ता पालकांनी मुलानां
क्लासेसला घालण्यापुर्वी घरी असे
संगीत रोज लावून
ऐकण्याचे संस्कार करावेत. ऐकण्याची आवड़ लागली
की शिकण्याची जिज्ञासा
आपोआप निर्माण होते.
आता याच मल्हार
रागात थोड़ा बदल
करून आणि भाव
बदलून मदनमोहन यानी
क़ाय रंग दिलाय
ते ऐकू. सम्राट अकबर च्या
दरबारात रामदास नावाचा गायक
होता त्याने मल्हार
मधें दोन गंधार
लावून या रागाची
निर्मिती केली, त्यालां रामदासी
मल्हार म्हणतात. अकबराच्या
दरबारातील दूसरे रत्न म्हणजे
मियां तानसेन. तानसेन यांनी मल्हारचा
केलेला प्रकार पुढे मियां
मल्हार या नावाने
ओळखला जाउ लागला. तर
दोन गंधार असलेल्या
रामदासी मल्हार वर आधारीत
गाणें मदनमोहन यानी
वेगळ्या ढंगात संगीतबद्ध केले.
सतार, सारंगी, सरोद आणि
तबला..
वो चुप रहे
तो मेरे दिल
के दाग जलते
है
"दिल के दाग
जलते है" आणि
"जन पळभर म्हणतील
हाय हाय" चे
स्वर साधारणपणे सारखे
आहेत. कमाल आहे
ती "वो चुप
रहे तो" यामधे
आणि नंतर वाजणाऱ्या
सतारी मधें. जहाँआरा सिनेमासाठी राजेन्द्र
कृष्ण यानी लिहिलेले
भावपूर्ण अर्थगर्भ शब्द. तो
प्रियकर काही बोलला
नाही तर "सिने
में जलन" होते,
तो बोलला तर
आशांचे दिवे समस्त
आसमां उजळून टाकतात. तर
आता तुच सांग
हे दाग जलाऊ
या चिराग ? विराण वाळवंटात एक
जळणे असते, बागे
फुलानी बहरली तरी ......
लता मंगेशकर यानी अप्रतीम
गायले आहे, गाण्यातला
दर्द कसा व्यक्त
होतो ते ऐकण्यासारखे
आहे.
भारत भूषण गप्प
असला काय किंवा
बोलत असला तरी
वेगळीच जलन होते. मागे
ओमप्रकाश बसला आहे,
तो 10-15 सेकंदात काय भाव
व्यक्त करतो, वा ! हाच
खरा भारताचा भूषण
!!
वो चुप रहें
तो मेरे दिल
के दाग़ जलते
हैं
जो बात कर
लें तो बुझते
चराग़ जलते हैं
काहीतरी बोल आज,
तुझे मन मोकळे
कर, माझीही कैफियत
ऐक. काहीच
बोलला नाहीस तर....
जलना और जलाना
यावर शाब्दिक कोटया
केल्या आहेत त्याचा
अर्थ सांगून त्यातला
गोडवा आणि गम्मत
जाते. जसे
पु ल देशपांडे
यानी मराठीत केलेल्या
कोटया कोणत्याही अन्य
भाषेत भाषांतरित केल्या
तर त्यात ती
खुमारी आणि तो
लहेजा येणार नाही.
सारंगीची आर्तता आणि उस्ताद
रईस ख़ाँ यांच्या
सतारीचा विलक्षण परिणाम शब्दांचा
अर्थ अधोरेखीत करतात. ताल
- दादरा
कहो बुझें के जलें
हम अपनी राह
चलें या तुम्हारी
राह चलें
बुझें तो ऐसे
के किसी ग़रीब
का दिल
जलें तो ऐसे
के जैसे चराग़
जलते हैं
यह खोई खोई
नज़र
कभी तो होगी
या सदा रहेगी
उधर
तो एक सुलग़ता
हुआ है वीराना
मगर इधर तो
बहारों में बाग़
जलते हैं
तबला-सतार-सरोद-सारंगी वेगवेगळी ऐकता
आली की गाण्याचा
वेगळाच् आनंद मिळतो.
जो अश्क़ पी
भी लिए
जो होंठ सी
भी लिए, तो
सितम ये किसपे
किए
कुछ आज अपनी
सुनाओ कुछ आज
मेरी सुनो
ख़ामोशिओं से तो
दिल और दिमाग़
जलते हैं
वो चुप रहें
तो मेरे दिल
के दाग़ जलते
हैं
जो बात कर
लें तो बुझते
चराग़ जलते हैं
मेघ/मल्हार रागावर आधारित
काही वेगळी गाणी...
कहा से आये
बदरा- चश्म ए
बद्दूर - राजकमल - मेघ
डर लागे बरसे
बदरिया - वसंत देसाई,
लता - सुर मल्हार
घन घन माला
नभी दाटल्या कोसळती
धारा
घनन घनन घन
घिर घिर आये
बदरा - लगान - ए आर
रहेमान
शास्त्रीय संगीतात मला आवडलेले
मल्हार के प्रकार-
सर्व पंडित/उस्ताद....
जसराज-झाकिर हुसेन यांचा
मास्टर्स ऑफ इंडिया
अल्बम - (हार्मोनियम आप्पा जळगावकर)
मियां की मल्हार
- घन
गरजत गरजत बूंद
बूंद. पंडित
जसराज यानी रागविस्तार
फार सुरेख केला
आहे. गायनाला साथ
कशी असावी याचा
वस्तूपाठच घालून दिला आहे
उस्ताद झाकिर हुसेन यानी.
अमजद अली खान
- सरोद - गौड़
मल्हार
भीमसेन जोशी - सुरमल्हार - गरजत
आ
अली अकबर खाँ
- सरोद - देस मल्हार,
मेघ
संजीव अभ्यंकर - मेघ
शिवकुमार शर्मा - संतूर - Romancing the rain
रशीद खान - मेघ
हरिप्रसाद चौरसिया - Song of River - पर्वतरांगामधून उगम
पावणाऱ्या नदीचा प्रवास - शांतता....
पाऊस... धबधबा..नदी...समुद्र
असा सुरेल संगीतामधुन
डोळ्यासमोर उभा रहातो.
वीणा सहस्रबुद्धे - रामदासी मल्हार - तराना
हे सर्व ऐकल्यानंतर
परत लपक झपक
ऐकले की सूर
आपल्या ओळखीचे वाटतात......ऐकण्याचा
रियाज झाल्यामुळे.....
✍ सुहास किर्लोस्कर
खुप अभ्यासपूर्ण लेख आहे धन्यवाद
ReplyDelete