आशा भोसले आणि आशा भोसले



आशा भोसले अष्टपैलू गायिका आहेत याचे प्रत्यंतर प्रत्येक गाण्यात नव्याने येत रहाते.    वेगवेगळी आव्हाने या महान गायिकेमे लिलया पेलवून त्या त्या गाण्याची खुमारी वाढवली.  राहुल देव बर्मन यानी  नासिर हुसेन यांच्या कारवाँ सिनेमामधे प्रत्येक गाण्यात काही प्रयोग केले आहेत.  एका गाण्यात वेगळाच प्रयोग केला, अरुणा इराणी आणि आशा पारेख याना एकच आवाज वापरला...आशा भोसले यांचा.  एकाच गाण्यात अरुणा इराणी यांचा sensious मुड़ आणि शेवटच्या कडव्या मधें आशा पारेख यांचा कैफियत मांडण्याचा मुड़ आशा भोसले यानी लिलया पेलला आहे.  शेवटच्या कडव्याला आशा भोसले यानी कसा आवाज वेगळा लावलाय, त्याचे संगीत कसे बदलते यासाठी हे गाणें जरूर ऐकावे.  गाण्यात एक सस्पेन्सचा माहोल तयार करणारे संगीत आहे.   मजरूह सुलतानपुरी यांचे प्रसंगानुरूप आणि त्या दोन्ही व्यक्तिरेखाना अनुसरून असलेले शब्द सुरेख लिहिले आहेत.  शेवटच्या कडव्यात तेच शब्द कसे बदलले आहेत, त्याला तसाच जवाब पंचम यानी कसा दिलाय, हे ऐकण्यासारखे ग्रेट टीमवर्क

गिटारने गाणें सुरु होते...
हा, हे.....
हाय रे...

अब जो मिले हैं तो
बाहों को बाहों में रहने दे ए साजना
सच्चे कि झूठे हैं
होंठों को होंठों से कहने दे ए साजना

तुकड्या तुकड्यात गायलेले गाणें आवाजातील चढउतारामुळे गायला अवघड...एकदा गाण्याचा प्रयत्न केला की समजते.  खरे तर सर्व प्रकारच्या भावना व्यक्त करणारी गाणी (गुणगुणणे सोडून देऊन) नेहेमी म्हणुन बघावीत, लोक काय म्हणतील याचा विचार न करता.   या गाण्यातल्या संगीतात दोन प्रकारचे परिणाम साधणे आवश्यक होते, sensious मादक आणि सस्पेंस.... दोन्ही भाव ऐकाच वेळी म्हणजे अर्ध्या मिनिटात दाखवणे किती अवघड असेल....ऐकायला सोपे वाटते. जोडीला वाजतो तो Bossa Nova beat

गुलाबी शर्ट घातलेला जितेन्द्र !! आवरा !!! क़ाय तो कपड्याचा सेन्स, तरी बरे त्याचे ते पांढरे बूट नाहीत.  अरुणा इराणी ने सिनेमात काम चांगले केले आहे.  आशा पारेख दिसते तेव्हाच सस्पेंस संगीतामुळे अधोरेखीत होतो.

बासरीचा परिणाम सस्पेंस वाढवण्यासाठी, jealousy आणि पुढे क़ाय होणार असा परिणाम साधण्यासाठी..सहाय्यक संगीत दिग्दर्शक - बासु चक्रवर्ती, मनोहारी सिंग, मारुतीराव कीर

यूँ ही नशा चढ़ता रहे
के तेरा प्यार बढ़ता रहे
ये झूमता साया तेरा
तन पे मेरे पड़ता रहे
तू आ गया जो होश में
क्या होगा फिर, ये भूल जा
अब जो मिले हैं...

जितेंद्रला सर्दी झाली असे वाटते पण तो त्याचा अभिनय आहे. धर्मेंद्रला सुद्धा अशीच सर्दी व्हायची.

अंतरा गाताना आशा भोसले यांच्या हरकती ...यूँही  नशा आ ss.......क्या बात है
सस्पेंस....बासरी, ट्रम्पेट, सॅक्सोफोन....आणि आशा भोसले आशा पारेखसाठी गातात....आता आवाज दर्दभरा...हे सर्व केव्हा?  ...जेव्हा एक गाणें पूर्ण रेकोर्ड करावे लागायचे तेव्हा 1971 साली.

तू है हवा, शोला हूँ मैं
मिलके भी जो मिल ना सके
बुझ ना सके तेरे बिना
तेरे बिना जल ना सके
मजबूर हूँ तेरी क़सम
झूठी नहीं मेरी वफ़ा

वेगळ्या भावना आहेत, शब्द बदलले, गाणें हलकेच गिटार वाजत संपते.....

अब जो मिले हैं तो
मुझको निगाहों में रहने दे ए साजना
सच्चे कि झूठे हैं
नैनों को नैनों से कहने दे ए साजना

बाहों को बाहों में लेने दे साजना असे सुरु झालेले गाणें  कसे संपले याचा विचार करता असे गाणें सिनेमात गाणें कसे शूट करणार याचा विचार करून लिहिले आणि संगीतबद्ध केले हे जाणवते.





"मेरी नजर है तुझपे" हे *द बर्निंग ट्रेन* या पडेल सिनेमातले श्रवणीय गीत *राहुल देव बर्मन आणि मारुती कीर* यानी असे विलक्षणरित्या  खुलवले आहे.   एकाच गाण्यात शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य रिदम यांचा संगम असलेले दोन्ही नायिकांचे आवाज आशा भोसले यांचेच आहेत. गीतकार *साहीर लुधियानवी* यांचे शब्द ठीक आहेत, अगदी आनंद बक्षी यांच्या गीतासारखे.  त्यामुळे गीतापेक्षा ओर्केस्ट्रेशन ज्या पद्धतीने झाले ते ऐकावे.

हेमामालिनी आणि परवीन बॉबी यांची ही भारतीय आणि पाश्चात्य अशी टिपिकल फिल्मी जुगलबंदी आहे. या सर्वापेक्षा आशा भोसले यानी जसा आवाज लावलाय आणि नायिका व संगीत बदलले की तसा आवाज बदलला आहे ते अचंबित करणारे आहे.

ब्रास सेक्शन मधील वाद्यांचा मेळ, गिटार, ड्रम, काँगो, बोंगो....आणि अचानक क्लासिकल....मृदंगम, सतार... पुन्हा गिटार, ट्रम्पेट....असे हे पाश्चात्य आणि भारतीय संगीताचे फ्यूजन*...हा प्रकार करणे तसे सोपे नाही, दोन्हीची गोंडी टिकवून अशी ठेवायला लागते की दोन्ही श्रवणीय वाटले पाहिजे, दोन्हीला न्याय देऊन...


परवीन बाबीसाठी आवाज

मेरी नजर है तुझपे, तेरी नज़र है मुझपे
मेरी नजर है तुझपे, तेरी नज़र है मुझपे
इसीलिए रहते है, दोनों खोए हुए

हेमा मालिनी साठी शास्त्रीय संगीताला योग्य आवाज...घुंगरू, तबला.....

तेरे बिना जियरा मने ना
तेरे बिना जियरा मने ना
लगी लगन है ये कैसी
हाय जाने न बलमा
हो सजना हो तेरे
बिना जियरा मने ना
मेरी नजर है तुझपे
तेरी नज़र है मुझपे

हेमा भारतीय संगीतावर न्रत्य करत आहे,....त्याला साजेसा बदल आशा भोसले आलटुन पालटून पण लिलया करतात, ऐकताना इतके सोपे वाटते....असा परकाया प्रवेश फार अवघड

तेरे लिए कलिया मई चुनती रहु
आशाओं की मालाएं बुनती रहूँ
जागे में भी सपनो में कहि राहु
सोते में भी आहट सी सुनती रहूँ
ओ साजना बालमा मुझको क्या हो गया
हो जानू ना

परवीन बाबी नृत्य करताना वादये कशी बदलतात ते बघत ऐकावे...

मेरे बिना अब तू भी रह न सके
हो तेरे बिना अब मै भी रह न सकूँ
हाये मगर तू भी ये कह न सके
हाय हाय मगर मै भी ये कह न सकूँ
जानेमन कहा तुम दिल को
ये क्या हुआ जानू ना हो जानू ना
मेरी नजर है तुझपे
तेरी नज़र है मुझपे
इसीलिये है दोनों खोए हुए

पुन्हा सतार-तबला.... गाणें संपते शास्त्रीय नृत्यावर




तर अशी ही गाणी आशा भोसले आणि आशा भोसले यानी गायलेली.  2 संगीत प्रकारांची तुलना करणे गैर आहे तरीही अशी गाणी ऐकली की वाटते, शास्त्रीय गाण्यात एखादा राग एक तास improvise करायला जेवढे अवघड आहे, तेवढेच अशी तीन मिनिटाची गाणी स-अभिनय गायला..


नको रे नंदलाला - नाव मोठे लक्षण खोटे

✍ सुहास किर्लोस्कर

Comments

  1. सुंदर observation असेच लिहित रहा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास